Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर घरातूनच चार...

पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर घरातूनच चार प्रकारे कचरा विलगीकरण करण्याचे महापालिकेचे आवाहन

पिंपरी : २ सप्टेंबर २०२६ : कचरा विलगीकरण आणि योग्य कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी योग्य कचरा अशा चार प्रकारे विलगीकरण, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले. पथनाट्यानंतर नागरिकांना स्वच्छता शपथही देण्यात आली.

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने चार प्रकारे कचरा विलगीकरण करण्याबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात पथनाट्य, जनजागृती मोहीम आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे.

 

 

 

“शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेसोबत नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कचरा निर्माण होण्याच्या ठिकाणीच त्याचे योग्य विलगीकरण झाल्यास कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारावी,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

 

 

 

“कचरा विलगीकरण हा प्रभावी कचरा व्यवस्थापनाचा पाया आहे. नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी, विशेष काळजी योग्य कचरा स्वतंत्रपणे देण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये असे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले.

 

 

 

पथनाट्यातून दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य विलगीकरण न केल्याने उद्भवणाऱ्या समस्या तसेच कचरा व्यवस्थापनात नागरिकांची भूमिका याबाबत प्रभावीपणे संदेश देण्यात येत आहे.

 

 

 

शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी कचरा विलगीकरणासह महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments