Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedएचडीएफसी बँके तर्फे कॉर्पोरेट्स आणि व्यक्तीमध्ये आधुनिक सीबीडीसी चा वापर वाढवण्यासाठी पाच...

एचडीएफसी बँके तर्फे कॉर्पोरेट्स आणि व्यक्तीमध्ये आधुनिक सीबीडीसी चा वापर वाढवण्यासाठी पाच नवीन डिजिटल रुपयाच्या नाविन्यांची सुरुवात

ग्राहक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील संस्थांमध्ये भारताच्या सार्वभौम डिजिटल चलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी डिजिटल रुपयाचे नवीन प्रकार सादर

 

मुंबई, २३ सप्टेंबर २०२६- एचडीएफसी बँकेने ‘डिजिटल रुपया’चे (सीबीडीसी) विविध उपयोग सादर केले असून यातून दैनंदिन ग्राहक व्यवहार आणि कॉर्पोरेट कार्यप्रणाली या दोन्ही क्षेत्रांत भारताच्या या सार्वभौम डिजिटल चलनाचे वाढते महत्त्व अधोरेखित होते. गेल्या आठवड्यात एका उद्योग-मंचावर सादर करण्यात आलेल्या या उपक्रमांमधून डिजिटल रुपयाची व्यावहारिक उपयुक्तता, नियामक नियमांचे पालन आणि व्यापक उपलब्धता या बाबी स्पष्ट होतात. तसेच, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा एक सहज आणि दैनंदिन भाग म्हणून डिजिटल रुपयाचे स्थान यामुळे अधिक दृढ होत आहे.

 

 

 

सादर करण्यात आलेली वैशिष्ट्ये

 

१. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट्स चे रिडमशन- आता लवकरच क्रेडिट कार्डाचे रिवॉर्ड पॉईंट्स सुध्दा विशिष्ट ब्रॅन्डच्या रिवॉर्ड व्हाऊचर्स प्रमाणे डिजिटल रुपयांत परावर्तित करता येतील. आता ग्राहक विविध प्रकारात जसे डायनिंग, इंधन, कपडे किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये अगदी शेवटच्या पैशापर्यंत वापरता येऊ शकतील यामुळे अधिक लवचिकता आणि पारदर्शकता प्राप्त होऊन रिवॉर्ड्सचा लाभ घेण्याचा अनुभव समृध्द करणे शक्य होईल.

 

२. कस्टमर प्रमोशन साठी ‍ गिफ्ट व्हाऊचर : आता प्रमोशनल मोहिमांमध्ये सुध्दा डिजिटल रुपयांमधील गिफ्ट व्हाऊचर्स देणे शक्य होईल, ग्राहकांच्या विशिष्ट घटना घडल्यास बँका ऑटोमॅटिकली व्हाऊचर्स ट्रिगर करु शकतील. एखादी गोष्ट घडल्यास हे व्हाऊचर एचडीएफसी बँकेच्या डिजिटल रुपी वॉलेट मध्ये ही रक्कम देऊ शकेल ज्यामुळे ग्राहक आता थेट यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करुन विविध विभागात वापर करु शकतील यामुळे ग्राहकांना अधिक निवड मिळून मोहिम अधिक यशस्वी करणे शक्य होईल.

 

 

 

३. कर्मचार्‍यांचे भत्ते आणि पैसे देण्यासाठी डिजिटल रुपयांचे कॉर्पोरेट पोर्टल : आता लवकरच संस्था सुध्दा कर्मचार्‍यांचे भत्ते, इंधन आणि प्रवासाचे भत्ते सेल्फ सर्व्ह पध्दतीने करता येऊन डिजिटल रुपयांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या कॉर्पोरेट नेट बँकिंगच्या माध्यमातून करता येईल. प्रोग्रामेबल पेआऊट्स मुळे पैसे त्याच गोष्टींसाठी वापरले जाऊन योग्य वापर होऊन फायनान्स टिम ला जोडणी करण्याचे कष्ट कमी होण्यास मदत होईल.

 

४. भिमच्या माध्यमातून अधिक वापर शक्य : एचडीएफसी बँकेचा डिजिटल रुपया आता भिमवर उपलब्ध असेल, यामुळे ग्राहक त्यांच्या ओळखीच्या यूपीआय स्टाईलने पेमेंट हे थेट सीबीडीसी वॉलेट मधून पेमेंट करु शकतील. या एकत्रिकरणा मुळे व्यापारी अधिक प्रमाणात वापर करुन वापरकर्ते सुध्दा रोजच्या सोप्या पध्दतीने वापर करु शकतील.

 

 

 

५. विमानातील व्यवहारांसाठी ‘ऑफलाइन सीबीडीसी’: जमिनीवरील नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या पलीकडे जाऊन सीबीडीसी चा विस्तार केला जात आहे; यामुळे ग्राहक लवकरच विमानामध्ये एचडीएफसी बँकेच्या पीओएस उपकरणांवर आपला फोन ‘टॅप’ करून खाद्यपदार्थ, पेये किंवा सीट अपग्रेडसाठी पैसे भरू शकतील. हे वैशिष्ट्य इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवायही काम करते, ज्यामुळे हवेत असतानाही व्यवहार कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करणे शक्य होते.

 

 

 

“डिजिटल रुपया सार्वभौम चलनाच्या विश्वासाला प्रोग्रामेबिलिटी, पारदर्शकता आणि अधिक मजबूत नियंत्रणांशी जोडतो,” असे एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड, ब्रांच बँकिंग, पेमेंट्स, ट्रेझरी, लायबिलिटी प्रॉडक्ट्स, मार्केटिंग, व्हर्च्युअल चॅनेल्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर, श्री. आशिष पार्थसारथी यांनी सांगितले “हे उपयोग किरकोळ आणि घाऊक बाजारांमधील उद्देशानुरुप पेमेंट, अनुपालन आणि ऑडिटेबिलिटी यांसारख्या नवीन गरजा पूर्ण करतात. सीबीडीसीच्या क्षमतेला जबाबदार आणि विस्तारक्षम उपायांमध्ये रूपांतरित करण्यासाठी आम्ही आरबीआयसोबत काम करण्यास कटिबद्ध आहोत.”

 

 

 

या नवीन उत्पादनां विषयी बोलतांना एचडीएफसी बँकेचे सिनियर ईव्हीपी श्री. रजनीश प्रभू यांनी सांगितले “ डिजिटल रुपयाच्या वापरातील पुढील टप्पा हा प्रमाण आणि रोजच्या वापरातून निश्चित होणार आहे. सीबीडीसी ला यूपीआय, व्यापार्‍यांचा वापर, रिवॉर्ड्स, कर्मचार्‍यांचे लाभ आणि ऑफलाईन पेमेंट्स सारख्या ओळखीच्या माध्यमातून केल्याने आम्ही ग्राहकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी डिजिटल रुपया रोजच्या जीवनात आणून प्रोग्रामेबल पेमेंट्स साठी नवीन शक्यता निर्माण करण्यावर आम्ही भर देत आहोत.”

 

 

 

सीबीडीसी हे यूपीआय ला पूरक ठरते, कारण ते प्रोग्रामेबिलिटी, अनुपालन आणि पारदर्शकता प्रदान करते, जे केवळ खात्यावर आधारित डिजिटल पेमेंट देऊ शकत नाही. स्वयंचलित कॉर्पोरेट वितरणापासून ते ऑफलाइन इन-फ्लाइट पेमेंटपर्यंत, एचडीएफसी बँकेची नवीनतम उत्पादने ही रिटेल आणि होलसेल या दोन्ही परिसंस्थांमधील उच्च क्षमतेच्या, वास्तविक क्षणांमध्ये डिजिटल रुपयाला रुजविण्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments