Thursday, September 3, 2026
Google search engine
HomeUncategorized*दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल* *४ व ५ सप्टेंबर रोजी...

*दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल* *४ व ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन*

 

 

 

पुणे, दि. ३: श्रीकृष्ण जयंती व दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक शाखेने ४ व ५ सप्टेंबर रोजी आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल केले आहे.

 

फडके हौद परिसरात ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. जिजामाता चौक, सोन्या मारुती चौक, गणेश रोड तसेच फडके हौद परिसरातील वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. शिवरकर रोडवरही ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून वाहतूक बंद करण्यात येणार असून, संविधान चौक, साळुंखे विहार रोड, फ्लॉवर व्हॅली लेन आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

 

 

याशिवाय लष्कर, वारजे, समर्थ, बंडगार्डन आणि काळेपडळ वाहतूक विभागांच्या हद्दीतही गर्दीच्या परिस्थितीनुसार विविध मार्गांवर वाहतुकीचे नियमन व मार्गबदल करण्यात येणार आहेत. काही ठिकाणी वाहतूक एकेरी करण्यात येणार असून, काही मार्ग पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

दहीहंडी उत्सवाच्या काळात नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, उपलब्ध पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी केले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments