Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकमान्य जीवन गौरव पुरस्कार उल्हास पवार यांना जाहीर पुणे परिवारच्या वतीने विविध...

लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार उल्हास पवार यांना जाहीर पुणे परिवारच्या वतीने विविध गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान

पुणे : पुणे परिवारच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नेते आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वाजता सदाशिव पेठेतील स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये होणार आहे. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे परिवारचे अॅड. प्रताप परदेशी, विनायक घाटे आणि शिरीष मोहिते यांनी दिली.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यास कृषिमंत्री दत्ता भरणे, आमदार हेमंत रासने, विजयकुमार कुवळेकर, जन्मेजयराजे भोसले, पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त संजय दराडे, कृषिकेश रावले, सुनील रासने, अण्णा थोरात, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित राहणार आहेत.

आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कारासाठी नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष परेश हराळे, देशप्रेमी मित्र मंडळ, एरंडवणेचे कार्यकर्ते मंदार बलकवडे, विद्यानगरी मित्र मंडळ, धनकवडीचे अध्यक्ष प्रतीक कुंभार, अखिल रामनगर मित्र मंडळ, येरवडाचे अध्यक्ष राकेश चव्हाण आणि श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट, तुळशीबागचे अध्यक्ष सागर दहिभाते यांची निवड झाली आहे.

गणेश सेवा पुरस्कारासाठी मानस गोईलकर तसेच तृतीयपंथीय सर्व वादकांचे शिखंडी वाद्यपथक यांची निवड करण्यात आली आहे. गणराया गुणगौरव विशेष सन्मानासाठी पराग प्रभाकर बंगाळे आणि येरवडा मध्यवर्ती कारागृहातील पुंडलिक वासुदेव खलोरकर यांची निवड झाली आहे.

पुणे परिवारच्या वतीने मागील २१ वर्षांपासून लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार, आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार आणि गणेश सेवा पुरस्कार देण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments