Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडसर्च तर्फे सीएसआर वीक 2026 निमित्त विविध उपक्रम

इंडसर्च तर्फे सीएसआर वीक 2026 निमित्त विविध उपक्रम

पुणे, 16 सप्टेंबर 2026 : इंडसर्च इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च तर्फे 7 ते 12 सप्टेंबर 2026 या कालावधीत सीएसआर वीक 2026 निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 14 विद्यार्थी गटांनी वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती जनजागृती, कापडी पिशव्यांचे वाटप, कचरा व्यवस्थापन, प्राणी कल्याण, वृद्धाश्रम व अनाथाश्रम भेटी, करिअर मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता, सायबर व रस्ता सुरक्षा, आरोग्य जनजागृती आणि पुस्तक वाटप यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

 

या सीएसआर वीक मुळे विद्यार्थ्यांना केवळ वर्गाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष सामाजिक कार्याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. या माध्यमातून त्यांच्यात सहानुभूती, सांघिक कार्य, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची भावना विकसित होण्यास मदत होईल. आर.ए.ए.एच इको- गार्डियन्स, डाऊन टू अर्थ, रिन्यू क्रू,प्रोजेक्ट आसरा,बुक सायकल, ऑपरेशन्स ऑक्सिजन, टेरा4 आणि सेफ स्ट्रीट इनिशिएटिव्ह यांसह विविध विद्यार्थी गटांनी या उपक्रमात सक्रिय योगदान दिले.

 

सीएसआर वीक 2026 च्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून केपीआयटी टेक्नोलॉजिज लि.चे स्ट्रॅटेजिक अकाऊंटस (भारत,चीन आणि साऊथ ईस्ट एशिया) व्यवसाय विकास विभागाचे संचालक अंबर गोखले उपस्थित होते. तसेच कल्पक सोल्युशन्स आणि बीऑनट्रॅक सोल्युशन्स प्रा.लि.चे संस्थापक संदीप गोहाड उपस्थित होते. दोन्ही पाहुण्यांनी उद्योजकता, उद्योगक्षेत्र तसेच समाजावर सकारात्मक आणि अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

हा उपक्रम इंडसर्चच्या संचालिका डॉ.अपर्णा टेंबूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सीएसआर वीकच्या समन्वयक डॉ. बिदिशा सरखेल यांनी या संपूर्ण उपक्रमाचे समन्वय साधत उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

समारोप समारंभात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी गटांचा गौरव करण्यात आला. यामध्ये आर.ए.ए.एच ला बेस्ट सीएसआर प्रोजेक्ट पुरस्कार, ईको – गार्डियन्सला बेस्ट कम्युनिटी इम्पॅक्ट पुरस्कार, डाऊन टू अर्थ ला बेस्ट प्रेझेंटेशन फॉर सीएसआर पुरस्कार, रिन्यू क्रू यांना बेस्ट टीमवर्क साठी आणि बेस्ट डॉक्युमेंटेशनसाठी रिश्ता ग्रुपला पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

सीएसआर वीक 2026 सकारात्मक वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमातून सामाजिकदृष्ट्या जबाबदार, संवेदनशील आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज व्यावसायिक घडवण्याच्या इंडसर्चच्या वचनबद्धतेला अधोरेखित करण्यात आले.

 

सहभागी व्हा.स्वयंसेवक बना.सक्षम करा.चला,एकत्रितपणे सकारात्मक ब

दल घडवूया !

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments