Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री वक्रतुंड रथातून 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक* श्रीमंत...

श्री वक्रतुंड रथातून ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक* श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३४ वे वर्ष ; यंदा देखील दुपारी ४ वाजता सहभागी होणार

 

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शुक्रवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री वक्रतुंड रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

 

सलग चौथ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. यंदाची प्रतिकृती असलेल्या वृंदावन मधील प्रेम मंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. मंदिर वास्तुकलेने प्रेरित असा हा रथ तयार करण्यात आला आहे. रथाची संकल्पना भारतीय मंदिर वास्तु केलेवर आधारित असून त्यात पारंपरिक शिल्पकला आणि आधुनिक फॅब्रिकेशनचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.

 

रथाचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे नक्षीदार स्तंभ. रथावर एकूण ८ स्तंभ असून त्यातील चार स्तंभांवर भगवान विष्णू आणि भगवान कुबेर यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. रथाच्या वरच्या भागात शिखर, घुमट आणि जाळीदार नक्षीकाम देखील करण्यात आले आहे. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २१ फूट इतकी आहे. याशिवाय रथावर आकर्षक झुंबरे, एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत.

 

सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना सुनील रासने म्हणाले, मिरवणुकीत जय गणेश अमली पदार्थ मुक्त भारत अभियान जनजागृती करणारा मानवसेवा रथ अग्रभागी असून त्यामध्ये विनायक आणि रोहन देवळकर यांचा चौघडा व प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन देखील होणार आहे. त्यामागे स्वरूपवर्धिनीचे पथक, प्रभात बँड, दरबार बँड आणि केरळचे चेंदा मेलम पथक असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments