Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुचाकी व चारचाकी वाहन क्रमांक आरक्षणासाठी मंगळवार पासून फेसलेस सेवा सुरू*

दुचाकी व चारचाकी वाहन क्रमांक आरक्षणासाठी मंगळवार पासून फेसलेस सेवा सुरू*

*

पुणे, दि. ३१ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी आकर्षक, पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची फेसलेस (ऑनलाईन) सेवा मंगळवार दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात कार्यान्वित असून, कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने शुल्क स्वीकारले जाणार नाही. नागरिकांनी ही सेवा घरबसल्या https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून वापर करता येईल.

फेसलेस सेवा कार्यान्वित असून, अर्जदार आधार लिंक मोबाईल क्रमांकाद्वारे ओटीपी घेऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. नव्याने सुरू होणाऱ्या ‘एम एच ६१ ए’ व ‘एम एच ६१ बी’ मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक अर्जदारांना आरक्षित करता येतील. असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments