Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedदगडूशेठ' गणपतीच्या निर्माल्यापासून उत्सवात मिळते २ टन खत* शेतकऱ्यांसह सामान्यांना होते...

दगडूशेठ’ गणपतीच्या निर्माल्यापासून उत्सवात मिळते २ टन खत* शेतकऱ्यांसह सामान्यांना होते मोफत खताचे वाटप : रोटरी क्लब ऑफ युवा पुणे च्या सहकार्याने उपक्रम

 

 

पुणे : ‘दगडूशेठ’ गणपतीच्या चरणी भक्तीभावाने अर्पण केलेले फुले, हार, नारळ, दुर्वा याच्या निर्माल्यापासून संपूर्ण उत्सवात २ टन खत तयार केले जाते. रोटरी क्लब ऑफ युवा पुणे च्या सहकार्याने हा उपक्रम गेल्या नऊ वर्षांपासून सुरु आहे. शेतकऱ्यांसह सामान्यांना या खताचे मोफत वाटप केले जाते.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षी गणेशोत्सव थाटात साजरा होत आहे. त्यामध्ये जमा होणारे निर्माल्य डीपी रस्त्यावरील नवसह्याद्री क्रीडा संकुलाजवळ उभारलेल्या ‘निर्माल्य श्रेडिंग प्रकल्पा’त नेण्यात येते. तेथे निर्माल्याची पावडर करून त्याचे सेंद्रिय खत तयार केले जाते आणि ते खत विनामूल्य अन्नदाता शेतकऱ्यासह सामान्यांना देखील दिले जाते.

 

गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव. पण या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते. या निर्माल्याचे खत करून त्याला नवा अर्थ प्राप्त करून देण्याचे काम दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ युवा पुणे करीत आहे. हा प्रकल्प ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह क्लबच्या अध्यक्ष शलाका पाटसकर, सेक्रेटरी श्वेता उंडे, प्रकल्प समन्वयक मनोज धारप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

 

प्रकल्प समन्वयक मनोज धारप म्हणाले, दररोज सुमारे ४०० किलो निर्माल्यापासून साधारण १५० किलो खत तयार केले जाते. यंदा या प्रकल्पाचे दहावे वर्ष असून मागील नऊ वर्षांपासून दगडूशेठ ट्रस्ट या प्रकल्पाशी जोडला गेला आहे. प्रकल्पात गणेशोत्सवात जमा होणारे निर्माल्य घेऊन येतो आणि त्या निर्माल्यापासून खत तयार करतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे यामध्ये मोठे सहकार्य यामध्ये मिळते. उत्सवात दररोज क्लबतर्फे टेम्पो त्यांच्याकडे पोहोचतो आणि साधारण बारा ते पंधरा पोती म्हणजे साधारण ४०० किलो निर्माल्य ते आम्हाला दररोज देतात. यापासून साधारण ३०० ते ४०० किलो खत तयार होते आणि गरजू शेतकरी, सोसायट्यांना त्याचे खत दिले जाते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments