प्रगत इंडस्ट्रियल कनेक्टिविटीद्वारे अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि फ्युचर-रेडी मायनिंगची निर्मिती
आघाडीची टेलिकॉम कंपनी ‘वी’ ची व्यावसायिक शाखा असलेल्या ‘वी बिझनेस’ने, आज ॲल्युमिनियम आणि तांबे क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी ‘हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड’सोबत एका धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीअंतर्गत, ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यातील हिंदाल्कोच्या बाफलीमाली बॉक्साईट खाणीत एक डेडिकेटेड प्रायव्हेट नेटवर्क तैनात केले जाईल.
बाफलीमाली ही हिंदाल्कोच्या धोरणात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बॉक्साईट खाणकामांपैकी एक असून, त्यांच्या एकात्मिक ॲल्युमिनियम मूल्य साखळीसाठी उच्च दर्जाच्या बॉक्साईटचा हा एक मुख्य स्रोत आहे. हे नेटवर्क हिंदाल्कोची पहिलीच ‘प्रायव्हेट नेटवर्क अंमलबजावणी’ असून, कंपनीच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि ‘इंडस्ट्री ४.०’ च्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. एकमेकांशी जोडलेल्या, इंटेलिजंट आणि फ्युचर-रेडी खाणी उभारण्याच्या हिंदाल्कोच्या दूरदृष्टीला अनुसरून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हा बहुवर्षीय मॅनेज्ड सर्व्हिसेस करार संपूर्ण प्रायव्हेट नेटवर्क स्टॅक व्यापतो; ज्यामध्ये स्पेक्ट्रम, कोअर, रॅन आणि व्यवस्थापन सेवांचा समावेश आहे. हे नेटवर्क हिंदाल्कोच्या कनेक्टेड मायनिंग प्रवासाचा डिजिटल कणा म्हणून काम करेल, ज्यामुळे संपूर्ण खाण क्षेत्रात सुरक्षित आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी सक्षम होईल.
वीच्या प्रायव्हेट नेटवर्कच्या साहाय्याने हिंदाल्कोला कामगारांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना, फ्लीट मॅनेजमेंट, ड्रोन आणि सीसीटीव्ही आधारित पाळत, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि ऑपरेशन्सची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देणारे विविध डिजिटल युज केसेस तैनात करणे शक्य होईल. या बदलाचा एक मुख्य आधारस्तंभ म्हणजे इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर; जे खाणकामावर एकाच ठिकाणाहून दृश्यमानता, डेटावर आधारित निर्णय प्रक्रिया आणि संपूर्ण खाणकामावर नियंत्रण मिळवून देईल. हे केंद्र हिंदाल्कोच्या अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम डिजीमाइनच्या व्हिजनला बळ देईल. हे ॲप्लिकेशन्स ऑपरेशन्सची रिअल-टाइम दृश्यमानता, कामगारांची वाढीव सुरक्षा आणि अधिक कार्यक्षम खाणकामास मदत करतील.
सुरक्षित, विश्वासार्ह आणि उच्च दर्जाची कामगिरी करणारी कनेक्टिव्हिटी देण्यासाठी तयार करण्यात आलेले हे नेटवर्क, अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम खाणकामासाठी एक स्केलेबल डिजिटल पाया उपलब्ध करून देईल.
हे सहकार्य वीचे एंटरप्राइझ कनेक्टिव्हिटीमधील कौशल्य आणि हिंदाल्कोची फ्युचर-रेडी, तंत्रज्ञान-सक्षम खाणकाम उभारण्याची दूरदृष्टी यांना एकत्र आणते. तसेच नवोन्मेष, ऑपरेशनल एक्सलन्स आणि शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या समूहाच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे.
डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि फ्युचर-रेडी पायाभूत सुविधा तसेच कामकाजाच्या माध्यमातून दोन कंपन्या कशा प्रकारे प्रगत डिजिटल तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीचा वापर करून महत्त्वाच्या उद्योगांचे आधुनिकीकरण करत आहेत, भारताची औद्योगिक स्पर्धात्मकता मजबूत करत आहेत आणि विकसित भारताच्या व्यापक संकल्पनेला हातभार लावत आहेत, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
वी बिझनेसचे चीफ एंटरप्राइझ बिझनेस ऑफिसर एम. पी. सुनील कुमार म्हणाले, “या ऐतिहासिक उपक्रमात हिंदाल्कोसोबत भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही अंमलबजावणी गुंतागुंतीच्या औद्योगिक वातावरणासाठी कस्टमाइज्ड प्रायव्हेट नेटवर्क्स डिझाइन करण्याच्या आमची क्षमता अधोरेखित करते. सुरक्षित आणि उच्च कार्यक्षमतेच्या कनेक्टिव्हिटीची सांगड स्केलेबल आर्किटेक्चरसोबत घालून आम्ही पुढील पिढीच्या इंटेलिजंट मायनिंगला सक्षम करत आहोत आणि हिंदाल्कोच्या दीर्घकालीन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या व्हिजनला पाठबळ देत आहोत.”
हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ॲल्युमिनियम अपस्ट्रीमचे सीईओ कैलाश पांडे म्हणाले, “हिंदाल्कोमध्ये, फ्युचर-रेडी ऑपरेशन्स उभारण्याच्या आमच्या व्हिजनसाठी डिजिटायझेशन आणि इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञान अत्यंत केंद्रस्थानी आहेत. बाफलीमाली येथील आमचे पहिले समर्पित प्रायव्हेट नेटवर्क हे एकमेकांशी जोडलेल्या, ऑटोमेटेड आणि डेटा-आधारित खाणकामासाठी एक महत्त्वपूर्ण डिजिटल कणा तयार करेल. हा उपक्रम अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम खाणकामाच्या दिशेने आमच्या प्रवासाला बळ देतो, तसेच तंत्रज्ञानावर आधारित मेटल्स कंपनी म्हणून हिंदाल्कोचे स्थान अधिक मजबूत करतो.”
बाफलीमालीचे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हिंदाल्कोच्या जबाबदार खाणकामाच्या उद्दिष्टालाही पूरक ठरते. या खाणीला नुकतेच ॲल्युमिनियम स्टीवर्डशिप इनिशिएटिव्ह परफॉर्मन्स स्टँडर्ड प्रमाणपत्र मिळाले असून, हे प्रमाणपत्र खाणीची जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त पर्यावरण, सामाजिक आणि गव्हर्नन्स मानकांशी असलेली सुसंगतता अधोरेखित करते. प्रगत कनेक्टिव्हिटी आणि जबाबदार खाणकामाच्या पद्धती एकत्रितपणे बाफलीमालीला अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि फ्युचर-रेडी खाणकामामध्ये विकसित करण्यासाठी साह्य करत आहेत.
ही अंमलबजावणी औद्योगिक डिजिटायझेशनसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि एंटरप्राइझ-ग्रेड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यातील वी बिझनेसच्या क्षमतांना अधिक बळकट करते; ज्यामुळे गुंतागुंतीच्या औद्योगिक वातावरणात ऑटोमेशन, उत्पादकता, कामगार सुरक्षा आणि रिअल-टाइम ऑपरेशनल इंटेलिजन्स यावर केंद्रित असणाऱ्या पुढील पिढीच्या ॲप्लिकेशन्सना चालना मिळते.
अत्यंत संवेदनशील आणि मिशन-क्रिटिकल कामकाजासाठी उद्योग जगत समर्पित नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करत असताना, उद्योगांमधील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला गती देणारे सुरक्षित, स्केलेबल आणि फ्युचर-रेडी कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स देण्यासाठी
वी बिझनेस कटिबद्ध आहे.


