Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिरो मोटोकॉर्पकडून भारताच्या कला प्रकारांचा गौरव करत फेस्टिव्ह २०२६ चा शुभारंभ

हिरो मोटोकॉर्पकडून भारताच्या कला प्रकारांचा गौरव करत फेस्टिव्ह २०२६ चा शुभारंभ

हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल आणि स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज आपल्या फेस्टिव्ह मोहिमेचे अनावरण केले. या मोहिमेद्वारे वारली (महाराष्ट्र), कलमकारी (आंध्र प्रदेश/तेलंगणा), गोंड (मध्य प्रदेश), पिछवाई (राजस्थान) आणि माता नी पछेडी (गुजरात) या भारतीय कला प्रकारांच्या माध्यमातून श्री गणेशाच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. भारताच्या विविध भागांतील कारागिरांना एकाच मंचावर आणून ही मोहीम देशाच्या समृद्ध लोककलेच्या वारशाला फेस्टिव्हच्या संवादाच्या केंद्रस्थानी ठेवते, तसेच हिरो डेस्टिनीच्या माध्यमातून समकालीन संवेदी अभिव्यक्ती (सेन्सरी एक्स्प्रेशन) सादर करते. ही मोहीम १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान संपूर्ण गणेशोत्सव काळात सुरू राहील.

 

ही मोहीम विविध कला परंपरा आणि निपुण कलाकारांना एकत्र आणून बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक प्रदेशाच्या सांस्कृतिक ओळखीचे अनोख्या दृश्य रुपात रूपांतर करते. महाराष्ट्राची वारली आणि मध्य प्रदेशच्या गोंड कलेपासून ते राजस्थानची पिछवाई, गुजरातची माता नी पछेडी आणि आंध्र प्रदेश/तेलंगणाच्या कलमकारी परंपरेपर्यंत प्रत्येक कलाकृतीची निर्मिती या पारंपरिक कलेशी मनापासून जोडलेल्या कलाकाराने केली आहे. तसेच त्यांना श्रेय देऊन गौरवण्यात आले आहे.

 

या मोहिमेबाबत मत व्यक्त करत हिरो मोटोकॉर्पच्या इंडियन बिझनेस युनिटच्या मार्केटिंगचे प्रमुख आशिष मिधा म्हणाले, “सण-उत्सव हे ब्रँड्ससाठी सांस्कृतिक क्षणांमध्ये सहभागी होण्याची प्रभावी संधी देतात, जे क्षण व्यक्ती आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. हिरो मोटोकॉर्पमध्ये आमचा विश्वास आहे की, सणासुदीच्या काळात हा सहभाग केवळ प्रचारात्मक संदेशांपुरता मर्यादित न राहता भारताच्या समृद्ध वारशात अर्थपूर्ण योगदान देणारा असावा. या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही अनेक कला प्रकार आणि निपुण कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतात आणत आहोत, तसेच प्रत्येक प्रदेशाला त्यांच्या स्वतःच्या स्थानिक दृश्य शैलीत बाप्पाचे स्वागत करण्याची संधी देत आहोत. आमच्या दृष्टीने, जाहिरातीच्या पलीकडे जाऊन भारताला अद्वितीय बनवणारे व्यक्ती, कथा आणि परंपरांचा गौरव करणारा प्लॅटफॉर्म निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे.”

 

ही मोहीम कलाकार मयूर जमानी यांनी केवळ हिरो डेस्टिनीच्या ऑल-मेटल बाह्यभागाच्या आवाजांचा वापर करून तयार केलेल्या नाविन्यपूर्ण एएसएमआर अनुभवाद्वारे कला आणि अभियांत्रिकी यांचा सुरेख संगम घडवून आणते. या स्कूटरच्या हलक्या टॅप्स, नाद आणि विविध स्वरांचे सणासुदीच्या क्षणासाठी वैशिष्ट्यपूर्ण ध्वनीचित्रात रूपांतर करण्यात आले आहे, ज्यामुळे उत्पादनाचा एक घटक उत्सवाचे साधन बनला आहे.

 

ही मोहीम प्रादेशिक मुद्रित (प्रिंट) सिरीजच्या माध्यमातून सादर केली जात आहे, यात हिरोच्या मोटरसायकल्स आणि स्कूटर्सना प्रत्येक कला प्रकाराच्या वैशिष्ट्यपूर्ण दृश्य शैलीसोबत मांडण्यात आले आहे. कलेचा वापर केवळ सजावटीपुरता मर्यादित न ठेवता ही मांडणी बाप्पाला प्रत्येक प्रदेशाच्या सांस्कृतिक ओळखीशी जोडण्यासाठी तयार करण्यात आली आहे, जिथून मूळ कला उदयास आली आहे.

 

कला प्रकार आणि त्यामागील कलाकार:

 

कला प्रकार

 

मूळ राज्य

 

कलाकार

 

इन्स्टाग्राम हँडल

 

वारली

 

महाराष्ट्र

 

दिलीप रामा बहोथा

 

@bahothadilip

 

कलमकारी

 

आंध्र प्रदेश / तेलंगणा

 

कनुकुर्थी गुणा शेखर साई

 

@guna_sekhar_kalamkari_arts

 

गोंड

 

मध्य प्रदेश

 

राजू धुर्वे

 

@rdhurweyd

 

पिछवाई

 

राजस्थान

 

दीपक वर्मा

 

@deepaksharma_art

 

माता नी पछेडी

 

गुजरात

 

चितारा जगदीशभाई वग्गीभाई

 

@matanipachediby_sunilchitara

 

 

 

ही फेस्टिव्ह मोहीम निपुण कारागीर आणि त्यांच्या कलेला राष्ट्रीय मंचावर आणते, ज्यात गणेशोत्सवाच्या उत्साहाला अभिनव डेस्टिनी एएसएमआर कला गीताची जोड देण्यात आली आहे

 

 

https://www.instagram.com/p/DdQAfT3nd1T/?stkn=eWxoejUxbHk5c3Nh

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments