Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रिकेटच्या मैदानातून रिॲलिटी गेममध्ये : प्राइम व्हिडिओवरील एमएक्स ओरिजिनल ‘राइज अँड फॉल’...

क्रिकेटच्या मैदानातून रिॲलिटी गेममध्ये : प्राइम व्हिडिओवरील एमएक्स ओरिजिनल ‘राइज अँड फॉल’ सीझन 2चा सूत्रसंचालक म्हणून वीरेंद्र सेहवागचे स्ट्रीमिंगमध्ये पदार्पण

बनिजय एशियाची निर्मिती असलेली एमएक्स ओरिजिनल रिॲलिटी सीरिज ‘राइज अँड फॉल’ सीझन 2सह परतणार; वीरेंद्र सेहवाग सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

 

लक्स कोझी या को-पावर्ड बाय पार्टनरसह ओरिएंट इलेक्ट्रिक ऑफिशियल लाइटिंग पार्टनर आणि हायर एआय होम यांसारखे आघाडीचे ब्रँड या शोचे प्रायोजक

 

Promo-https://youtu.be/sPztCvtZ2Ww?si=_yw9D6jB2Fo7b2os

 

 

मुंबई, भारत, 11 सप्टेंबर 2026 : जे वर जाते ते खाली येतेच. पण ‘राइज अँड फॉल’मध्ये खरा प्रश्न आहे, ते कधी खाली येणार हे ठरवणार कोण? सीझन 1मधील सत्ता मिळवण्याच्या चुरशीच्या खेळाने प्रेक्षकांना खिळवून ठेवल्यानंतर प्राइम व्हिडिओने आज ‘राइज अँड फॉल सीझन 2’ची पहिली झलक सादर केली. यावेळी ‘सुलतान ऑफ मुलतान’ वीरेंद्र सेहवाग सूत्रसंचालकाची सूत्रे हाती घेणार आहे. निर्भीड फलंदाजी, हजरजबाबीपणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा सेहवाग या शोमधून स्ट्रीमिंगमध्ये पदार्पण करत आहे. स्कोअरकार्ड बदलण्यापेक्षाही वेगाने नशीब बदलू शकणाऱ्या या गेममध्ये सेहवागच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाचीही झलक पाहायला मिळणार आहे.

 

 

 

प्रोमोच्या सुरुवातीला वीरेंद्र सेहवाग आपल्या खास मिश्कील शैलीत आयुष्यातील चढ-उतारांवर भाष्य करताना दिसतो. त्यानंतर तो ‘राइज अँड फॉल’ सीझन 2च्या अनिश्चिततेने भरलेल्या जगात प्रवेश करतो. या गेममध्ये बरेच काही पणाला लागलेले आहे आणि कोणाचेही स्थान कायमचे निश्चित नाही. प्रत्येक चेंडूचे संधीत रूपांतर करणारा आणि कोणतेही आव्हान स्वीकारण्यास कधीही मागे न हटणारा सेहवाग आता अशा गेममध्ये उतरला आहे, ज्याचे नियम मात्र पूर्णपणे वेगळे आहेत.

 

 

 

पेंटहाउस आणि बेसमेंट अशा दोन अगदी वेगळ्या जगांमध्ये रंगणाऱ्या या गेममध्ये 15 सेलिब्रिटी सहभागी होणार असून, त्यांची ‘रूलर्स’ आणि ‘वर्कर्स’ अशा दोन गटांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. रूलर्सना पेंटहाउसमधील सर्व सुखसोयी आणि विशेष सुविधा मिळणार आहेत, तर वर्कर्सना बेसमेंटमधील वास्तवाचा सामना करावा लागणार आहे. या गेममध्ये प्रत्येक निर्णय, मैत्री आणि खेळी गेमची दिशा बदलू शकते. पैसा आणि प्रभाव यांचीही या खेळात भर पडत असल्यामुळे स्पर्धकांना प्रतिस्पर्धी, मैत्रीची समीकरणे आणि अनपेक्षित आव्हानांचा सामना करताना रणनीती, स्वतःची अंतःप्रेरणा आणि गेमचा अंदाज घेण्याची क्षमता यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. नशीब क्षणात पालटू शकणाऱ्या ‘राइज अँड फॉल’ सीझन 2मध्ये मोठी बाजी लागलेली चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. यात आघाडीवर राहण्यासाठी योग्य खेळी करण्याइतकेच ती नेमकी कधी करायची हे समजणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

 

नव्या सीझनविषयी प्राइम व्हिडिओ इंडियाचे डायरेक्टर आणि हेड ऑफ एव्हीओडी कंटेंट अमोघ दुसाद म्हणाले, “’राइज अँड फॉल’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी दिलेले प्रेम आणि दाखवलेला उत्साह यामुळे हा वेगळ्या प्रकारचा सत्तेचा खेळ पुढे नेण्यासाठी आम्हाला योग्य कारण मिळाले. सीझन 2मध्ये नव्या व्यक्तिमत्त्वांचे स्पर्धक अशा गेममध्ये सहभागी होणार आहेत, जिथे सत्ता सतत बदलत राहते आणि प्रत्येक निर्णयाचे परिणाम भोगावे लागतात. वीरेंद्र सेहवाग सूत्रसंचालक म्हणून सहभागी झाल्यामुळे शोमध्ये एक पूर्णपणे नवी ऊर्जा येणार आहे. त्याचा हजरजबाबीपणा, उत्स्फूर्त स्वभाव आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व या गेमसाठी अगदी योग्य आहे. ‘राइज अँड फॉल’ सीझन 2मधील नाट्य, रणनीती आणि मनोरंजनाचा अनुभव प्रेक्षकांनी घ्यावा आणि प्राइम व्हिडिओवर हा शो मोफत पाहावा, यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

 

बनिजय एशियाचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ दीपक धर म्हणाले, “’राइज अँड फॉल’च्या पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या शोची वेगळी संकल्पना किती प्रभावी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. सत्ता, रणनीती आणि मानवी स्वभाव यांची सांगड घालून अनपेक्षित वळणे घेणारा गेम यातून तयार होतो. सीझन 2मध्ये नव्या व्यक्तिमत्त्वांचे स्पर्धक, नवी समीकरणे आणि आणखी मोठी बाजी यांसह हा अनुभव आम्ही आणखी पुढे नेत आहोत. यामध्ये प्रत्येक निर्णय गेमची दिशा बदलू शकतो. प्राइम व्हिडिओसोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. अनपेक्षित वळणे, रणनीतीने खेळण्यात येणारा गेम आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे क्षण असलेला हा सीझन त्यांच्यासमोर आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

 

 

 

स्ट्रीमिंग सेवेवरील रिॲलिटी शोचे सूत्रसंचालक म्हणून पदार्पण करताना वीरेंद्र सेहवाग म्हणाले, “क्रिकेटने मला एक गोष्ट शिकवली आहे. शेवटचा चेंडू होईपर्यंत कोणताही सामना जिंकलेला नसतो आणि ‘राइज अँड फॉल’ सीझन 2मध्ये ही अनिश्चितता आणखी एका वेगळ्या पातळीवर नेण्यात आली आहे. या गेमचा सूत्रसंचालक म्हणून मला सर्वाधिक उत्सुकता या गोष्टीची आहे की, इथे कोणताही विजय सहज मिळत नाही आणि कोणाचेही स्थान कायमचे ठरलेले नाही. केवळ सर्वोच्च स्थानावर पोहोचणे हे सर्वांत मोठे आव्हान नाही, तर तिथे कसे टिकून राहायचे हे समजणे हे खरे आव्हान आहे. कधी आक्रमण करायचे, कधी बचाव करायचा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गेम तुमचा अंदाज घेण्याआधी तुम्ही गेमचा अंदाज कधी घ्यायचा, हे समजले पाहिजे. पैसा, रणनीती आणि सतत बदलणारी समीकरणे या गेमचा भाग असल्यामुळे गाफील राहून चालणार नाही. स्पर्धक या गेममधून कसा मार्ग काढतात, जोखीम कशी घेतात, कोणाशी हातमिळवणी करतात आणि त्यांच्यात खरोखर किती दम आहे हे कसे दाखवून देतात, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

 

 

 

बनिजय एशियाची निर्मिती असलेल्या एमएक्स ओरिजिनल ‘राइज अँड फॉल’ सीझन 2ची मूळ निर्मिती ब्रिटनमध्ये स्टुडिओ लॅम्बर्टने केली होती. लक्स नायट्रोसारखे आघाडीचे ब्रँड या शोचे प्रायोजक असून लक्स नायट्रो स्पेशल पार्टनर आहे. नवा सीझन लवकरच केवळ प्राइम व्हिडिओ आणि एमएक्स प्लेयर अँड्रॉइड ॲपवर मोफत स्ट्रीम होणार आहे. एमएक्स प्लेयरला आता ‘एमएक्स प्लेयर बाय प्राइम व्हिडिओ’ ही नवी ओळख देण्यात आली आहे. ही भारतातील आघाडीची मोफत, प्रीमियम आणि जाहिरात-आधारित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा असून मोबाइल डिव्हाइस, कनेक्टेड टीव्ही, ॲमेझॉन शॉपिंग ॲप आणि

फायर टीव्हीवर उपलब्ध आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments