बारामतीः येथील बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना बारामती या संघटनेत देशभक्ती व गांधींवादी विचार जागृत ठेवून उल्लेखनिय कार्य केलेबद्दल निलेशभई कोठारी यांचा देशभक्त गौरव करण्यात आला.
रीस्टार्ट एंटरटेनमेंट ग्रुपतर्फे देशभक्ती आणि मराठी, हिंदी पावसाळी गीतांचा कराओके ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक संघटनेत गांधींवादी विचार व देशभक्ती जागृत ठेवून उल्लेखनिय कार्य केलेबद्दल निलेशभई कोठारी, विद्यमान नगरसेवक व दि मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, सांस्कृतिक क्षेत्रात अकबर शेख व नुकताच भारतीय संविधान चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन रणपिसे यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी रीस्टार्ट एंटरटेनमेंटचे अध्यक्ष समीर पठाण, अकॉर्डियन वादक तज्ञ नितीन दोशी, ॲड.नंदकुमार भागवत, पत्रकार तैनुर शेख, श्री.लोंढे इ. मान्यवर उपस्थित होते.
कोठारी कुटुंबीयांचे स्वातंत्र्य मिळविण्यामध्ये खूप मोठे योगदान होते यामध्ये सर्वात जास्त विलासभई कोठारी यांचे आहे. या कुटुंबाचा गांधीवादी विचारांचा वारसा निलेशभई कोठारी यांनी पुढे नेला आहे. अशा कुटुंबियातील सदस्याचा सत्कार व गौरव घेतल्यामुळे ग्रुपचे अभिनंदन केले. सर्वच मान्यवर आप-आपल्या क्षेत्रात उल्लेखनिय व दर्जेदार पद्धतीने काम करीत आहेत त्यांना सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोमनाथ नाळे यांनी केले.
स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेत उल्लेखनिय कार्य केलेबद्दल निलेशभई कोठारी यांचा गौरव*
RELATED ARTICLES


