Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedसारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात झुला उत्सव साजरा* फुले,...

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात झुला उत्सव साजरा* फुले, फळे, भाज्या आणि पर्यावरणपूरक साहित्याच्या सजावटीने मंदिर सजले: विविधरंगी रांगोळ्यांनी खुलले उत्सवाचे वातावरण

 

 

पुणे : श्रावणातील प्रसन्न वातावरण, फुलांचा सुगंध, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि निसर्गाशी नाते सांगणाऱ्या सजावटीने सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर भक्तिमय झाला होता. फुले, विविध प्रकारच्या भाज्या, फळे तसेच इतर पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पक वापर करून मंदिरात करण्यात आलेली आकर्षक सजावट आणि झुल्यावर विराजमान श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवींच्या मूर्तींचे मनोहारी रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.

 

ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल तसेच प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडला. श्रावण महिन्यात देवदेवतांना झुल्यावर विराजमान करून पूजा-अर्चा करण्याची परंपरा आहे. पावसाळ्यात निसर्ग बहरलेला असताना फुले, पाने आणि नैसर्गिक घटकांच्या माध्यमातून देवतांची सजावट करण्याची प्रथा विविध ठिकाणी पाहायला मिळते. या परंपरेला पर्यावरणपूरकतेची जोड देत यंदाच्या झुला उत्सवात सजावटीसाठी फुले, भाज्या, फळे आणि अन्य पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर करण्यात आला.

 

मंदिर परिसरात साकारलेल्या विविधरंगी रांगोळ्या, फुलांची आरास आणि झुल्याची आकर्षक सजावट यामुळे उत्सवाचे सौंदर्य अधिक खुलले. दररोज सायंकाळी ७.१५ वाजता दर्शनाची व्यवस्था होती, तर सायंकाळी ७.४५ वाजता झुला विशेष महाआरती करण्यात आली. उत्सवादरम्यान भाविकांनी सहकुटुंब दर्शन घेत आरतीचा लाभ घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments