चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथे नविन २०० द.ल.ली. क्षमतेचा नवीन प्रकल्प काम सुरु असून, या प्रकल्पाकरिता उच्चदाब वीज पुरवठा करण्यासाठी, दि. ०३/०९/२०२६ (गुरुवार) रोजी उच्चदाब केबल वीजप्रणालीत जोडणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विद्युतविषयक कामे करताना कामगारांच्या व यंत्रणेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर कालावधीत उच्चदाब वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करणे आवश्यक आहे. सदरचे काम दि. ०३/०९/२०२६ (गुरुवार) रोजी करताना सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत उच्चदाब वीजपुरवठा पूर्णपणे बंद करणेमुळे, चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दि. ०३/०९/२०२६ (गुरुवार) रोजी शहरातील बो-हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर ४, ६, ९, ११ व १२, शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, च-होली, डुडुळगाव, चोवीसावाडी व इतर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असुन दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि.०४/०९/२०२६ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
सबब वर नमूद परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते कि, मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून मनपास सहकार्य करावे, हि विनंती.


