Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedॲक्सिस म्युच्युअल फंडातर्फे सोने आणि चांदीमधील पद्धतशीर गुंतवणुकीसाठी ‘शगुन एसआयपी’ सादर

ॲक्सिस म्युच्युअल फंडातर्फे सोने आणि चांदीमधील पद्धतशीर गुंतवणुकीसाठी ‘शगुन एसआयपी’ सादर

(गुंतवणूकदारांना डिजिटल पद्धतीने एका वेळी एक ग्रॅम सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा)

उद्योगक्षेत्रातील पहिली डिजिटल पद्धतशीर, सुसूत्र गुंतवणूक सुविधा; ॲक्सिस म्युच्युअल फंडच्या वेबसाइटवर सोने आणि चांदीमध्ये पद्धतशीर गुंतवणुकीची सुविधा सुरू
दीर्घकालीन मौल्यवान धातूंच्या संचयासाठी लवचिक आणि उद्दिष्टाधारित एसआयपी

मुंबई, 31 ऑगस्ट, 2026: भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲक्सिस म्युच्युअल फंडने ‘शगुन एसआयपी’ सुरू केल्याची घोषणा केली आहे. ही उद्योगक्षेत्रातील पहिली डिजिटल पद्धतशीर गुंतवणूक सुविधा असून, याद्वारे गुंतवणूकदारांना ॲक्सिस गोल्ड फंड आणि ॲक्सिस सिल्व्हर फंड ऑफ फंड (“योजना”) मध्ये ग्रॅमच्या स्वरूपात गुंतवणूक करता येणार आहे. या सुविधेमुळे गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्याने आणि आपल्या उद्दिष्टानुसार गुंतवणूक करता येते. विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी साधे सोपे, उपयुक्त आणि मोठ्या प्रमाणावर वापरता येतील असे गुंतवणुकीचे पर्याय विकसित करण्यावर ॲक्सिस म्युच्युअल फंडचा सातत्याने भर असून, शगुन एसआयपी त्याचेच प्रतिबिंब आहे.

गुंतवणूकदार पारंपरिक पद्धतीने सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंची जशी नियमितपणे आणि हळूहळू साठवणूक करत असतात हे लक्षात घेऊन शगुन एसआयपीची रचना करण्यात आली आहे. या परिचित पद्धतीला आधुनिक आणि पूर्णपणे डिजिटल गुंतवणूक अनुभवाची जोड या सुविधेद्वारे देण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने-चांदी बाळगण्याशी संबंधित अडचणी, घडणावळ शुल्क इत्यादींचा सामना न करता, ग्रॅम-ग्रॅमने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदारांना 25 किलो पर्यंत सोने आणि 50 किलो पर्यंत चांदी जमा करता येते. या योजनांच्या अंतर्गत असलेल्या योजनांमधील सर्व गुंतवणूक अनुक्रमे 99.5% आणि 99.9% शुद्धतेच्या सोने आणि चांदीमध्ये केली जाते. त्यामुळे साठवणूक, सुरक्षितता किंवा शुद्धतेशी संबंधित चिंता न करता पारदर्शकता आणि सातत्य राखले जाते.

शगुन एसआयपी द्वारे गुंतवणूकदारांना नियमितपणे कमी रकमेची गुंतवणूक करण्याची आणि ती खरेदी कालांतराने विभागून करण्याची लवचिकता मिळते. स्थिर किमतीऐवजी बदलत्या किमतीनुसार गुंतवणूक करण्याची ही पद्धत कालांतराने मौल्यवान धातूंच्या प्रत्यक्ष किमतीशी गुंतवणुकीचा अधिक चांगला मेळ घालते. वेगवेगळ्या बाजारभावाच्या पातळ्यांवर गुंतवणूक केली जात असल्याने, एका विशिष्ट किमतीवर बाजाराची योग्य वेळ साधण्याऐवजी गुंतवणूकदार संपूर्ण गुंतवणूक कालावधीत खरेदीच्या किमतीची सरासरी साधू शकतात.

शगुन एसआयपी मध्ये उद्दिष्टाधारित गुंतवणुकीवर विशेष भर देण्यात आला आहे. विवाह, संपत्तीचे जतन, शिक्षण यांसारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूकदार अनेक वर्षांच्या कालावधीत विशिष्ट प्रमाणात सोने किंवा चांदी जमा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करू शकतात. त्यानंतर प्रणाली आवश्यक गुंतवणुकीची रक्कम निश्चित करून एक स्पष्ट आणि वैयक्तिकृत गुंतवणूक योजना तयार करते. एखाद्या गुंतवणूकदाराला 10 वर्षांच्या कालावधीत अंदाजे 5 किलो सोन्याइतकी रक्कम जमा करायची असल्यास, शगुन एसआयपी द्वारे ग्रॅमच्या प्रमाणात समतुल्य असलेली गतिमान पद्धतशीर गुंतवणूक रक्कम निश्चित करता येते.

या सुविधेच्या शुभारंभाबाबत बोलताना मुख्य डिजिटल अधिकारी बोनिफेस नॉरोन्हा म्हणाले, “भारतीय गुंतवणूकदारांसाठी सोने आणि चांदी या महत्त्वाच्या मालमत्ता असून त्यांची काळाच्या ओघात सातत्याने साठवणूक केली जाते. शगुन एसआयपी ही या प्रकारातील पहिली डिजिटल सुविधा असून, दीर्घकाळात पद्धतशीरपणे सोने आणि चांदीचा साठा निर्माण करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना पूर्णपणे डिजिटल आणि उद्दिष्टाधारित अनुभव देणारा हा एक उपाय आहे. ॲक्सिस म्युच्युअल फंड आपल्या नाविन्यपूर्ण डिजिटल सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्राहकांचा प्रवास अधिक सोपा करण्यासाठी सातत्याने गुंतवणूक करत आहे. गुंतवणूकदारांचे विविध गट, प्रदेश आणि जीवनातील विविध टप्प्यांसाठी वापरण्यास सोपे आणि उपयुक्त उपाय उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांशी हे सुसंगत आहे.”

शगुन एसआयपी सुरू करून ॲक्सिस म्युच्युअल फंडने मौल्यवान धातूंमधील गुंतवणुकीला एक नवा आयाम दिला आहे. पूर्णपणे डिजिटल अनुभवाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सोने आणि चांदीमध्ये सुसूत्र पद्धतीने पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याचे नियोजन आणि त्यांचा संचय करणे यामुळे शक्य झाले आहे. ही सुविधा ॲक्सिस म्युच्युअल फंडच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

अधिक माहिती व गुंतवणुकीसाठी: Buy Gold and Silver in Grams | Shagun by Axis

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments