पुणे,7 सप्टेंबर 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने 2030 पर्यंत आपल्या कार्यकारी कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे.वैविध्यपूर्ण आणि भविष्यासाठी सुसज्ज अशी कुशल मनुष्यबळाची फळी तयार करण्यासाठी कंपनीच्या प्रयत्नांमधील हे महत्त्वाचे पाऊल आहे.सध्या एचएमआयएल मध्ये 4000 हून अधिक कार्यकारी कर्मचाऱ्यांपैकी महिलांचे प्रमाण 8 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.त्याचवेळी 2026 मध्ये भरती करण्यात आलेल्या तरूण कर्मचाऱ्यांपैकी (मॅनेजमेंट ट्रेनीज व इंजिनिअर ट्रेनीज) सुमारे 45 टक्के महिला आहेत.
सर्वसमावेशक कार्यस्थळे हे अभिनवता,परस्पर सहकार्य आणि व्यवसायाच्या दीर्घकालीन वाढीला बळकटी देतात. हे उद्दिष्ट या विश्वासाचे प्रतिबिंब आहे.उत्पादन,अभियांत्रिकी,संशोधन व विकास (आरॲन्डडी),विक्री,सेवा,कॉर्पोरेट कार्य व नेतृत्व अशा विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत असून यामुळे कंपनीत वैविध्यपूर्ण दृष्टीकोन आणि कौशल्ये येण्यास मदत होईल.


