Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedवयाच्या 17 व्या वर्षी 200 किलो वजन, 11 शस्त्रक्रिया अन् सेप्सिसशी झुंज;...

वयाच्या 17 व्या वर्षी 200 किलो वजन, 11 शस्त्रक्रिया अन् सेप्सिसशी झुंज; नैरोबीच्या महिलेचा पुण्यात ‘पुनर्जन्म’

अनेक शस्त्रक्रियांनंतर पोटात गंभीर संसर्ग आणि लीक; जगण्याची शक्यता केवळ 20 टक्के असताना लँपरो ओबेसो सेंटर, पुणे येथे गुंतागुंतीच्या लॅप्रोस्कोपिक व एंडोस्कोपिक उपचारांनी वाचवले प्राण

पुणे: वजन कमी करण्यासाठी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे गेल्या 15 वर्षांत तब्बल 11 शस्त्रक्रिया झालेल्या नैरोबीतील 32 वर्षीय महिलेला पुण्यातील डॉक्टरांनी अत्यंत गंभीर अवस्थेतून वाचवले आहे. गंभीर पोषणतत्त्वांची कमतरता, पोटातील संसर्ग, सेप्सिस आणि शस्त्रक्रियेनंतर पोटात झालेल्या लीकमुळे तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. तिच्या जगण्याची शक्यता केवळ 20 टक्के असल्याचा अंदाज असताना लॅपरो ओबेसो सेंटर (LOC), पुणे येथील बॅरिअॅट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. शशांक शाह आणि त्यांच्या टीमने लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया व एंडोस्कोपिक उपचारांच्या मदतीने तिचे प्राण वाचवले.

नैरोबीतील मसाबा (नाव बदलले आहे) हिचे वजन वयाच्या 17 व्या वर्षी जवळपास 200 किलो होते. वजन कमी करण्यासाठी 2011 मध्ये तिच्यावर स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी करण्यात आली. त्यानंतर वजन कमी झाले; मात्र पुन्हा वाढल्याने 2015 मध्ये गॅस्ट्रिक बायपास करण्यात आला. 2020 मध्ये दुबई येथे तिच्यावर आणखी एक मोठी रिव्हिजन शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तिच्या शरीरात पोषणतत्त्वांची गंभीर कमतरता निर्माण झाली. अशक्तपणा आणि वारंवार बेशुद्ध पडण्याचे प्रकारही सुरू झाले.

2026 मध्ये या समस्यांवर उपचार करण्यासाठी मुंबईत तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर तिची प्रकृती आणखी गंभीर झाली. शस्त्रक्रियेच्या पाचव्या दिवशी पोटात जवळपास दोन लिटर पू जमा झाला. तो ड्रेनेजद्वारे बाहेर काढण्यात आला; मात्र पुन्हा पू जमा झाला आणि पोटातील लीक कायम राहिली. ती घेत असलेले द्रव पदार्थही ड्रेनेज ट्यूबमधून बाहेर येत होते. संसर्ग वाढून सेप्सिस झाला. ती इतकी अशक्त झाली की चालण्यासाठीही व्हीलचेअरची गरज भासू लागली.

या अवस्थेत तिच्या कुटुंबीयांनी डॉ. शशांक शाह यांच्याशी संपर्क साधला. जून महिन्यात तिला LOC पुणे येथे दाखल करण्यात आले. तपासणीत पूर्वीच्या 11 शस्त्रक्रियांमुळे पोटातील अवयव व ऊती मोठ्या प्रमाणात एकमेकांना चिकटल्याचे, पोटातील जोड पूर्णपणे तुटल्याचे तसेच गंभीर संसर्ग असल्याचे आढळले.

डॉ. शशांक शाह म्हणाले, “ती आमच्याकडे आली तेव्हा तातडीने शस्त्रक्रिया करणेही अत्यंत धोकादायक होते. तिच्या जगण्याची शक्यता सुमारे 20 टक्के होती. त्यामुळे सर्वप्रथम पोषणतत्त्वांची कमतरता भरून काढणे, रक्त व आयर्न देणे, अँटिबायोटिक्सद्वारे संसर्ग नियंत्रणात आणणे आणि फिजिओथेरपीच्या मदतीने तिला शस्त्रक्रियेसाठी सक्षम करणे आवश्यक होते. त्या अवस्थेत तिने मला एकच गोष्ट सांगितली होती — ‘डॉक्टर, मला फक्त जगायचं आहे.’”

प्रकृती काही प्रमाणात स्थिर झाल्यानंतर तिच्यावर गुंतागुंतीची लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रो-गॅस्ट्रिक री-अॅनास्टोमोसिस शस्त्रक्रिया करण्यात आली. यात पोटाचे तुटलेले भाग पुन्हा जोडण्यात आले. मात्र वारंवार झालेल्या शस्त्रक्रिया आणि संसर्गामुळे ऊतींची जखम भरून येण्याची क्षमता कमी होती. त्यामुळे एंडोस्कोपीच्या मदतीने स्टेंट बसवण्यात आला. उपचारादरम्यान दर आठवड्याला एंडोस्कोपी करून स्टेंटची तपासणी करण्यात आली आणि चार ते पाच वेळा त्याची जागा बदलण्यात आली.

अनेक आठवड्यांच्या उपचारांनंतर लीक पूर्णपणे बरी झाली आणि संसर्ग नियंत्रणात आला. जवळपास अडीच महिन्यांनंतर मसाबा पुन्हा पूर्ण आहार घेऊ लागली. तिला 86 किलो वजन असताना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता ती स्वतः चालू शकते आणि दैनंदिन कामेही स्वतंत्रपणे करू शकते.

मसाबा म्हणाली, “इतक्या शस्त्रक्रिया आणि त्रासानंतर एक वेळ अशी आली होती की पुढे काय होईल हेही मला माहीत नव्हते. डॉ. शशांक शाह आणि त्यांच्या टीमने मला पुन्हा जगण्याची संधी दिली. आज मी स्वतः चालू शकते, सामान्य जेवण करू शकते आणि घरी परतत आहे, हे माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.”

डॉ. शाह म्हणाले, “अनेक शस्त्रक्रिया, गंभीर सेप्सिस आणि अत्यंत खराब पोषणस्थितीमुळे हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे होते. अशा परिस्थितीत केवळ शस्त्रक्रिया नव्हे, तर एंडोस्कोपी, पोषण व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, फिजिओथेरपी आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय देखरेख या सर्वांचा एकत्रित उपचार महत्त्वाचा ठरला.”

Thanks & Regards,

Suvarnlata Gholap

PR Executive

Gloocal Communication

Email – suvarna.gloocalpr@gmail.com

Mobile No. – 7045900872/ 9326042629

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments