गुरुग्राम, ०३ एप्रिल २०२४: एअर इंडियाने आज आपला बदललेला फ्लाइंग रिटर्न्स लॉयल्टी प्रोग्राम सादर केला. त्यामध्ये एक साधीसरळ नवीन रचना, अधिक ग्राहक-अनुकूल वैशिष्ट्ये, नवीन स्तर आणि अद्ययावत ओळख आहे. सुधारित फ्लाइंग रिटर्न्स कार्यक्रम सदस्यांना झटपट जागतिक दर्जा आणि जगभरात विशेषाधिकार पुरवित सदस्यांसाठी अधिक सुलभता, अधिक बक्षिसे आणि ओळख यांना प्राधान्य देते.
एका दशकाहून अधिक काळातील त्यांच्या पहिल्या सुधारणेमध्ये, फ्लाइंग रिटर्न्स कार्यक्रम किती मैल अंतर पार केले यावर आधारित पॉईंट्स मिळणे या मॉडेलपासून दूर जात अधिक योग्य, अधिक न्याय्य खर्च-आधारित दृष्टिकोनाकडे वळत आहे.
फ्लाइंग रिटर्न्स सदस्य नवीन कार्यक्रमाच्या फायद्यांचा आनंद घेऊ शकतील आणि आजपासून नवीन संरचनेवर आधारित गुण गोळा करू शकतील.
“फ्लाइंग रिटर्न्स मध्ये सुधारणा हे ‘नवीन’ एअर इंडिया ज्या प्रकारे ग्राहकांना सेवा देण्याचा आणि त्यांना आनंद देण्याच्या प्रयत्नांत आहे त्या मार्गाने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. गेल्या वर्षभरात आम्ही ५०,००० हून अधिक ग्राहकांचे म्हणणे ऐकले, माहिती गोळा केली आणि सर्वोत्तम लॉयल्टी ऑफरच्या समोर आमच्या कार्यक्रमाचे मापदंड प्रस्थापित केले. संपूर्ण डिजीटल सुधारणांसह या सखोल अभ्यासामुळे आज आम्हाला अधिक मजबूत आणि मूल्यधिष्ठित कार्यक्रम सादर करण्यात अभिमान वाटतो आहे,” असे एअर इंडियाचे मुख्य व्यावसायिक आणि परिवर्तन अधिकारी निपुण अग्रवाल म्हणाले.
“आम्हाला खात्री आहे की आगामी काळात फ्लाइंग रिटर्न्स कार्यक्रमात आम्ही अधिक मोलाची भर घालणार असल्यामुळे हा परिवर्तीत कार्यक्रम जागतिक लॉयल्टी प्रोग्राममध्ये आघाडीवर असेल.”
पुनर्कल्पित फ्लाइंग रिटर्न्स कार्यक्रमाचे काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
· अधिक खर्च करा, अधिक कमवा: फ्लाइंग रिटर्न्स हा आता खर्चावर आधारित कार्यक्रम बनल्यामुळे, सदस्य आता त्यांनी उड्डाण केलेल्या अंतरापेक्षा प्रति फ्लाइट तिकिटावर खर्च केलेल्या रकमेवर आधारित फ्लाइंग रिटर्न्स पॉइंट्सची रक्कम जमा करू शकतील. अशा प्रकारे उड्डाण केलेल्या मैलांपेक्षा खर्च केलेल्या पैशासाठी अधिक मूल्य ग्राहकांना मिळेल.
· एव्हरग्रीन पॉइंट्स: सदस्यत्व स्तर कोणताही असला तरी जोपर्यंत सदस्य दर २४ महिन्यांत एअर इंडियाच्या किमान एका फ्लाइटने प्रवास करत असेल तर मग फ्लाइंग रिटर्न्स पॉइंट्स आता कधीही कालबाह्य होणार नाहीत.
· कोणत्याही ब्लॅकआउट तारखा नाहीत आणि कोणतेही निर्बंध नाहीत: विक्रीसाठी उपलब्ध असलेली कोणतीही एअर इंडिया विमानाची सीट खरेदी करण्यासाठी सदस्य फ्लाइंग रिटर्न पॉइंट्स रिडीम करू शकतात. त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत.
· रोख + पॉइंट्स: सदस्य आता त्यांच्या अवॉर्ड फ्लाइटचे पैसे फ्लाइंग रिटर्न पॉइंट्स आणि रोख अशा दोन्हीचा वापर करून देऊ शकतील. त्यायोगे ग्राहकांना अधिक लवचिकता मिळेल.
· जागतिक पोहोच आणि मूल्य: भारताचा जागतिक स्तरावरील सर्वात कनेक्टेड लॉयल्टी प्रोग्राम म्हणून, फ्लाइंग रिटर्न्सचे सदस्य जगभरात २५ इतर स्टार अलायन्स पार्टनर एअरलाइन्सवर पॉइंट मिळवू शकतात किंवा रिडीम करू शकतात. या जागतिक नेटवर्कमध्ये संबंधित क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम सेवा देणाऱ्या गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या विमान कंपन्यांचा समावेश होतो. या नेटवर्क मुळे सदस्य जगभरातील ७०० पेक्षा जास्त ठिकाणच्या फ्लाइट्ससाठी रिडीम करू शकतात.
· जागतिक स्थान: सदस्य जगभरातील सर्व स्टार अलायन्स सदस्य एअरलाइन्सवर फ्लाइंग रिटर्न्स टियर विशेषाधिकारांचा आनंद घेतील. तसेच लागू सदस्यत्व श्रेणी स्तर असलेल्यांसाठी जगभरातील १,००० हून अधिक लाउंजमध्ये अॅक्सेस करू शकतील.
· रीनेम्ड मेंबरशिप टियर्स: फ्लाइंग रिटर्न्स चार मेंबरशिप टियर लेव्हल्स सादर करत राहतील त्यांची नावे बदलली आहेत: रेड (‘बेस’ वरून), सिल्व्हर (‘सिल्व्हर एज’ वरून), गोल्ड (‘गोल्डन एज’ वरून), आणि प्लॅटिनम (‘द महाराजा क्लब’ वरून).
· प्राधान्य आणि प्रीमियम वन-स्टॉप सदस्य सेवा: सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम सदस्यांना वन-स्टॉप सदस्य सेवा संपर्क केंद्रामध्ये प्रवेश असेल. ते सदस्यांच्या कोणत्याही चौकशी आणि विनंत्या त्वरित पुरविण्याचा अखंड अनुभव देतील.
अधिक सदस्यांसाठी अधिक पर्याय – फ्लाइंग रिटर्न्सच्या नवीन अवतारात, नवीन वैशिष्ट्यांसह प्रत्येकासाठी सादर करण्याकरता अधिक गोष्टी आहेत. जसे की:
· कौटुंबिक बंध: सदस्य त्यांचे फ्लाइंग रिटर्न पॉइंट्स त्यांच्या कुटुंबातील इतरांसोबत मोफत एकत्र करू शकतील. त्यामुळे त्यांना लवकर प्रवासासाठी ते रिडीम करता येईल.
· थेट बुकिंगचा फायदा: सदस्यांना थेट एअर इंडियाच्या वेबसाइटवर (airindia.com) किंवा मोबाइल ॲपवर फ्लाइट बुकिंग करताना खर्च केलेल्या प्रत्येक १०० रु. साठी २ अतिरिक्त बोनस फ्लाइंग रिटर्न पॉइंट्स मिळतील.
· फ्लाइंग रिटर्न्स पॉइंट्स गोळा करण्यासाठी अधिक पर्याय: सदस्य आता एअर इंडियाच्या नॉन-एअरलाइन भागीदारांच्या विस्तृत श्रेणीतूनही फ्लाइंग रिटर्न पॉइंट्स देखील गोळा करू शकतात. त्यामध्ये कार भाड्याने घेणे, हॉटेलमध्ये राहणे, खरेदी करणे, जीवनशैलीविषयक अनुभव आणि बरेच काही समाविष्ट आहे.
एअर इंडिया निश्चित ठराविक वेळी फ्लाइंग रिटर्न सदस्यांना विस्तृत प्रवास फायदे आणि विशेषाधिकार सादर करण्यासाठी नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड तसेच इतर लोकप्रिय ब्रँडसह भागीदारी सादर करेल.
खालील तक्त्यामध्ये प्रत्येक चार फ्लाइंग रिटर्न्स मेंबरशीप टियर्ससह येणाऱ्या वैशिष्ठ्यांचा आणि विशेषाधिकारांचा तपशील आहे
सदस्यत्व लाभ
रेड
सिलव्हर
गोल्ड
प्लॅटिनम
पात्रता निकष
लागू नाही
15000 पॉइंट्स किंवा 30 फ्लाइट्स
30000 पॉइंट्स किंवा 60 फ्लाइट्स
45000 पॉइंट्स किंवा 90 फ्लाइट्स
एअर इंडिया, स्टार अलायन्स फ्लाइट्स आणि लाईफस्टाइल पार्टनर यांच्यासंदर्भात मिळवा
आहे
आहे
आहे
आहे
एअर इंडिया आणि स्टार अलायन्सच्या फ्लाइटवर पॉइंट्स खर्च करा
आहे
आहे
आहे
आहे
नावनोंदणी बोनस
1000 गुण
लागू नाही
लागू नाही
लागू नाही
प्रायॉरिटी आणि प्रीमियम वन-स्टॉप ग्राहक सेवा
लागू नाही
आहे
आहे
आहे
आयटीनरी बदलांवर फी माफी* – देशांतर्गत Al वर
लागू नाही
प्रति तिकीट 1000 रुपये फ्लॅट फी
डीपार्चर पूर्वी 24 तासांपर्यंत प्रति तिकिट एक विनामूल्य बदल
डीपार्चर पूर्वी 24 तासांपर्यंत प्रति तिकिट दोन विनामूल्य बदल
आयटीनरी बदलांवर फी माफी* – Al आणि स्टार वर आंतरराष्ट्रीय साठी
लागू नाही
लागू नाही
डीपार्चर पूर्वी 72 तासांपर्यंत प्रति तिकिट एक विनामूल्य बदल
डीपार्चर पूर्वी 24 तासांपर्यंत प्रति तिकिट दोन विनामूल्य बदल
प्रवासाचा कार्यक्रम रद्द करण्यावर फी माफी* देशांतर्गत Al वर
लागू नाही
लागू नाही
प्रस्थानापूर्वी २४ तासांपर्यंत १,१९९ रु. ची फ्लॅट फी
प्रस्थानापूर्वी २४ तासांपर्यंत विनामूल्य
सीट निवडीवर सूट* – Al ऑपरेटेड फ्लाइट
लागू नाही
केवळ देशांतर्गत क्षेत्रावरील स्टँडर्ड सीटवर 50% सूट (प्रमोशनल ऑफर)
विविध नेटवर्कवर
स्टँडर्ड सीटवर 100% सूट
विविध नेटवर्कवर
सर्व सीटवर 100% सूट
फ्लाय अर्ली* एअरपोर्टवर लाभ देशांतर्गत Al वर
लागू नाही
लागू नाही
आहे
आहे
समर्पित काउंटरवर प्राधान्य चेक-इन
लागू नाही
आहे
आहे
आहे
एअर इंडियाच्या फ्लाइटवर अतिरिक्त सामान भत्ता**
लागू नाही
+10 किलो (प्रमोशनल ऑफर)
+20 किलो किंवा 23 किलो पर्यंत 1 बॅग
+20 किलो किंवा 23 किलो पर्यंत 1 बॅग
Al
ओन्ड/स्टार/कॉन्ट्रॅक्टेड लाउंजमध्ये लाउंज प्रवेश (1 अतिथीसह).
लागू नाही
लागू नाही
आहे
आहे
प्रायोरिटी बोर्डिंग
लागू नाही
आहे
आहे
आहे
प्रायोरिटी सामान वितरण
लागू नाही
आहे
आहे
आहे
केबिन अपग्रेड व्हाउचर* एअर इंडिया फ्लाइट्ससाठी देशांतर्गत
लागू नाही
१अपग्रेड व्हाउचर
२अपग्रेड व्हाउचर
३अपग्रेड व्हाउचर
*अटी आणि नियम लागू
Earn Structure
येथे दर्शविलेले रिवॉर्ड पॉइंट्स आणि टियर पॉइंट्स हे प्रति १०० रु. खर्चावर आहेत. एअर इंडिया वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर थेट बुकिंग केल्यास सदस्यांना अतिरिक्त २ बोनस रिवॉर्ड पॉइंट्स प्रति १०० रु.वर मिळतात.
1994 मध्ये सादर करण्यात आलेला, एअर इंडियाचा फ्लाइंग रिटर्न्स कार्यक्रम हा भारतातील सर्वात जुना, मोठा इतिहास असलेला फ्रिक्वेंट फ्लायर प्रोग्राम आहे. या कार्यक्रमात याआधीची सुधारणा २०१२ मध्ये करण्यात आली होती.
गेल्या ९० दिवसांत, एअर इंडियाने अतिथी टचपॉइंट्सवर आपली नवीन जागतिक ब्रँड ओळख प्रस्थापित करणे सुरू केले आहे. एक नवीन ग्राहकाभिमुख वेबसाइट आणि मोबाइल ॲप सादर केले आहे. केबिन आणि कॉकपिट क्रूसाठी गणवेशाच्या नवीन कलेक्शनचे अनावरण केले असून भारतीय ख्यातनाम क्यूटरियर, मनीष मल्होत्रा यांनी ते डिझाइन केलेले आहेत. एअरबस A350 विमान आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे.


