Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedमांडव, फ्लेक्स व रथ ( ट्रॅक्टर ट्रॉली ) कमानी पुढील 48 तासात...

मांडव, फ्लेक्स व रथ ( ट्रॅक्टर ट्रॉली ) कमानी पुढील 48 तासात रस्त्यावरून काढून घ्यावीत – संदीप खर्डेकर

पुणे – यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला आहे मांडव, फ्लेक्स व रथ ( ट्रॅक्टर ट्रॉली ) कमानी पुढील 48 तासात रस्त्यावरून काढण्याची मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.यासंबंधी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही त्रुटी राहिल्या असल्या तरी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली व आपल्या दोन्ही यंत्रणांनी उत्तम कार्य केले याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन.

पोलीस दल व मनपा कर्मचाऱ्यांच्या अविश्रांत मेहनतीमुळे हे शक्य झाले याबद्दल पुणेकरांच्या वतीने आम्ही कृतज्ञ आहोतच !!

आता विषय उत्सवा नंतरच्या व्यवस्थेचा.

माझ्या अनुभवानुसार रस्ते अडविणारे मांडव, मिरवणुकीत सहभागी झालेले रथ ( ट्रॅक्टर व ट्रॉली, गाडे ) कमानी, स्वागत कक्ष,अनेक दिवस रस्त्यावर पडून असतात. तरी पुढील 48 तासात शहरातील सर्व रस्ते हे सुरळीत वाहतुकीसाठी खुले व्हावेत ही माफक अपेक्षा.तसेच अनेक ठिकाणी फ्लेक्स देखील धोकादायक पद्धतीने लावण्यात आले असून काही ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल झाकले गेल्याचे निदर्शनास येते. तरी या सर्व विषयी आपण योग्य कार्यवाही कराल अशी खात्री वाटते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments