आता ग्राहक त्यांच्या कनेक्टेड वाहनाच्या डॅशबोर्डद्वारे थेट इंधनासाठी पैसे भरू शकतील आणि एक्स्ट्रारिवॉर्ड्स पॉइंट्स मिळवू शकतील
मुंबई,10 सप्टेंबर 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने एनपीसीआय आणि टोनटॅग यांच्या सहकार्याने टाटा डॉट कार्स साठी इंडियनऑइल रिटेल आउटलेट्सवर भारतातील पहिले इन-कार पेमेंट सोल्यूशन लाँच केले आहे. हे लाँच ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2026 दरम्यान करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्राहकांना त्यांच्या कनेक्टेड वाहनांच्या डॅशबोर्डद्वारे थेट आणि सुरक्षितपणे इंधनाचे पेमेंट करता येणार आहे. हा उपक्रम मोबिलिटी क्षेत्रातील डिजिटल पेमेंटचा अनुभव अधिक प्रगत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
हे सोल्यूशन एनपीसीआय च्या यूपीआय सर्कल फ्रेमवर्कमधील “इंट्रोडक्शन ऑफ आयओटी डिव्हाईसेस अँड सॉफ्टवेअर ऑन द यूपीआय इकोसिस्टिम” या उपक्रमाचा लाभ घेत असून, कनेक्टेड वाहनांद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देते. इंधन भरल्यानंतर ग्राहकांना स्वतंत्र मोबाइल ऍप, कार्ड किंवा इतर कोणत्याही पेमेंट पद्धतीचा वापर न करता त्यांच्या वाहनाच्या इंटरफेसद्वारे व्यवहार पूर्ण करता येईल.
या सोल्यूशनमध्ये इंडियनऑइल च्या एक्स्ट्रारिवॉर्ड्स लॉयल्टी कार्यक्रमाचेही एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र ग्राहकांना व्यवहारादरम्यान आपला मोबाइल क्रमांक शेअर न करता रिवॉर्ड पॉइंट्स मिळवता येतील.
इंडियनऑइल चे विस्तृत इंधन रिटेल नेटवर्क,टाटा डॉट कार्स ची कनेक्टेड वाहन परिसंस्था आणि एनपीसीआय ची विश्वासार्ह डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधा यांना एकत्र आणून, हा उपक्रम इंधन भरण्याची प्रक्रिया अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आला आहे.
हे सहकार्य भारताच्या कनेक्टेड मोबिलिटीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या माध्यमातून इंडियनऑइल आपल्या रिटेल आउटलेट्सवर इन-कार पेमेंट अनुभव सुरू करणारा देशातील पहिला इंधन रिटेलर ठरला आहे. तसेच, भविष्यात वाहनामधूनच विविध प्रकारची पेमेंट्स, कॉमर्स आणि डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी यामुळे एक भक्कम पाया तयार झाला आहे.
या अग्रगण्य उपक्रमाच्या माध्यमातून इंडियनऑइल इंधन-विक्री परिसंस्थेमध्ये डिजिटल नवोन्मेषाला सातत्याने चालना देत असून, आपल्या ग्राहकांना सोयीस्कर, तंत्रज्ञानाधारित आणि अधिक रिवॉर्ड्स मिळवून देणारे अनुभव प्रदान करत आहे.
इंडियनऑइल विषयी
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी Maharatna CPSE असून, देशातील सर्वात मोठी रिफायनर कंपनी आहे. देशातील सर्वाधिक समूह रिफायनिंग क्षमता तसेच देशभरात विस्तृत पाइपलाइन, टर्मिनल्स आणि ग्राहक संपर्क केंद्रांचे जाळे इंडियनऑइल कडे आहे. Fortune Global 500 मध्ये सातत्याने स्थान मिळवणारी इंडियनऑइल ग्रीन हायड्रोजन, जैवइंधने, EV पायाभूत सुविधा आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये ऊर्जा संक्रमणाच्या दिशेने पुढे जात आहे. तसेच, कंपनीने आपल्या कार्यात्मक उत्सर्जनासाठी Net-Zero चे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
43,000 हून अधिक रिटेल आउटलेट्सचे इंडियनऑइल चे नेटवर्क हळूहळू एकात्मिक ऊर्जा केंद्रांमध्ये रूपांतरित होत आहे. या केंद्रांवर अधिक स्वच्छ इंधने, EV चार्जिंग, ग्राहक-केंद्रित सेवा आणि उदयोन्मुख ग्राहक-केंद्रित मोबिलिटी सोल्यूशन्स उपलब्ध करून दि
ले जात आहेत.


