Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedएएनपी रन पुणे रन' धर्मादाय अर्ध मॅरेथॉन शर्यतीत ३०००धावपटू सहभागी

एएनपी रन पुणे रन’ धर्मादाय अर्ध मॅरेथॉन शर्यतीत ३०००धावपटू सहभागी

पुणे, ३ एप्रिल २०२४ – रिअल इस्टेट डेव्हलपरमधील एक अग्रगण्य कंपनी असलेल्या एएनपी कॉर्पच्या वतीने वंचित समुदायाच्या समर्थनार्थ आयोजित ‘एएनपी रन पुणे रन’ अर्धमॅरेथॉनमध्ये शहरांतील ३००० धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा ७ एप्रिल २०२४ रोजी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर पार पडणार आहे.

 

स्पर्धेतील फुल(पूर्ण)मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ ३.३० वाजता, तर अर्धमॅरेथॉन स्पर्धेचा फ्लॅगऑफ सकाळी ५.३० वाजता होणार आहे. फुल(पूर्ण)मॅरेथॉनसाठी २ लूप असणार असून अर्धमॅरेथॉन शर्यतीसाठी १ लूप असणार आहे.

 

धर्मादायाच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी ही शर्यत रनबडीजच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे. वंचित समुदायातील लोकांना आरोग्य सेवेमध्ये महत्वपूर्ण मदत करताना त्यांच्या निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीसाठी होणाऱ्या प्रत्येक नोंदणी शुल्काचा उपयोग हा एएनपी केअर फाऊंडेशनच्या वतीने अशा वंचित समुदायासाठी वापरला जाईल.

 

एएनपी कॉर्पचे संचालक ऋषी अडवाणी म्हणाले, सामाजिक जबाबदारीचे भान कंपनीने कायम राखले आहे. एएनपी कॉर्पमार्फत आम्ही अशा वंचित समुदायातील व्यक्तींवर मूर्त प्रभाव पाडण्यासाठी वचनबद्ध आहोत. याचेच प्रतिबिंब ‘एएनपी रन पुणे रन’ या अर्ध मॅरेथॉन शर्यतीच्या आयोजनातून दिसून येते. एएनपी केअर फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूना आवश्यक सेवा देण्याचे आमचे ध्येय्य आहे.

 

एएनपी कॉर्पचे संचालक सौरभ अडवाणी म्हणाले, शारीरिक क्रियाकलापांच्या पलिकडे असलेल्या या उपक्रमाचे नेतृत्व करताना आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या सामाजिक कल्याण आणि सर्वसमावेशकतेसाठी आयोजित करण्यात आलेली ‘एएनपी रन पुणे रन’ हाफ मॅरेथॉन आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण देते. आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी या शर्यतीचे आयोजन म्हणजे आम्ही उचललेले पुढचे पाऊल म्हणता येईल.

 

एएनपी कॉर्पचे संचालक श्री, तनुज फेरवानी म्हणाले, आम्ही या शर्यतीचे आयोजन करताना सर्वसमावेशक स्वरुपावर भर दिला आहे. ‘एएनपी रन पुणे रन’ अर्ध मॅरेथॉन विविध पार्श्वभूमीतील सहभागींचे स्वागत करते. तुम्ही अनुभवी धावपटू असाल किंवा एखाद्या उदात्त हेतूला पाठिंबा देऊ इच्छित असाल अशा प्रत्येकाचे शर्यतीत स्वागत आहे. एकत्र मिळून काम केल्यास आपण गरजूंच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवू शकतो.

 

या उपक्रमातंर्गत २१ कि.मी. अर्ध मॅरेथॉन, १० कि.मी., ५ कि.मी. फन रन, ३ कि.मी. फन रन आणि वॉक अशा विविध शर्यती होणार आहेत. सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला टी-शर्ट, पदक, गुडी बॅग, टायमिंग चिप, नाश्ता, हायड्रेशन, रुट सपोर्ट आणि ई-प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक साहित्य पुरवले

जाणार आहे.

Previous article
अधिक सुलभता, बक्षिसे आणि सदस्यांना मान्यता देण्यासाठी एअर इंडिया ‘फ्लायिंग रिटर्न्स’ लॉयल्टी कार्यक्रमाच्या स्वरूपात बदल · किती मैल अंतर पार केले या दृष्टिकोनापासून दूर जात खर्च-आधारित मॉडेलचा अवलंब करण्यावर फ्लाइंग रिटर्न्सचा भर · सक्रिय सदस्यांसाठी पॉइंट मुदत संपण्याची मर्यादा नाही · ‘कॅश+पॉइंट्स’ रिडेम्शन पर्यायासह कोणत्याही ब्लॅकआउट तारखा नाहीत आणि अवॉर्ड तिकीट यादी नेहमी-उपलब्ध · जगभरातील स्टार अलायन्स पार्टनर एअरलाइन्सवर समान श्रेणीचे विशेषाधिकार, संकलन आणि पूर्तता · व्यवहारांसाठी वन-स्टॉप-प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी नवीन ग्राहक-अनुकूल डिजिटल इंटरफेस
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments