Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedअमृत’तर्फे ११ सप्टेंबरपासून विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन* *विविध संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन*

अमृत’तर्फे ११ सप्टेंबरपासून विश्वबंधुत्व पंधरवड्याचे आयोजन* *विविध संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. 10 स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणातून जगाला दिलेला सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, मानवता, परस्पर सन्मान आणि विश्वबंधुत्वाचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीच्यावतीने (अमृत) यावर्षीपासून ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’साजरा करण्यात येणार आहे.

 

‘अमृत’ संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास, उद्योजकता, शैक्षणिक व आर्थिक प्रगती तसेच सामाजिक व सांस्कृतिक जाणीव वाढविणारे विविध उपक्रम राबविले जातात. समता, सामाजिक न्याय, बंधुत्व, सामाजिक ऐक्य, मानवता ही मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना समाजजीवनात अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित विश्वबंधुत्व पंधरवड्याच्या कार्यक्रमात ‘विविधतेतून एकता, एकतेतून बंधुता आणि बंधुतेतून सशक्त समाज व समर्थ राष्ट्र!’ या विचाराने प्रेरित होऊन संस्था, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले केले आहे.

 

*‘शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ विशेष आकर्षण*

या पंधरवड्याचे प्रमुख आकर्षण ‘शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ असून स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणातील विचार समजून घेऊन ते दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सहभागी संस्थांनी आपल्या स्तरावर विविध स्पर्धा, चर्चासत्रे, व्याख्याने, जनजागृतीपर उपक्रम तसेच मूल्याधिष्ठित कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

*शैक्षणिक, सामाजिक व विविध संस्थांचा सहभाग*

या अभियानात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच विविध खाजगी आस्थापनांनी सक्रिय सहभाग घ्यावा, प्रत्येक संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रानुसार उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

*ऑनलाइन नोंदणीचे आवाहन*

या अभियानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी https://vbd.mahaamrut.org.in या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असून, या संस्थांनी आपल्या स्तरावर या अभियानांतर्गत विविध उपक्रम आयोजित करावेत, असेही कळविण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments