पुण्याच्या विवेक पाटीलने कलात्मक अभिव्यक्तीच्या जगतात स्वतःचे एक प्रकाशमान स्थान निर्माण केले आहे. त्यांनी भारतात लाइट पेंटिंगची अद्भुत कला आणली आहे. भारताचा एकमेव लाइट पेंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटील यांनी शब्द किंवा पारंपरिक कॅनव्हासवर सांगता न येणाऱ्या कथा प्रकाश व रेडियमच्या आगळ्यावेगळ्या माध्यमांनी रंगवून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या सोमवार दिनांक ८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता फक्त हिस्ट्रीटीव्ही१८ वर दाखवल्या जाणाऱ्या ‘ओएमजी! ये मेरा इंडिया’च्या नवव्या एपिसोडमध्ये पाहा त्यांची ही अद्भुत कथा. या आगळ्यावेगळ्या ओरिजिनल कथाबाह्य मनोरंजन मालिकेचा दहावा सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन, प्रेरणा आणि आशा देण्याचे वचन पूर्ण करतो आहे. दर सोमवारी रात्री ८ वाजता अशा व्यक्तींच्या मनोरंजक, अद्भुत गोष्टी ज्यांनी आपल्या खास टॅलेंटद्वारे जगात क्रांती घडवून आणली आहे, त्यांचे सामाजिक प्रभाव उपक्रम, तांत्रिक नावीन्यपूर्णता, विक्रमी कार्य, त्यांच्या आगळ्यावेगळ्या आवडीनिवडी हे सर्व पाहता येईल.
विवेक याच्या कलाकृती फक्त दृश्य मेजवान्याच नाहीत तर त्यांच्याकडून प्रेक्षकांना दिले जाणारे अद्वितीय, अविस्मरणीय अनुभव आहेत. त्यामुळे त्यांना
‘वर्ल्ड्स गॉट टॅलेंट’ मध्ये स्थान मिळाले. त्यांनी जगभरात हजारो शोज करून प्रेक्षकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले आहे. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि शाहरूख खान याच्यासह जगभरातील अनेक सेलिब्रिटीजना आपल्या कलाकृतींनी आकर्षित केले आहे. परंतु, विवेक यांची कला क्षणिकदेखील आहे हे तुम्हाला माहीत आहे का? रेडियमचा कॅनव्हास विझत जाण्यापूर्वी साधारण १५ मिनिटे उजळतो. विवेक पाटील यांनी भारतात फक्त नवीन कलाप्रकारच आणलेले नाहीत तर कथाकथनात कलात्मकता आणि नावीन्यपूर्णतेची मानकेही उंचावलेली आहेत. त्यांना फक्त या शोसाठी खास आपली विशेष कलाकृती तयार करताना पाहा या सोमवारी रात्री ८ वाजता फक्त ‘ओएमजी! ये मेरा इंडिया’ वर!
भारताच्या एकमेव प्रकाश कलाकाराच्या कलाकृतीने मंत्रमुग्ध व्हा. त्यासोबत पाहा देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर अविस्मरणीय कथा ज्यात आहे मुंबईतला एक ओरिगामी जगतातला महान कलाकार. त्याच्या हातात लहान कागदांपासून भलेमोठे प्राणी तयार होतात!
पाहत राहा ‘ओएमजी! ये मेरा इंडिया’ दर सोमवार रात्री ८ वाजता फक्त हिस्ट्रीटीव्ही१८
वर.


