Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनचा उपक्रम 'आर्ट फॉर होप - सीझन ३' मध्ये...

ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनचा उपक्रम ‘आर्ट फॉर होप – सीझन ३’ मध्ये प्रतिभावान आर्टिस्‍ट्सचा सन्मान

नवी दिल्‍ली । मार्च २८, २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लि. (एचएमआयएल)च्‍या सीएसआर शाखेने त्‍यांच्या प्रमुख ‘आर्ट फॉर होप’ उपक्रमाच्‍या तिसऱ्या पर्वामध्‍ये भारतातील २० प्रांतांमधील ४० अनुदानविजेत्‍यांचा सत्‍कार केल्‍याची घोषणा केली आहे. आर्ट फॉर होप भारतातील संपन्‍न पारंपारिक कला, हस्‍तकला व संस्‍कृतीला निपुण करण्‍यासह चालना देण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. तसेच हा उपक्रम भारतभरातील प्रतिभावान आर्टिस्‍ट्सना प्रकाशझोतात आणण्‍यासाठी उत्तम व्‍यासपीठ आहे. आर्ट फॉर होप – सीझन ३ चे आयोजन २८ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत त्रिवेनी कला संगम, नवी दिल्‍ली येथे करण्‍यात आले आहे. हे चार-दिवसीय प्रदर्शन व वर्कशॉप उदयोन्‍मुख आर्टिस्‍ट्स, तरूण, महिला, समुदाय व स्‍थानिक टॅलेंटला व्‍यासपीठ प्रदान करते, ज्‍याला एचएमआयएफ अनुदानांचे पाठबळ आहे.

इंडियन कौन्सिल फॉर कल्‍चरल रिलेशन्‍स (आयसीसीआर) चे डायरेक्‍टर जनरल श्री. कुमार तुहिन, प्रतिष्ठित कथ्‍थक आर्टिस्‍ट्स व पद्मश्री पुरस्‍कार-प्राप्‍त श्रीमती कमलिनी व श्रीमती नलिनी आस्‍थाना आणि ह्युंदाई मोटर इंडिया लि. चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. उन सू किम यांनी आर्ट फॉर होप – सीझन ३ च्‍या उद्घाटन समारोहाप्रसंगी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. ह्युंदाईचा जागतिक दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’शी संलग्‍न असलेला उपक्रम आर्ट फॉर होप कलेचे लोकशाहीकरण करण्‍याचा प्रयत्‍न करतो, आर्टिस्‍ट्सना त्‍यांची प्रतिभा व सर्जनशीलता दाखवण्‍यासाठी राष्‍ट्रीय व्‍यासपीठ प्रदान करतो. हा उपक्रम व्हिज्‍युअल आर्ट, डिजिटल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, पारंपारिक लोककला आणि सांस्‍कृतिक समुदाय कला अशा विविध कला क्षेत्रांमध्‍ये पसरलेला आहे.

आर्ट फॉर होप – सीझन ३ च्‍या उद्घाटनीय इव्‍हेण्‍टप्रसंगी मत व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लि. चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. उन सू किम म्‍हणाले, ”ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन ह्युंदाईचा जागतिक दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’ अंतर्गत वंचितांसाठी संधी व उदरनिर्वाह निर्माण करण्‍याकरिता विविध क्षेत्रांमध्‍ये काम करत आहे. कला व आर्टिस्‍ट्सप्रती आदर व्‍यक्‍त करत आम्‍ही आर्ट फॉर होपच्‍या पहिल्‍या दोन पर्वांमध्‍ये विविध समुदायांशी संलग्‍न झालो आणि आमच्‍या ताफ्यामध्‍ये कला संग्रहांची भर केली. यंदा, आम्‍ही अधिकाधिक जीवन संपन्‍न करण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये विकलांग आर्टिस्‍ट्सचा समावेश करत आमचे प्रयत्‍न दृढ करण्‍यासह आमची पोहोच वाढवली आहे. नवीन गोष्‍टींवर लक्ष केंद्रित करत आम्‍ही सर्वसमावेशकता आणि संबंधित अनेक पैलूंचे कौतुक करतो. आर्टिस्‍ट्स आपल्‍याला जगातील विविध गोष्‍टींची झलक दाखवतात, तसेच आपण पाहू न शकणाऱ्या गोष्‍टींची जाणीव करून देतात. हा अद्वितीय पैलू व जागतिक दृष्टिकोन आहे, ज्‍याची ह्युंदाईमध्‍ये आम्‍ही प्रशंसा करतो.”

२०२१ मध्‍ये सुरू करण्‍यात आलेला उपक्रम आर्ट फॉर होप भारतातील प्रत्‍येक राज्‍यामध्‍ये पोहोचला आहे आणि १०० हून अधिक आर्टिस्‍ट्सना याचा फायदा झाला आहे. गेल्‍या तीन वर्षांपासून एचएमआयएफ कला व संस्‍कृतीला चालना देण्‍याप्रती समर्पित असून १०० अनुदान दिले आहे, ज्‍यांचे मूल्‍य जवळपास १.०५ कोटी रूपये आहे आणि एकूण गुंतवणूकीने ५ कोटी रूपयांचा टप्‍पा पार केला आहे. या उपक्रमांचा देशभरातील ११,००० हून अधिक आर्टिस्‍ट्स व कारागिरांना फायदा झाला आहे. आर्ट फॉर होप – सीझन ३ मध्‍ये सुप्रसिद्ध ज्‍युरी पॅनेलच्‍या सूक्ष्‍म मूल्‍यांकन प्रक्रियेनंतर प्रकल्‍प संकल्‍पना व परिणाम, आर्टिस्‍ट पोर्टफोलिओ आणि त्‍यांची संबंधित पार्श्‍वभूमी या निकषांच्‍या आाधरावर ४७० प्रवेशिकांमधून ४० आर्टिस्‍ट्सची निवड करण्‍यात आली.

या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून सहभागींना सामाजिक, भावनिक व आर्थिक पाठिंबा मिळण्‍यासोबत मान्‍यतेसाठी व्‍यासपीठ देखील मिळते, जे उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी अधिक संधी व बाजारपेठ संलग्‍नतेकरिता स्प्रिंगबोर्ड म्‍हणून कार्य करते. या प्रदर्शनामध्‍ये पारंपारिक कला व हस्‍तकला, पेंटिंग्‍ज, आर्ट इन्‍स्‍टॉलेशन्‍स, फोटोग्राफ्स व परफॉर्मिंग आर्ट्स, तसेच ३० आर्टिस्‍ट्सच्‍या अनुदान सहाय्याने तयार व क्‍यूरेट केलेल्‍या कलाकृती प्रदर्शित केल्‍या जातील. एचएमआयएफच्‍या ‘अॅबिलिटी फॉर डिग्निटी’ उपक्रमामधील १० विकलांग आर्टिस्‍ट्सच्‍या कलाकृती देखील प्रदर्शित केल्‍या जातील.

हे ४-दिवसीय प्रदर्शन विकलांग अभ्‍यागतांसाठी ब्रेल लिपी, स्‍पर्श कलाकृती आणि सांकेतिक भाषेचे वर्णन यांचा वापर करत सर्वसमावेशकतेला प्राधान्‍य देते.

अनुदान प्रदर्शनाव्‍यतिरिक्‍त तरूणांसाठी अनेक वर्कशॉप्‍स व चर्चासत्रांचे आयोजन करण्‍यात येईल जसे कॅलिग्राफी, मास्‍क मेकिंग मोबाइल फोटोग्राफी, पारंपारिक पेंटिंग इत्‍यादी. जागतिकीकृत विश्‍वामध्‍ये सांस्‍कृतिक शाश्‍वतता, सामाजिक परिवर्तनासाठी उत्‍प्रेरक म्‍हणून सर्वसमावेशक आर्ट्स व कलासाठी गरज या विषयांसंदर्भात सांस्‍कृतिक व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित प्रवक्‍ते पॅनेल चर्चा देखील करणार आहेत.

या ४-दिवसीय महोत्‍सवादरम्‍यान एचएमआयएफने पाठबळ दिलेल्‍या वंचित पार्श्‍वभूमीमधील ५० तरूण चेंज-मेकर्ससाठी नुकतेच आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘मायमोबाइलमूव्‍ही’ वर्कशॉपदरम्‍यान तयार करण्‍यात आलेल्‍या १० सर्वोत्‍कृष्‍ट चित्रपटांचे विशेष स्क्रिनिंग देखील करण्‍यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments