Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedकामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते...

कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!

 

 

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी)१० सप्टेंबर २०२६: कामगार आणि श्रमिकांच्या हक्कासाठी गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्या हस्ते (दि.८) स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी सोहळ्यात संघटनेच्या सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त केला.

 

मराठी पत्रकार संघाच्या वतीने ऑटो क्लस्टर सभागृहामध्ये एका विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.पद्मश्री गिरीशजी प्रभुणे,विधान परिषदेचे आमदार श्री अमितजी गोरखे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ.विजयजी सूर्यवंशी, दैनिक लोकमतचे संपादक संजयजी आवटे यांनी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले व पत्रकार संघाने योग्य निवड या सन्मानासाठी केली याकरिता समाधान व्यक्त केले.

 

 

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ कष्टकरी, कामगार आणि श्रमिकांच्या हक्कासाठी, न्याय्य मागण्यांसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत लढाऊ व निस्वार्थपणे काम केले आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभरातील कामगार वर्गात एक हक्काचा आणि विश्वासाचा चेहरा म्हणून ओळख निर्माण केली असून कामगार आणि कंपन्यांमधील व्यवस्थापनामध्ये समन्वय साधत असतानाच, कर्मचाऱ्यांना त्यांचे कायदेशीर हक्क, योग्य वेतन आणि योग्य न्याय कायदेशीर मार्गाने मिळवून दिला आहे.

 

कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी सातत्याने घेतलेले श्रम आणि विविध पातळ्यांवर दिलेला लढा हा कामगार चळवळीसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या याच निष्ठावान आणि कर्तृत्ववान सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. कामगार चळवळीला नवी दिशा देणारे आणि तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देणारे एक अभ्यासू व आक्रमक नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.हा बहुमोल पुरस्कार आयुष्यातील अत्यंत आठवणीत राहणारा आणि प्रदीर्घ संघर्षाची पावती देणारा क्षण असल्याची भावना कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.

 

तसेच, राजकीय संपादिका (मुंबई) श्रीमती मृणालिनी नानिवडेकर, दै. पुढारीचे संपादक श्री. सुनीलजी माळी, न्यूज १८ मराठी मुंबईचे सहसंपादक श्री. विशालजी परदेशी, सकाळ पुणेचे ज्येष्ठ पत्रकार श्री. राज काची, आणि लेटसअप पुणेचे संपादक श्री. योगेशजी कुटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विधानसभा अध्यक्ष मा. श्री. राहुलजी नार्वेकर यांची ‘आमदारांचे हेडमास्टर’ या विषयावर विविध मुद्द्यांवर प्रकट मुलाखत घेतली, ज्याला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

 

विधानसभा अध्यक्ष मा.श्री राहुल जी नार्वेकर, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजयजी सूर्यवंशी, एस एम बी पी स्कूल चे चेअरमन डॉक्टर डी के भोसले, ऑटो संघटनेचे अध्यक्ष श्री बाबा कांबळे, दान से उडान चे संस्थापक श्री रवी घाटे, आवटी ग्रुप चे चेअरमन श्री बाबासाहेब आवटी यांचाही विशेष सन्मान देऊन यावेळी गौरवण्यात आले.

 

हा भव्य व अद्वितीय सोहळा यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री किरणजी जोशी, प्रदेश उपाध्यक्ष श्री. विवेकजी इनामदार, आणि प्रदेश सचिव श्री. हरिभाऊ प्रक्षाळे यांनी अत्यंत सुंदर व नेटके नियोजन केले होते. कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षे अविरत लढा देणाऱ्या श्री. यशवंतभाऊ भोसले यांचा झालेला हा सन्मान राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे. या समारंभात विशेष सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments