ही पुनर्स्थापना श्नाइडर इलेक्ट्रिकच्या उत्सवी मोहिमेची सुरुवात दर्शवते, जी ग्राहकांना त्यांच्या घरांचे नूतनीकरण, सुधारणा आणि नवीन खरेदी करताना होम सोल्युशन्सचा विचार करण्यास प्रवृत्त करते.
या मोहिमेची जाहिरात : श्नाइडर इलेक्ट्रिक बाप्पाच्या आशीर्वादाला नवीन पद्धतीने सादर करते
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2026: जागतिक ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या श्नाइडर इलेक्ट्रिकने, पुण्यात एक अनोखा प्रयोग केला. आपल्या विजेच्या स्विचेसचे कंपनीने गणपतीच्या प्रतिकृतीत रूपांतर केले आहे, आणि ठरावीक काळ चालणाऱ्या उत्सवी मोहिमेची उत्साहात सुरुवात केली आहे. एका परिचित उत्पादनाला सांस्कृतिक प्रतीकाच्या रूपात नव्याने सादर करून, हा उपक्रम भारतातील आऊटडोअर जाहिरातींना एक वेगळा आणि नवीन आयाम देतो.
या प्रतिकृतीच्या केंद्रस्थानी गणपतीचा आशीर्वाद देणारा हात आहे, जो श्नाइडर इलेक्ट्रिकच्या स्विचेसपासून तयार केलेला आहे. ही लक्षवेधी प्रतिकृती परिचित अभयमुद्रेची पुनर्रचना करते, आणि घराशी संबंधित एका महत्त्वाच्या वस्तूला एका अपारंपरिक उत्सवी अभिव्यक्तीमध्ये रूपांतरित करते.
या प्रतिकृतीवर “निरंतर, निर्विघ्न रहा” अशी ओळ आहे, जी या दृश्याला श्नाइडर इलेक्ट्रिक होम सोल्युशन्स आणि ऊर्जावान तसेच सुरक्षित राहण्याच्या कल्पनेशी जोडते. स्विचच्या परिचित रूपाला सणासुदीच्या सर्वात परिचित अशा प्रतीकांपैकी एकासोबत एकत्र आणून, ही प्रतिकृती श्नाइडर इलेक्ट्रिकच्या नवोन्मेषी दृष्टिकोनाला भारतीय सणांच्या दिनदर्शिकेच्या सांस्कृतिक प्रासंगिकतेशी जोडते.
रोजच्या वापरातील स्विच सणाच्या आशीर्वादाच्या अनपेक्षित अभिव्यक्तीमध्ये रूपांतरित होतो ही कल्पना या मोहिमेच्या जाहिरातीमध्ये जिवंत होते. [मोहिमेची जाहिरात पाहा]
महत्त्वाचे म्हणजे, ही मोहीम ग्राहकांच्या सणासुदीच्या मोठ्या खरेदी प्रवासाचा एक भाग आहे. सणासुदीचा काळ हा एक महत्त्वाचा टप्पा असतो, जेव्हा ग्राहक त्यांच्या घरांचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करतात. उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन्स याची विचारपूर्वक खरेदी करतात. श्नाइडर इलेक्ट्रिकचे उद्दिष्ट आहे की, ग्राहकांना खरेदीच्या विचाराच्या टप्प्यावर गुंतवून ठेवावे, जेणेकरून ते सहजपणे त्यांच्या ‘होम सोल्युशन्स’ पोर्टफोलिओबद्दल जाणून घेऊ शकतील आणि इलेक्ट्रिकल तसेच होम ऑटोमेशन सोल्यूशन्सना त्यांच्या व्यापक सणासुदीच्या खरेदी आणि घराच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात समाविष्ट करू शकतील.
त्यामुळे, ही मोहीम केवळ घराबाहेरील जाहिरातींद्वारे (OOH) जागरूकता निर्माण करण्यापलीकडे आपली छाप सोडते. डिजिटल टचपॉइंट्स ग्राहकांना श्नाइडर इलेक्ट्रिकची उत्पादने शोधण्यात आणि प्रेरणेपासून विचारापर्यंत पोहोचण्यास मदत करतात, तसेच सणासुदीची खरेदी आणि अधिक स्मार्ट, आधुनिक इलेक्ट्रिकल सोल्यूशन्ससह घराचे आधुनिकीकरण यातील संबंध अधिक दृढ करतात.
श्नाइडर इलेक्ट्रिक इंडियाचे मार्केटिंग उपाध्यक्ष, रत्नेश पांडे म्हणाले, “भारतातील सण-उत्सवाशी सगळ्यांचेच भावनिक नाते असते. त्यामुळे, केवळ वरकरणी काहीतरी जोडण्याऐवजी, त्या उत्सवाच्या वातावरणाशी पूर्णपणे एकरूप होईल अशा प्रकारे लोकांसमोर येण्याची आमची इच्छा होती. गणपतीची ही कलाकृती (इन्स्टॉलेशन) ‘स्विच’सारख्या अत्यंत सामान्य वस्तूला एका अशा चिन्हाच्या रूपात सादर करते, जे लोकांचे लक्ष वेधून घेते आणि त्यांना क्षणभर थांबायला भाग पाडते. सणासुदीचा काळ हा ग्राहक आपल्या घरांचे नूतनीकरण करण्यासाठी आणि नवीन उपकरणे व तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वाचा मानतात. आम्हाला ‘श्नाइडर इलेक्ट्रिक होम सोल्युशन्स’ला त्यांच्या या विचारांचा एक स्वाभाविक भाग बनवायचे आहे; तसेच, सणासुदीच्या काळात खरेदी करताना ग्राहकांना योग्य उपाययोजना (सोल्युशन्स) शोधणे अधिक सुलभ करायचे आहे. आमच्यासाठी, नाविन्य आणि सांस्कृतिक सुसंगती यांचा हाच एक सुंदर संगम आहे.”
गणपतीची ही वेगळ्या रूपातील मांडणी ही उत्सवपूर्ण अभिव्यक्तींच्या मालिकेतील पहिली आहे. जसजसा सण पुढे सरकेल, तसतशी ही कल्पना नवनवीन रूपे धारण करेल. प्रत्येक अभिव्यक्ती उत्सवाच्या भावनेने साकारलेली असेल, पण त्यात एक गोष्ट कायम राहील: स्विचचे ओळखीचे रूप, ज्याला एका सांस्कृतिक प्रतीकाच्या रूपात नव्याने सादर केले जाईल.
ही मोहीम श्नाइडर इलेक्ट्रिकच्या एका तत्त्वज्ञानावर आधारित आहे, जे त्यांनी ‘ॲडव्हान्सिंग एनर्जी टेक’ या वचनबद्धतेचा भाग म्हणून आपल्या स्विचेसच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये यावर्षी विस्तारले आहे. अलीकडेच प्रीमियम ‘युनिका एक्स’ श्रेणीमध्ये दिसलेले हे नावीन्य, ही कल्पना प्रतिबिंबित करते की, नावीन्य केवळ स्विचच्या कार्यातच नाही, तर ते कसे दिसते, त्याचा वापर कसा आहे आणि लोकांच्या जीवनाचा भाग कसे बन
ते यातही असते.


