Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीमध्ये झाडणकामाकरिता अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे - तीन माजी विरोधी...

पुणे महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीमध्ये झाडणकामाकरिता अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे – तीन माजी विरोधी पक्षनेते यांची मागणी

-पुणे महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीमध्ये झाडणकामाकरिता अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात यावे अशी मागणी पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांच्याकडे तीन माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बने यांनी केली आहे.याविषयी अतिरिक्त आयुक्त प्रवीण नायर यांना  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की

 

आपण स्वतः जागेवर जाऊन ज्या संस्थांना अतिरिक्त मनुष्यबळ पुरवण्यासाठी टेंडर न काढता प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने साडेचार हजार सफाई कामगारांची नेमणूक केली होती त्यांच्या कामाची पाहणी केल्यावर त्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा दाखवला आहे असे आपल्या लक्षात आल्यानंतर आपण त्यांच्यावर कारवाई करून दंड केला याबद्दल नायरसाहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन.

१) रस्ते आणि पडीक हद्दीचे मोजमाप यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. पथ विभागाने मोजलेले रस्ते हे 2200 किलोमीटरचे आहेत, तर घनकचरा विभागाने मोजलेले रस्ते जवळपास 3600 किलोमीटरचे आहेत चौदाशे किलोमीटरचे रस्ते ज्या गुगल मॅप च्या आधाराने दाखवले आणि मनुष्यबळ वाढवून घेतले असे नकाशे माहितीसाठी सोबत जोडत आहोत.

२) उपायुक्त घनकचरा यांनी 2 सप्टेंबर 2026 रोजी सातारा रस्त्याची संयुक्त पाहणी केली होती. या पाहणीमध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा ओला सुका कचरा आणि प्लास्टिक आढळले पदपथ दुभाजक तसेच रस्त्याच्या कडेला धूळ माती साचल्याचे निदर्शनास आले.

३) येरवडा आणि ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कामाची जबाबदारी ज्यांना दिली होती त्याची सात सप्टेंबरला आपण स्वतः पाहणी केली त्यात रस्ते झाडलेले नसल्याचे आढळले.

४) तीन महिने पावसाळ्याच्या कालावधीमध्ये साडेचार हजार अतिरिक्त कामगारांकडून स्वच्छता करणार हा दावा हास्यास्पद असून त्यात मोठा घोटाळा झाला आहे.

५) पुणे महानगरपालिकेचे जवळपास आठ हजार कायमस्वरूपी सफाई कामगार आहेत.

६) कंत्राटदाराला त्याचा एरिया साफसफाईसाठी दिला असं नाही तर त्यांच्या कामगारांची हजेरी देखील त्यांनीच घ्यायची अशी तरतूद केली म्हणजे ठेकेदारांच्या कामगारांवर महानगरपालिकेचे नियंत्रणच नाही.

७) तो एरिया त्यांनी साफ ठेवायचा म्हणजे काय करायचं याची SOP नाही.

A) साहेब रस्ते नेमके किती ?

B) महानगरपालिकेचे कायमस्वरूपी मनुष्यबळ नेमके किती ?

C) ते सध्या कुठे काम करतात ?

D) ठेकेदाराच्या प्रत्येक कामगाराला minimum wages act प्रमाणे 976.63 रुपये एवढी हजेरी आहे

E) 43,94,835 रुपये रोज आपण कंत्राटदारांना साडेचार हजार कामगारांच्या हजेरीपोटी देतो आणि आठ टक्के त्यांचे सुपरव्हिजन चार्जेस 3,51,586 रूपये रोज देत असतो.

D) आपले कायमस्वरूपी कर्मचारी अधिक कंत्राटदारांचे कर्मचारी यांचे कामाचे नियोजन केले तर रोज 25 लाख रुपये वाचू शकतात.

E) आपण या विषयाला वाचा फोडली आहे हा विषय, logical end पर्यंत घेऊन जावा ही विनंती.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments