गुगल जेमिनीसह सुसज्ज असलेल्या एआय व्हिजनसह फॅमिली हब रेफ्रिजरेटरद्वारे संदर्भाधारित एआय अनुभवांची सुरुवात.
बिस्पोक एआय विंडफ्री™ प्रो एअर कंडिशनरमुळे सॅमसंगच्या एआय होम परिसंस्थेचा विस्तार.
विंडफ्री™ सह नवीन इन्फिनिट १-वे कॅसेट एसीद्वारे एआय-आधारित आराम आणि वीजेची बचत.
गुरुग्राम, भारत – सप्टेंबर १७, २०२६ – सॅमसंग इंडियाने आज आपल्या २०२६ बिस्पोक एआय अप्लायन्सेस लाइनअप लाँच केली, जी ग्राहकांचे जीवन अधिक समृद्ध आणि सुलभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ‘द ब्रीफ गुरुग्राम’ या अत्याधुनिक अनुभवात्मक इव्हेण्टमध्ये सॅमसंगने दाखवून दिले की, एआय विविध उत्पादन श्रेणींमधील एक समान धागा म्हणून कार्य करतो, ज्यामध्ये स्मार्टथिंग्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सवयी शिकून घेणे, कामे स्वयंचलित करणे आणि ऊर्जेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असलेल्या परिसंस्थेत हवामान नियंत्रण, लाँड्री, लिव्हिंग रुम आणि किचन यांना एकत्र जोडले जाते. सर्वोत्तम टचस्क्रीन, प्रगत व्हॉइस इंटेलिजन्स आणि सर्वसमावेशक रचनेसह सुसज्ज असलेली २०२६ बिस्पोक एआय अप्लायन्सेस लाइनअप प्रत्येकासाठी कनेक्टेड, वापरण्यास सोपा आणि सुरक्षित स्मार्ट होम अनुभव प्रदान करते.
“आमची २०२६ बिस्पोक एआय श्रेणी विविध जीवनशैली समजून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे ही श्रेणी प्रत्यक्ष जीवनातील सुविधा देणारा तुमचा ‘एआय होम कंपॅनियन’ बनेल. तंत्रज्ञान तुमच्या जीवनशैलीशी जुळवून घेईल असे ‘एआय होम’ तयार करणे हे सॅमसंगचे उद्दिष्ट आहे. घरे अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी बनवण्यासाठी आमचे बिस्पोक एआय अप्लायन्सेस एआय व्हिजन, सॅमसंग नॉक्स सोल्यूशन आणि सर्वसमावेशक रचनेसह येतात. भारतात आज विकले जाणारे सॅमसंगचे प्रत्येक दुसरे अप्लायन्स हे बिस्पोक एआय अप्लायन्स आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, आमच्या नवीन लाइनअपला ग्राहकांचे प्रेम आणि पाठबळ असेच मिळत राहील,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे प्रेसिडंट आणि सीईओ जेबी पार्क म्हणाले.
२०२६ बिस्पोक एआय होम अप्लायन्स लाइनअप
गुगल जेमिनीसह सुसज्ज एआय व्हिजन असलेला फॅमिली हब रेफ्रिजरेटर*: व्हिडिओ-टू-रेसिपी सारख्या संदर्भाधारित एआय अनुभव असलेला ३२-इंच फॅमिली हब रेफ्रिजरेटर नोट्स, वेळापत्रके आणि मनोरंजनासाठी महत्त्वाचा घटक म्हणून काम करतो. यामध्ये फॅमिली केअर आणि पेट केअर यांसारख्या स्थानिक गरजांनुसार वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
बिस्पोक एआय विंडफ्री™ प्रो एअर कंडिशनर: उत्कृष्ट हवेच्या गुणवत्तेसाठी एआय-सक्षम नियंत्रण आणि पीएम १.० प्युरिफिकेशनसह सुसज्ज असलेले हे नेक्स्ट-जनरेशन प्लॅटफॉर्म आहे. हे स्मार्टथिंग्स आणि होम अप्लायन्स रिमोट मॅनेजमेंट (एचआरएम)] द्वारे गरजेनुसार विस्तार करता येण्याजोगे हवामान व्यवस्थापन प्रदान करते.
विंडफ्री™ सह इन्फिनिट १-वे कॅसेट एसी: आधुनिक लिव्हिंग स्पेसेससाठी डिझाइन केलेल्या या एसीमध्ये ९ लाइट मोड्ससह एज लाइटिंग, १७,२०० मायक्रो-होल्सद्वारे थेट अंगावर गार वारा न टाकणारे विंडफ्रीTM कूलिंग, तसेच टिकाऊ एएसए (अॅक्रिलोनायट्रिल स्टायरीन अॅक्रिलेट) मटेरियलपासून बनवलेले १३.८ सेमी डेप्थचे अल्ट्रा स्लिम प्रोफाइल आहे. हा एसी स्मार्टथिंग्स नियंत्रण, एआय कम्फर्ट मोड आणि इंटरटेक प्रमाणित अँटीबॅक्टेरियल कॉपर फिल्टरने सुसज्ज आहे.
२०२६ बिस्पोक एआय अप्लायन्सेस सॅमसंगच्या एआय होम स्क्रीन, बिक्सबी व्हॉइस असिस्टंट, नॉक्स सिक्युरिटी आणि स्मार्टथिंग्स कनेक्टिव्हिटीद्वारे समर्थित आहेत, जी भारतातील आधुनिक कुटुंबांसाठी वैयक्तिकृत, ऊर्जा-कार्यक्षम आणि सुरक्षित स्मार्ट होम सोल्यूशन्स प्रदान करतात.
निवडक डिवाईसेसमध्ये समाविष्ट केलेली एआय होम स्क्रीन घरातील अप्लायन्सेस व्यवस्थापित करण्यासाठी महत्त्वाचा हब म्हणून काम करते. ही एआय होम स्क्रीन एकाच इंटरफेसवरून रिअल-टाइम माहिती देते, कनेक्ट केलेली अप्लायन्सेस नियंत्रित करते, तसेच मनोरंजन आणि कौटुंबिक संवादास मदत करते. या स्क्रिनची वापरकर्ता-अनुकूल रचना सॅमसंगच्या बिस्पोक एआय अप्लायन्सेसच्या संपूर्ण क्षमतेचा सहज लाभ घेणे शक्य करते.
अपग्रेड केलेला बिक्सबी व्हॉइस असिस्टंट आता व्हॉइस कमांड्सना सपोर्ट करतो आणि व्हॉइस आयडी सादर करतो, जो प्रत्येक वापरकर्त्याला स्वतंत्रपणे ओळखतो आणि त्यानुसार त्यांचा अनुभव वैयक्तिकृत करतो. फॅमिली केअर सारख्या नवीन स्मार्टथिंग्स सेवा ठरलेल्या वेळेत कोणतीही हालचाल न होण्यासारख्या असामान्य प्रसंगांमध्ये अलर्ट पाठवून सुरक्षितता वाढवतात.
याला पूरक म्हणून, सॅमसंगची पेट केअर सेवा पाळीव प्राण्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे, त्यांच्या प्रजातीनुसार आरोग्यविषयक माहिती आणि फिरायला नेण्याच्या, तसेच काळजी घेण्याच्या वेळांचे वेळेवर आठवण करून देण्यासारख्या सुविधा स्मार्टथिंग्स अॅपद्वारे उपलब्ध करून देते, ज्यामुळे मालकांना त्यांच्या लाडक्या प्राण्यांची काळजी घेण्यास मदत होते.
सॅमसंग विश्वासार्ह आणि सर्वोत्तम अनुभव प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे. प्रगत नॉक्स सिक्युरिटी डिवाईसेसमध्ये बहुस्तरीय सुरक्षा सुनिश्चित करते, ज्यामुळे वापरकर्त्यांना मन:शांती मिळते. स्मार्टथिंग्सद्वारे सॅमसंगची सॉफ्टवेअर अपडेट सेवा आता ७ वर्षांच्या अपडेट्सची हमी देते, ज्यामुळे दीर्घकालीन मूल्य प्राप्त होते. बिस्पोक एआय लाइनअप ग्राहकांच्या अनुभवाला नव्या उंचीवर नेणाऱ्या चार प्रमुख स्तंभांभोवती केंद्रित आहे: एआय तुम्हाला समजून घेते, एआय तुमच्याशी जुळवून घेते, एआय तुम्हाला तुमच्या घराशी कनेक्टेड ठेवते आणि एआय तुमची काळजी घेते.
एआय तुम्हाला समजून घेते: दैनंदिन जीवन अधिक सुलभ आणि सर्वोत्तम बनवते
बिस्पोक एआय लाइनअप दैनंदिन नित्यक्रम सोपे करण्यासाठी एआय-सक्षम अप्लायन्सेस आणि स्मार्टथिंग्स यांना एकत्र आणते. बिस्पोक एआय रेफ्रिजरेटर फॅमिली हब™ फूड ओळखण्यासाठी, पाककृती (रेसिपी) सुचवण्यासाठी आणि खाद्यपदार्थ वापरण्याच्या अंतिम तारखांचे व्यवस्थापन करण्यासाठी एआय व्हिजन आणि एआय फूड मॅनेजरचा वापर करते. ‘नाऊ ब्रीफ’ वैशिष्ट्य वेळापत्रक, हवामान आणि कौटुंबिक काळजीविषयक माहितीसह वैयक्तिकृत दैनंदिन अपडेट्स प्रदान करते. स्मार्टथिंग्स आणि सॅमसंग हेल्थ यांच्यातील एकत्रीकरणामुळे कॅलरी लक्षात घेऊन जेवणाचे नियोजन करणेही शक्य होते.
एआय तुमच्याशी जुळवून घेते: उत्तम झोपेसाठी वैयक्तिकृत आराम
विंडफ्री™ एसी कार्यक्षम आणि शांत कूलिंगसाठी एआय एनर्जी मोडसह दैनंदिन कूलिंगमध्ये वैयक्तिकृत आराम देतात. ‘वेअरेबल गुड स्लीप’ वैशिष्ट्य व्यक्तीच्या झोपेच्या पद्धतीनुसार एसीची सेटिंग्ज नियंत्रित करण्यासाठी गॅलॅक्सी वेअरेबल्ससोबत कार्य करते, ज्यामुळे झोपेसाठी अधिक आरामदायक वातावरण तयार होण्यास मदत होते. ट्रिपल मोशन विंग्ज हवेच्या प्रवाहावर अचूक नियंत्रण ठेवतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना जिथे आवश्यकता आहे तिथे कूलिंग निर्देशित करता येते.
एआय तुम्हाला तुमच्या घराशी कनेक्टेड ठेवते: अप्लायन्सेसना एकत्र आणते
निवडक अप्लायन्सेसमध्ये स्मार्टथिंग्सची सुविधा असल्याने बिस्पोक एआय लाइनअप संपूर्ण घरात कनेक्टेड अनुभव शक्य करते. टॉप माऊंट रेफ्रिजरेटर एनर्जी सेव्हिंग मोड आणि पॉवर कूल/फ्रीझ यांसारखी वैशिष्ट्ये प्रदान करतो, तर २-इन-१ स्मार्ट कन्व्हर्जन स्थिर साठवणुकीचे (स्टोरेज) पर्याय उपलब्ध करून देते. क्लोझेट आणि पॅन्ट्री मॉनिटरिंग घरातील वस्तूंवर लक्ष ठेवण्यास मदत करून कनेक्टेड स्मार्ट होमच्या क्षमतांचा आणखी विस्तार करते.
एआय तुमची काळजी घेते: अधिक स्मार्ट लाँड्री आणि अप्लायन्सची निगा
बिस्पोक एआय लाँड्री कॉम्बो कपड्यांचे प्रकार ओळखण्यासाठी एआय वॉश अँड ड्रायचा वापर करतो आणि त्यानुसार कपडे धुणे व सुकवण्याचे चक्र (वॉश अँड ड्रायिंग सायकल) जुळवून घेतो. विशेष पेट केअर वॉश सायकल पाळीव प्राण्यांचे साहित्य स्वच्छ करणे अधिक सोपे करते, तर स्मार्ट फॉरवर्ड सॉफ्टवेअर अपडेट्स अप्लायन्सेस काळाच्या ओघात नवीन वैशिष्ट्यांसह अद्ययावत राहण्यास मदत करतात.
स्मार्टथिंग्स होम केअर आणि होम अप्लायन्स रिमोट मॅनेजमेंट (एचआरएम) अप्लायन्सेसचे सोपे निरीक्षण आणि सेवा यासाठी साह्य करतात.
बिस्पोक एआय परिसंस्थेच्या या उत्क्रांतीसह सॅमसंग विविध होम अप्लायन्स श्रेणींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षितता एकत्रित करण्याच्या आपल्या धोरणाला अधिक दृढ करत आहे. स्मार्ट होम ऑटोमेशनला अधिकाधिक सर्वोत्तम, वैयक्तिकृत आणि कार्यक्षम अनुभवात रूपांतरित करणे, जिथे ग्राहकांची दैनंदिन कामे सुलभ करण्यासाठी डिवाईसेस एकमेकांच्या समन्वयाने कार्य करतील, हेच याचे उद्दिष्ट आहे.
किंमत आणि उपलब्धता
इन्फिनिट १-वे कॅसेट एसी देशभरातील अधिकृत चॅनेल भागीदारांच्या माध्यमातून ३.६ किलोवॅट, ५.२ किलोवॅट आणि ७.१ किलोवॅट कूलिंग क्षमतांमध्ये उपलब्ध आहे. या एसीची सुरुवातीची किंमत १,६०,००० रुपये आहे. फॅमिली हबची किंमत ४,००,६९० रुपये आहे. बिस्पोक एआय विंडफ्री™ प्रो एअर कंडिशनर ६९,९९० रुपये किमतीत उपलब्ध आहे.
*गुगल जेमिनी सेवा गुगल एलएलसीद्वारे प्रदान केली जाते. सेवेची उपलब्धता, सहाय्यक फंक्शन्स आणि अचूकता देश, भाषा, डिवाईस मॉडेल आणि ओएस/वन यूआय व्हर्जननुसार बदलू शकतात. वापरकर्त्यांचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. काही फंक्शन्ससाठी अतिरिक्त अॅप सेटिंग्जची आवश्यकता भासू शकते. वैशिष्ट्ये किंवा परिणाम सबस्क्रिप्शननुसार बदलू शकतात.


