Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचा महाराष्ट्रात विस्तार; जेजुरी येथे नवीन शाखा सुरू ...

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचा महाराष्ट्रात विस्तार; जेजुरी येथे नवीन शाखा सुरू ~ लॉन्च ऑफर : शून्य लॉगिन फी आणि 50 लाख रूपयांपर्यंत तात्काळ कर्ज मंजुरी ~

 

 

जेजुरी, महाराष्ट्र, 24 सप्टेंबर 2026 : आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (“एबीएचएफएल”) या आघाडीच्‍या हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्‍या उपकंपनीने महाराष्ट्रातील आपला विस्तार वाढवत जेजुरी येथे नवीन शाखा सुरू केली आहे. देशभरातील शाखांचे नेटवर्क वाढवण्याच्या व्यापक योजनेअंतर्गत ही शाखा सुरू करण्यात आली आहे. या नवीन शाखेमुळे महाराष्ट्रातील एबीएचएफएलच्या शाखांची एकूण संख्या 43 झाली आहे. यामुळे वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमध्ये कंपनीची उपस्थिती मजबूत होऊन ग्राहकांना अधिक सहजपणे सेवा उपलब्ध होणार आहे.

 

जेजुरीच्या गृहनिर्माण बाजारपेठेत सातत्याने वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थान, पुणे–सोलापूर औद्योगिक मार्गिका आणि पुणे–सोलापूर महामार्गामुळे सुधारलेली रस्ते कनेक्टिव्हिटी यामुळे या वाढीला चालना मिळत आहे. जेजुरी आणि आसपासच्या भागात घरांची मागणी वाढत आहे. औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, नोकरी करणारे व्यावसायिक, स्थानिक व्यवसायिक तसेच रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा जवळ असलेले तुलनेने परवडणारे घर शोधणाऱ्या कुटुंबांकडून ही मागणी वाढत आहे. जेजुरीमधील वाढता औद्योगिक विकास तसेच खंडोबा मंदिरामुळे विकसित झालेले धार्मिक पर्यटन यामुळे आर्थिक घडामोडी आणि पायाभूत सुविधांची मागणी वाढत आहे. जेजुरीमधील वाढती औद्योगिक गतिविधी आणि सुधारत असलेली कनेक्टिव्हिटी लक्षात घेता, परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या घरांची मागणी पुढील काळात वाढण्याची अपेक्षा आहे. जेजुरीमधील एबीएचएफएलची नवीन शाखा ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार गृहकर्जाचे पर्याय आणि स्थानिक पातळीवर मदत उपलब्ध करून देईल. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना सोयीस्कर पद्धतीने घर खरेदी करणे, घर बांधणे किंवा घराचे नूतनीकरण करणे शक्य होईल.

 

एबीएचएफएल विविध ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन गृहकर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देते. यामध्ये परवडणाऱ्या घरांसाठी गृहकर्ज, प्रीमियम घरांसाठी गृहकर्ज, घर बांधण्यासाठी कर्ज आणि मालमत्तेवर कर्ज यांचा समावेश आहे. या सुविधा पगारदार व्यक्ती, स्वयंरोजगार करणारे व्यावसायिक, स्वयंरोजगार करणारे इतर व्यावसायिक तसेच वाढत्या उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. मजबूत डिजिटल सुविधांमुळे एबीएचएफएल कडून कर्ज प्रक्रियेची सुरुवात सहज करता येते, कर्ज मंजुरी लवकर मिळते आणि प्रक्रियेत अधिक पारदर्शकता राहते. यामुळे ग्राहकांना अधिक चांगला आणि सोयीस्कर अनुभव मिळतो.

 

नवीन शाखेच्या उद्घाटनानिमित्त, एबीएचएफएल कडून 24 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ग्राहकांसाठी लॉगिन फी शून्य ठेवण्यात आली आहे. तसेच 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला तत्काळ मंजुरी देण्यात येणार आहे. या सुविधेमुळे नवीन शाखांमधील ग्राहकांना कर्ज सुविधा अधिक जलद आणि परवडणाऱ्या दरात मिळण्यास मदत होईल.

 

या विस्ताराबाबत बोलताना आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. पंकज गाडगीळ म्हणाले, “महाराष्ट्र ही आमच्यासाठी विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथे घरांची मागणी आणि लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांशी अधिक चांगला संपर्क निर्माण करण्यासाठी आम्ही राज्यातील आमचे नेटवर्क वाढवत आहोत. वाढत्या शाखांच्या नेटवर्कसोबत मजबूत डिजिटल सुविधांचा वापर करून ग्राहकांसाठी स्वतःचे घर घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि त्रासमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

 

‘हॅप्पी होम लोन जर्नी’ म्हणजेच आनंददायी गृहकर्जाचा अनुभव देण्याच्या कंपनीच्या उद्देशाशी हा विस्तार सुसंगत आहे. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवणे, जबाबदारीने कर्ज देणे आणि विविध प्रकारच्या किरकोळ कर्ज सुविधांच्या माध्यमातून आर्थिक समावेशनाला चालना देणे, यावर कंपनीचाचा सातत्याने भर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments