Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedआशिष जोशी यांच्या चेसिंग सनराइजेस पुस्तक मालिकेचे पुण्यात प्रकाशन

आशिष जोशी यांच्या चेसिंग सनराइजेस पुस्तक मालिकेचे पुण्यात प्रकाशन

पुणे, ११ सप्टेंबर २०२६ : पुण्यातील एन्ड्युरन्स सायकलपटू, डिझायनर आणि लेखक आशिष जोशी यांच्या चार पुस्तकांच्या चेसिंग सनराइजेस मालिकेचे प्रकाशन नुकतेच कोथरूड येथील अभिनव शाळेत करण्यात आले. ड्रीम्स अनलिमिटेड : चेसिंग सनराइजेस, द अदर साइड ऑफ डॉन, द लाइव्ह्ज वुई ऑलमोस्ट लिव्ह्ड आणि द क्वाएट कॉस्ट ऑफ ड्रीमिंग ही या मालिकेतील चार पुस्तके आशिष जोशी यांच्या एन्ड्युरन्स सायकलिंगमधील प्रवासाचा अनुभव सांगतात.या चार पुस्तकांच्या मालिकेमधून एन्ड्युरन्स सायकलिंग बरोबरच प्रवास,जगातील विविध ठिकाणे,लोकं,संस्कृती यांचे अनुभव या पुस्तकांमध्ये जोशी यांनी मांडले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाकांक्षा, अपयश, जिद्द, नातेसंबंध आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना स्वत:ला आणि कुटुंबियांना मोजावी लागणारी किंमत अशा व्यापक विषयांवरही ही पुस्तके भाष्य करतात. ईशा जोशी, दिव्या ताटे, मोहन सुब्रमणियम,राहुल सोमण यांनी पुस्तकांची प्रस्तावना लिहिली आहे. ही चारही पुस्तके इंग्रजी भाषेतील असून ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत.

 

अभिनेता आणि सूत्रसंचालक सुनील अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी भारतातील एन्ड्युरन्स सायकलिंग क्षेत्रातील आशिष कसोडेकर, राहुल सोमण, विशाल पवार, संतोष पवार आणि दिव्या ताटे, आनंद गंगवाल यांच्यासह आशिष जोशी यांचे डॉक्टर, प्रशिक्षक, सायकलिंगमधील सहकारी, मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.

 

प्रकाशन सोहळ्यात बोलताना आशिष जोशी म्हणाले, जेव्हा मी पहिल्यांदा या संध्याकाळची कल्पना केली, तेव्हा मला वाटले की हा कार्यक्रम सायकलिंगविषयी किंवा कदाचित हा लेखनाविषयी असेल. पण कुठेतरी मला जाणवले की हा सायकलिंग किंवा लेखन यापैकी कशाबद्दलही नाही,तर तो माणसांबद्दल असला पाहिजे. या पुस्तकांच्या माध्यमातून प्रत्येक अध्याय, शर्यत, प्रत्येक अंतिम रेष, सूर्योदय, प्रत्येक अपयश, प्रत्येक पुनरागमन आणि पुस्तकाच्या प्रत्येक पानावर कोणाच्या ना कोणाच्या योगदानाची छाप वाचकांना वाचायला मिळणार आहे.

 

या पुस्तक प्रकाशनासोबतच चेसिंग सनराइजेस – स्टोरीज फ्रॉम द सॅडल या डिजिटल उपक्रमाचीही सुरुवात करण्यात आली. एन्ड्युरन्स स्पोर्ट्समागील कथा आणि अनुभव लोकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

आशिष जोशी यांच्या एन्ड्युरन्स सायकलिंगच्या प्रवासात लंडन- एडिनबर्ग- लंडन, पॅरिस- ब्रेस्ट- पॅरिस, 1001 मिग्लिया इटालिया, रेस अक्रॉस द वेस्ट आणि डेक्कन क्लिफहँजर यांसारख्या आव्हानात्मक स्पर्धांचा समावेश आहे. त्यांनी 2022 मध्ये लंडन- एडिनबर्ग- लंडन, तर 2024 मध्ये सुमारे 1,600 किलोमीटर 1001 मिग्लिया इटालिया स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण

केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments