Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedअपुरे आरोग्य विमा संरक्षण हे कुटुंबासमोरील वाढते आर्थिक संकट – केअर हेल्थ...

अपुरे आरोग्य विमा संरक्षण हे कुटुंबासमोरील वाढते आर्थिक संकट – केअर हेल्थ इन्शुअरन्सचा इशारा

नवी दिल्ली, १० सप्टेंबर, २०२६ : देशातील लाखो कुटुंबीयांना एखाद्या गंभीर आजाराने ग्रासले असल्यास अनेकदा आर्थिक अडचण निर्माण होते. अशा गंभीर आजाराच्या उपचारांसाठी संबंधित कुटुंबातील अनेक वर्षांची बचत संपते. आजच्या घडीला देशातील जवळपास निम्म्या लोकसंख्येला आरोग्य विमा किंवा आरोग्यविषयक आर्थिक मदत देणा-या योजनांचे संरक्षण मिळत आहे. मात्र, अनेक कुटुंबे अजूनही अपु-या विमा संरक्षणाखाली आहेत. गंभीर आजाराच्या उपचारासाठी लागणा-या खर्चाच्या तुलनेत त्यांचे विमा संरक्षण अनेकदा कमी पडते. त्यामुळे वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडू शकतो. ही परिस्थिती लक्षात घेता, कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आरोग्य विम्याकडे आवश्यक साधन म्हणून पाहा, असे आवाहन केअर हेल्थ इन्शुअरन्सने केले आहे. वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी उपचारांचा खर्च मोठा असल्यास कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम दिसून येतो. आरोग्याच्या बाबतीतील आर्थिक भार कमी करण्यासाठी कुटुंबांनी पुरेसे आणि योग्य आरोग्य विमा संरक्षण घ्यायला हवे.

अनेक भारतीय कुटुंबे आरोग्य विम्याच्या नियमितपणे आढावा घेत नाहीत. काही कुटुंबे केवळ नोकरीच्या ठिकाणी मिळणा-या सामूहिक आरोग्य विम्यावर अवलंबून असतात. मुळात वैद्यकीय उपचारांच्या खर्चात सातत्याने वाढ दिसून येत आहे. अनेक माणसांच्या उत्पन्नवाढीपेक्षाही वैद्यकीय उपचारांचा खर्च हा जास्त वेगाने वाढतो. त्यामुळे सध्याच्या आरोग्य विम्याचे संरक्षण गंभीर आजाराच्या उपचारासाठी अपुरी ठरू शकते. पूर्वी २ ते ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण पुरेसे असायचे. परंतु सद्यस्थितीत गंभीर स्वरुपातील आजारांच्या उपचारांत संपूर्ण खर्च भागवण्यापूर्वीच ही रक्कम संपण्याची शक्यता असते. विमा संरक्षणाची रक्कम संपल्यानंतर कुटुंबांना उपचारांचा खर्च भागवण्याठी आपली बचत वापरावी लागते. काही वेळा मालमत्ता किंवा इतर मौल्यवान वस्तूही विकाव्या लागतात. अनेक कुटुंबांना कर्जही घ्यावे लागते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित संकट हे दीर्घकालीन आर्थिक ओझ्यात बदलते.

हा परिणाम केवळ संबंधित कुटुंबीयांपुरता मर्यादित राहत नाही. भारतात आरोग्यसेवेसाठी स्वतःच्या खिशातून करावा लागणारा खर्च हा कुटुंबांच्या आर्थिक अडचणींचे प्रमुख कारण ठरत आहे. यामुळे कुटुंबांना अशा आर्थिक संकटांचा सामना करता यावा, यासाठी व्यापक आरोग्य विमा संरक्षणाची गरज आहे. आरोग्य विम्याचे व्यापक कवच उपलब्ध झाल्यास कुटुंबांची आर्थिक स्थितरता मजबूत होईल. तसेच, प्रत्येक नागरिकाला आरोग्यसेवा उपलब्ध करुन दिल्याने राष्ट्रीय पातळीवरील सार्वत्रिक आरोग्यसेवेचे उद्दिष्ट पूर्ण होईल.

अलीकडेच जाहीर झालेला सरकारी अहवाल आणि देशपातळीवरील आरोग्यविषयक मूल्यमापनातून आरोग्य विमा संरक्षणातील ही तफावत स्पष्ट होते :

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य लेखा अंदाजानुसार, भारतातील एकूण आरोग्य खर्चापैकी ४३.४ टक्के खर्च हा भारतीय कुटुंबांकडून स्वतःच्या खिशातून केला जातो. वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत उपचारांचा खर्च हा कुटुंबांसाठी मोठे आर्थिक आव्हान करत असल्याचे, यातून स्पष्ट होते.

अपुरे आर्थिक संरक्षण : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या २०२५ मधील आरोग्यविषयक सर्व्हेक्षणात घरगुती उपभोग खर्च मांडण्यात आला. अनेक भारतीय कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल होण्याचा खर्चाचा मोठा आर्थिक ताण स्वतः झेलावा लागतो, असे या सर्व्हेक्षणात नमूद करण्यात आले आहे. केवळ आरोग्य विमा असून आजारांतील उपचारांचा सर्व खर्च भागवता येत नाही. विमा संरक्षणातून उपचारांचा प्रत्यक्ष खर्च कितपत भागवता येतो, हेदेखील महत्त्वाचे आहे.

अपुरे विमा संरक्षण : नोकरीच्या ठिकाणी मिळणा-या सामूहिक आरोग्य विमा योजनांमध्ये तसेच सुरुवातीच्या स्तरावरील कुटुंबासाठीच्या सामायिक विमा संरक्षणामध्ये साधारणपणे ३ ते ५ लाखांचे विमा संरक्षण मिळते. मात्र, गंभीर आजाराच्या उपचारासाठी अनेक पटीने जास्त खर्च होतो. यकृत प्रत्यारोपणासाठी साधारणपणे १८ ते ३६ लाखांपर्यंत खर्च अपेक्षित असतो. कर्करोगावर मात करण्यासाठी आता अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. कर्करोग तसेच हृदयरोगाशी संबंधित आव्हानात्मक उपचारांसाठी आता लाखो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे आज माझ्याकडे केवळ आरोग्य विमा आहे का, हा प्रश्न विचारणे पुरेसे नाही. माझ्याकडे पुरेसे आरोग्य विमा संरक्षण आहे का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.

आरोग्यसेवेवरील वाढता खर्च पाहता केअर हेल्थ इन्शुअरन्सने प्रत्येक कुटुंबीयांची आर्थिक सुरक्षितता मजबूत राहावी, याकरिता पुढील उपाययोजना सूचवल्या आहेत:

दरवर्षी आरोग्य विम्याचा आढावा घ्या: कुटुंबाच्या आरोग्यविषयक गरजा, वास्तव्यास असलेले शहर आणि सध्याच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च लक्षात घेता विम्याची रक्कम निश्चित करणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी पुरेसे वाटणारे विमा संरक्षण आजच्या उपचारांचा खर्च भागवण्यासाठी अपुरे ठरू शकते.

आपल्या विमा योजनेची माहिती जाणून घ्या: तुमच्या योजनेमध्ये रुग्णालयाच्या खोलीच्या भाड्यासाठी कितपत रक्कम मिळते, उपचाराच्या खर्चापैकी किती रक्कम स्वतः भरावी लागते आणि कोणत्या उपचारांसाठी विमा संरक्षणाची मर्यादित रक्कम, याची माहिती अगोदरच जाणून घ्या. तसेच, विम्याची रक्कम संपल्यानंतर ती पुन्हा उपलब्ध होण्याची सुविधा आणि दावा न केल्यास मिळणारे अतिरिक्त लाभ आदींबाबतही माहिती घ्या. त्यामुळे विम्याचा दावा करताना अपेक्षित खर्च टाळता येतील.

नोकरदार कंपनीने देऊ केलेल्या विम्यावर अवलंबून राहू नका: नोकरीच्या ठिकाणी मिळणारा आरोग्य विमा महत्त्वाचा आहे. मात्र, त्याची रक्कम ३ ते ५ लाखांपर्यंत मर्यादित असते. अनेकदा या विम्यात आई-वडिलांचा समावेश नसतो. नोकरी सोडल्यावर हे विमा संरक्षणही संपुष्टात येते. त्यामुळे योग्य वेळी वैयक्तिक आरोग्य विमाच कामी येतो. विमा संरक्षणातही खंड पडत नाही. कमी वयात आणि सुदृढ प्रकृतीत आरोग्य विमा योजना सुरु केल्यास प्रतीक्षा कालावधी पूर्ण करता येतो. तसेच, तुलनेने, कमी हफ्यात विमा संरक्षणही मिळते.

अतिरिक्त विमा संरक्षण घ्या: मूलभूत आरोग्य विम्यासोबत अतिरिक्त विमा संरक्षण घेता येते. यामुळे तुलनेने कमी अतिरिक्त खर्चात विम्याचे एकूण संरक्षणही वाढते. कर्करोग, हृदयाशी संबंधित उपचार आणि अवयव प्रत्यारोपणासारख्या महागड्या उपचारांचा खर्च भागवण्यासाठी हे अतिरिक्त संरक्षण उपयुक्त ठरते.

पालक आणि कुटुंबातील अवलंबित सदस्यांसाठी पुरेसे विमा संरक्षण घ्या: कुटुंबातील केवळ एका सदस्याला गंभीर आजाराचे निदान झाल्यास संपूर्ण कुटुंबासाठी असलेली विमा रक्कम संपते. त्यामुळे ज्येष्ठ कुटुंबीय आणि आपल्यावर अवलंबून असलेल्या सदस्यांसाठी पुरेसे आरोग्य विमा संरक्षण आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.

आजच्या काळात पुरेसा आरोग्य विमा घेणे, ही केवळ ऐच्छिक बाब राहिलेली नाही. आरोग्य विमा हा प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. गंभीर आजार किंवा अचानक उद्भवणा-या वैद्यकीय परिस्थितीमुळे मोठा खर्च होऊ शकतो. अशा वेळी पुरेसे विमा संरक्षण असल्यास कुटुंबाची अनेक वर्षांची बचत अशा आजारांच्या उपचारांतील अवाढव्य खर्चापासून वाचवते. कुटुंबाच्या बदलत्या गरजा, वाढता वैद्यकीय खर्च लक्षात घेत पुरेसे विमा संरक्षण आहे की नाही, हे वेळोवेळी तपासले पाहिजे. योग्य वेळी विमा संरक्षणात आवश्यक बदल न केल्यास वैद्यकीय आणीबाणीच्या काळात मोठ्या आर्थिक अडचणी टाळता येऊ शकतात. तसेच, उपचारांचा खर्च भागवण्यासाठी बचत संपवणे किंवा कर्ज घेण्याची वेळ येण्याची शक्यताही कमी होते. त्यामुळे पुरेसा आरोग्य विमा कुटंबाला भविष्यातील वैद्यकीय खर्चासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम तसेच सरक्षित ठेवतो.

लोकांना आरोग्य विमा योजनेची तपशीलवार माहिती मिळावी, याकरिता केअर हेल्थ इन्शुअन्स प्रयत्नशील आहे. याकरिता केअर हेल्थ इन्शुअन्स लोकांना आरोग्य विम्यातून मिळणारी आर्थिक सुबत्ता मिळण्यासाठी कटिबद्ध आहे. योग्य माहितीच्या आधारे घेतलेले निर्णय कुटुंबांना भविष्यातील आरोग्यविषयक खर्चासाठी तत्पर राहण्यास

  • मदत करतात.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments