Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedजीव वाचवण्यासाठी सीपीआर महत्त्वाचे : डॉ. अजिंक्य शिंदे विश्वराज हॉस्पिटलतर्फे डब्ल्यूपीयूत सीपीआर...

जीव वाचवण्यासाठी सीपीआर महत्त्वाचे : डॉ. अजिंक्य शिंदे विश्वराज हॉस्पिटलतर्फे डब्ल्यूपीयूत सीपीआर व फायर अँड सेफ्टी विषयावर कार्यशाळा

पुणे, दि. 11 सप्टेंबर: जगभरात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे हृदयरोग विषयक आपत्कालीन परिस्थिती. जीव वाचवण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन किंवा सीपीआर. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके थांबतात तेव्हा पहिली काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. सीपीआरचा त्वरित वापर हा जीवन आणि मृत्यू यातील फरक ठरवतो. तरीही अनेक नागरिक हे जीवन वाचवणारे कौशल्य शिकण्यात अपयशी ठरतात. हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत अधिक जीव न वाचले जाण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे सर्वसामान्यांना सीपीआरच्या ज्ञानाचा अभाव असणे, असे विचार माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. अजिंक्य शिंदे यांनी मांडले.

 

विश्वराज हॉस्पिटल आणि माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी सीपीआर व फायर अँड सेफ्टी या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली.

 

यावेळी विश्वराज हॉस्पिटलचे विजय कुमार पाटील, किरण साळवे आणि रेवण सिन्नूरकर उपस्थित होते. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे शेकडो कर्मचारी उपस्थित राहून त्यांनी याचा लाभ घेतला.

 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड व विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला.

 

डॉ. अजिंक्य शिंदे म्हणाले, “सीपीआर हे एक जीवनरक्षक तंत्र आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा श्वास किंवा हृदयाचे ठोके थांबलेले असतात, तेव्हा आपत्कालीन परिस्थितीत हे वापरले जाते. काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय मदत येईपर्यंत शरीरात ऑक्सिजनचा संचार चालू ठेवण्यासाठी तोंडावाटे श्वास दिला जातो. सीपीआरमुळे हृदय आणि मेंदू या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांना होणारा रक्तपुरवठा चालू ठेवण्यास मदत होते. वैद्यकीय प्रशिक्षण नसतानाही कोणीही हे तंत्र करू शकतो आणि डॉक्टरांची मदत मिळेपर्यंत व्यक्तीला जिवंत ठेवणे हा त्याचा उद्देश आहे.”

 

फायर अँड सेफ्टी या विषयावर बोलताना विजय कुमार पाटील म्हणाले की, हॉस्पिटलच्या सुरक्षेसाठी अग्निशामक यंत्रे, फायर अलार्म आणि स्प्रिंकलर, एक्झिट मार्ग, धूर नियंत्रण यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. आगीच्या वेळी रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, अलार्म वाजवून सर्वांना सतर्क करणे, दारे बंद करून आग व धूर पसरण्यापासून रोखणे आणि शक्य असल्यास यंत्राच्या मदतीने आग विझवणे महत्त्वाचे आहे.

 

यावेळी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आग कशी विझवायची हे दाखविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments