मुंबई, 21st सप्टेंबर २०२६: मुंबईच्या सर्वाधिक लोकप्रिय स्ट्रीट-फूड चवींपैकी एका चवीचा उत्सव साजरा करत मदर्स रेसिपीने आपली नवीन बॉम्बे सँडविच चटणी लाँच केली आहे. शहरातील गजबजलेले रस्ते, स्थानिक सँडविच स्टॉल्सपासून ते पावसाळ्यातील संध्याकाळच्या चहाच्या वेळेपर्यंत, बॉम्बे सँडविच हा मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा एक आवडता भाग बनला आहे. या कालातीत क्लासिकची खास ताजी, आंबट-तिखट आणि चविष्ट चव देण्यासाठी तयार करण्यात आलेली ही नवीन चटणी ग्राहकांना घरच्या घरी मुंबईतील अस्सल स्ट्रीट-फूडचा अनुभव पुन्हा निर्माण करण्याची सुविधा देते.
२०० ग्रॅमच्या स्पाऊट पाऊचमध्ये ७० रुपयांच्या च्या एमआरपी सह उपलब्ध असलेली ही नवीन बॉम्बे सँडविच चटणी अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहे. ही रेडी-टू-यूज चटणी सँडविच, रॅप्स, टोस्ट, चाट आणि स्नॅक्ससाठी योग्य असून, मदर्स रेसिपीच्या सोयीसह आणि गुणवत्तेच्या खात्रीसह मुंबईच्या आवडत्या स्ट्रीट-स्टाइल सँडविचची अस्सल चव ग्राहकांना देते.
या लॉन्चबद्दल बोलताना, संजना देसाई, कार्यकारी संचालक, मदर्स रेसिपी, म्हणाल्या, “बॉम्बे सँडविच हा केवळ एक स्नॅक नाही, तर ती एक भावना आहे, जिच्यासोबत मुंबईकरांच्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत. आमच्या बॉम्बे सँडविच चटणीद्वारे आम्हाला रस्त्याच्या कडेला मिळणारी अस्सल चव जपायची होती आणि ग्राहकांना घरच्या घरी मुंबईचा हा प्रतिष्ठित अनुभव सहजपणे पुन्हा निर्माण करता यावा, तसेच त्यांना परिचित आणि आवडणाऱ्या चवीशी प्रामाणिक राहता यावे, हा आमचा उद्देश होता.”
या लॉन्चद्वारे मदर्स रेसिपीभारतातील प्रतिष्ठित प्रादेशिक चवी देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या ध्येयाला पुढे नेत आहे आणि स्थानिक आवडत्या चवी पूर्वीपेक्षा अधिक सहज उपलब्ध करून देत आहे. बॉम्बे सँडविच स्प्रेड मुंबईच्या आवडत्या स्ट्रीट-फूड क्लासिकची अस्सल चव जपतो, तसेच गुणवत्ता, सातत्य आणि सोयीसाठी ब्रँडची बांधिलकी प्रतिबिंबित करतो. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक घासात मुंबईचा अस्सल स्थानिक अनुभव घरच्या घरी पुन्हा निर्माण करता येतो.
कॉलेजच्या बाहेरचा परिचित सँडविच स्टॉल असो, ताजे बॉम्बे सँडविच देणारा शेजारचा विक्रेता असो किंवा पावसाळ्यात चहाच्या कपासोबत बॉम्बे सँडविच खाण्याची इच्छा असो, या सँडविचला लाखो लोकांच्या मनात विशेष स्थान आहे. आपल्या नवीन बॉम्बे सँडविच चटणीद्वारे मदर्स रेसिपीहा प्रतिष्ठित रस्त्यावरील अनुभव प्रत्येक घरापर्यंत पोहोचवत आहे, ज्यामुळे ग्राहकांना मुंबईच्या आवडत्या स्ट्रीट-फूड क्लासिकची अस्सल चव, आठवणी आणि आनंद घरच्या घरी पुन्हा अनुभवणे अधिक सोपे होत आहे—एक स्वादिष्ट सँडविच, एका वे
ळी.


