Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedआचारसंहिता कालावधीत विभागीय महिला लोकशाही दिन रद्द*

आचारसंहिता कालावधीत विभागीय महिला लोकशाही दिन रद्द*

 

पुणे,दि. ४ : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत महिला व बालविकास विभागामार्फत दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा पुणे विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती महिला व बालविकास विभागाचे उप आयुक्त संजय माने यांनी ‍ दिली आहे.

 

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचार संहिता १६ मार्च ते ६ जून या कालावधीत घोषित केली आहे. या आचारसंहिता कालावधीत पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने एप्रिल व मे महिन्याचा विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नसल्याचे श्री. माने यांनी कळविले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments