29,042 युनिट्सच्या विक्रीसह 48.1% वार्षिक वाढ नोंदवली
2026 मधील YTD विक्री 220,991 युनिट्स, 20.1% वाढ
नुकत्याच लॉन्च झालेल्या Syros EV ला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
Seltos आणि Sonetच्या दमदार कामगिरीमुळे विक्रीतील सातत्यपूर्ण वाढ; Carens Clavis आणि Clavis EVला कायम असलेल्या मागणीची साथ
नवी दिल्ली, भारत, 1 सप्टेंबर 2026: देशातील आघाडीच्या मास-प्रिमियम वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या किआ इंडियाने आज ऑगस्ट 2026 मधील आपली घाऊक विक्रीची आकडेवारी जाहीर केली. कंपनीने मागील वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत 48.1% ची वार्षिक वाढ नोंदवली आहे. किआ इंडियाने ऑगस्ट 2026 मध्ये 29,042 युनिट्स डिस्पॅच केल्या, तर ऑगस्ट 2025 मध्ये ही संख्या 19,608 युनिट्स होती. विविध बॉडी स्टाइल्स आणि पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध किआच्या विस्तारित वाहन पोर्टफोलिओला ग्राहकांकडून मिळत असलेली सातत्यपूर्ण पसंती या वाढीतून दिसून येते. किआ इंडियाच्या स्थापनेनंतर ऑगस्ट महिन्यातील ही आतापर्यंतची सर्वोत्तम घाऊक विक्री कामगिरी आहे.
वर्षभरातही ही सकारात्मक घोडदौड कायम राहिली आहे. 2026 मध्ये किआ इंडियाची आतापर्यंतची घाऊक विक्री 220,991 युनिट्स झाली आहे. 2025 मधील याच कालावधीत झालेल्या 183,882 युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत ही 20.1% पेक्षा अधिक वाढ आहे. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या मोबिलिटी गरजा समजून घेऊन त्यानुसार उत्पादने उपलब्ध करून देण्यावर कंपनीने सातत्याने दिलेला भर ही या कामगिरीमागील प्रमुख कारणे आहेत. यामध्ये पहिल्यांदा SUV खरेदी करणाऱ्या ग्राहकांपासून प्रीमियम, फीचर-रिच आणि वाढत्या इलेक्ट्रिफाइड पर्यायांची अपेक्षा करणाऱ्या ग्राहकांचा समावेश आहे.
वर्षभरातील विक्रीला Seltosने भक्कम आधार दिला असून, जानेवारीमध्ये लॉन्च झाल्यापासून या मॉडेलने दर महिन्याला सातत्याने सरासरी 10,000 पेक्षा अधिक युनिट्सची विक्री नोंदवली आहे. त्याचबरोबर Sonet देखील किआ इंडियाच्या मास-प्रिमियम पोर्टफोलिओमधील ग्राहकांची आवडती मॉडेल ठरली आहे. कॉम्पॅक्ट आणि सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये दोन्ही मॉडेल्स ग्राहकांना डिझाइन, तंत्रज्ञान आणि मूल्य यांचा उत्तम मिलाफ देतात आणि भारतातील किआच्या विक्रीचे प्रमुख आधारस्तंभ ठरले आहेत.
कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओलाही ग्राहकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये नुकत्याच लॉन्च झालेल्या Syros EVचा प्रमुख वाटा आहे. भारतीय ग्राहक इलेक्ट्रिफाइड मोबिलिटीचा वाढत्या प्रमाणात स्वीकार करत असताना, Syros EV विविध पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध करून देण्याच्या किआच्या वचनबद्धतेला आणखी बळकटी देते. ग्राहकांना त्यांच्या जीवनशैली, वापराच्या पद्धती आणि शाश्वततेच्या उद्दिष्टांनुसार योग्य वाहन निवडण्याची सुविधा यामुळे मिळते.
इलेक्ट्रिफिकेशनकडे होत असलेल्या या बदलाला पाठबळ देण्यासाठी किआ इंडियाचा वाढता EV पोर्टफोलिओ उद्योगातील सर्वात मजबूत ओनरशिप प्रपोजिशन्सपैकी एक घेऊन येत आहे. EV स्वीकारताना ग्राहकांना भेडसावणाऱ्या तीन प्रमुख चिंतांवर—किंमत, दीर्घकालीन बॅटरीबाबतचा विश्वास आणि पुनर्विक्री मूल्य—यावर हे प्रपोजिशन लक्ष केंद्रित करते. कंपनीचा इंडस्ट्री-बेस्ट Assured Buyback Programme, Battery-as-a-Service (BaaS) आणि Lifetime High Voltage Battery Warranty भारतीय ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सुलभ, सोयीस्कर आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.
कामगिरीवर भाष्य करताना, किआ इंडियाचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट, सेल्स अँड मार्केटिंग, श्री. अतुल सूद म्हणाले, “ऑगस्टमधील आमची दमदार कामगिरी ही ग्राहकांचा आमच्यावर असलेला सातत्यपूर्ण विश्वास आणि आमच्या विकसित होत असलेल्या प्रोडक्ट पोर्टफोलिओची प्रासंगिकता दर्शवते. Seltos आणि Sonetची सातत्यपूर्ण मागणी कायम असताना, नुकत्याच लॉन्च झालेल्या Syros EVला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद हा इलेक्ट्रिक मोबिलिटीबाबत ग्राहकांची वाढती स्वीकारार्हता दर्शवतो. Assured Buyback, Battery-as-a-Service आणि Lifetime Battery Warranty यांचा समावेश असलेल्या उद्योगातील सर्वात मजबूत ओनरशिप प्रपोजिशन्सपैकी एक आणि आमच्या विस्तारित EV इकोसिस्टमच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या प्रमुख ओनरशिपविषयक चिंतांचे निराकरण करत आहोत आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे होणारे संक्रमण अधिक सुलभ व विश्वासार्ह बनवत आहोत. ग्राहकांच्या अपेक्षा बदलत असताना, अधिक मूल्य, व्यापक पर्याय आणि वेगळा ओनरशिप अनुभव देणारी भविष्यासाठी सज्ज मोबिलिटी सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी Sorentoचे लॉन्च या धोरणाला आणखी पुढे नेईल आणि भारतातील किआच्या प्रीमियम मोबिलिटी प्रपोजिशनला अधिक बळकटी देईल.”
उत्पादनांची वाढती श्रेणी, ओनरशिप फायदे आणि सेवांच्या माध्यमातून किआ इंडिया ग्राहकांच्या वास्तविक गरजा लक्षात घेऊन अधिकाधिक वाहने, पॉवरट्रेन आणि ओनरशिप अनुभवांचे पर्याय उपलब्ध करून देणारा मोबिलिटी पार्टनर म्हणून आपली स्थिती सातत्याने मजबूत करत आहे.
यापुढे किआ इंडिया आपल्या पोर्टफोलिओचा आणखी विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 4 सप्टेंबर 2026 रोजी आपल्या सर्वात यशस्वी जागतिक SUV नेमप्लेट्सपैकी एक असलेल्या Kia Sorentoचे भारतात लॉन्च करणार आहे. Sorento ही भारतासाठी किआची पहिली हायब्रिड SUV असेल. यासोबत शक्तिशाली Diesel powertrainचा पर्यायही उपलब्ध असेल. यामुळे भारतातील नवीन प्रीमियम थ्री-रो SUV सेगमेंटमध्ये किआचा प्रवेश होणार आहे. मोठ्या आणि अधिक प्रीमियम मोबिलिटी सोल्यूशनच्या शोधात असलेल्या ग्राहकांना लक्षात घेऊन Sorento सादर केली जाणार आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजांसोबत विकसित आणि अनुकूल होणारा पोर्टफोलिओ तयार करण्याच्या किआच्या दृष्टिकोनाला Sorento आणखी बळकटी देईल.
किआ इंडियाचे मजबूत देशव्यापी नेटवर्क 418 शहरांमध्ये 910 टचपॉइंट्सपर्यंत विस्तारलेले आहे. यामुळे शहरी तसेच उदयोन्मुख बाजारपेठांमधील ग्राहकांना कंपनीच्या विक्री, सर्व्हिस आणि ओनरशिप सपोर्टपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचता येते. याशिवाय, 137 Certified Pre-Owned आउटलेट्स ग्राहकांना तत्काळ पेमेंट, सुलभ एक्सचेंज आणि त्रासमुक्त ओनरशिप अनुभव उपलब्ध
करून देतात.


