एप्रिल , 2024- भारताची अग्रगण्य पेन्ट्स ॲन्ड होम डेकर कंपनी एशियन पेंट्स, द्वारे त्यांचे आगामी नवीन लॉंच -निओ भारत लॅटेक्स पेंट साठी क्रिकेटचा मानचिन्ह विराट कोहली यांचे, ब्रॅन्ड ॲम्बॅसॅडर म्हणून अभिमानाने पदार्पण घोषित.
निओ भारत लॅटेक्स पेंट द्वारे, एशियन पेंट्स गतीशील उद्योगात त्यांची पदचिन्हे अधिक व्याप्त करून रंगाच्या वैविध्यात क्रांती घडवून आणेल आणि तो प्रत्येकासाठीअधिक सहजपणे मिळू शकेल. निओ भारत लॅटेक्स पेंट हा प्रत्येक बाबतीत क्रांतिकारक आहे कारण तो विशिष्ट पॉलिमर तंत्रज्ञानासह सुसज्ज येतो व या मुळे अधिक चांगला फिनिश, अधिक कव्हरेज आणि धुण्यास अधिक सुलभता देऊ करतो. ” कलर्स फॉर प्रोग्रेस- प्रगतीचे रंग” हे नियो भारताचे ब्रीदवाक्य लाखो भारतीयांसाठी आदरांजली आहे जे एका अधिक चांगल्या जीवनाच्या शोधात आहेत आणि एशियन पेन्ट्स त्यांच्या प्रवासात त्यांचा साथीदार बनू इच्छिते.
बाजारपेठेतील प्रस्थापक या नात्याने एशियन पेन्ट्सने मापदंडांची नव्याने व्याख्या करणारी नाविन्यपूर्ण उत्पादने सातत्याने प्रस्तुत केली आहेत आणि नियो भारत लॅटेक्स पेंट या प्रकारात क्रांती निर्माण करण्यासाठी पुन्हा सज्ज आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात या उत्पादना्च्या लॉंचला अधिक चांगला न्याय देणारे विराट कोहलीपेक्षा आणखी वेगळे कोण असू शकेल. एशियन पेन्ट्सचे नेतृत्व, अत्त्युत्कृष्टता व कामगिरीशी वचनबध्दता यांस प्रतिबिंबित करणार्या ब्रॅन्डची मूल्ये व चैतन्य यांचे मूर्तीमंत रूप विराट आहे ज्यामुळे एशियन पेन्ट्स व नाविन्यपूर्ण निओ भारत लॅटेक्स पेन्ट्स यांचा तो आदर्श चेहरा ठरतो.
आगामी लॉंच आणि त्याचा ब्रॅन्ड ॲम्बॅसॅडर यांबद्दल आपला उत्साह व्यक्त करताना अमित सिंगल, ए्म डी व सीईओ, एशियन पेन्ट्स लि. म्हणाले, ” आमचे निओ भारत लॅटेक्स पेन्टचे आगामी लॉंच, हा एशियन पेन्ट्सच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे आणि विराट कोहली हा या भेदक ब्रॅन्डचा चेहरा असल्याने आमचा उत्साह आणखी वाढतो. अनेकांना आजवर जमले नाही अशा पद्धतीने खेळात आणि भारतीय टीममध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे श्रेय आज कोहलीस आहे. त्याची लोकप्रियता भौगोलिक मर्यादा ओलांडते, त्याच्या व्यक्तिमत्त्वात नवीन भारताचा आत्मविश्वास व्यक्त होतो. कोहलीचा जनमानसावरील प्रभाव आणि स्पंदन या क्रांतीकारक उत्पादनाशी तंतोतंत जुळतात. निओ भारत केवळ रंगाच्या प्रकारांची पुन्हा व्याख्या करण्यास सज्ज नसून ते या उद्यमाच्या वृध्दीस चालना देणार आहे. आम्ही विराट कोहलीचे एशियन पेन्ट्स कुटुंबात स्वागत करतो आणि या एकत्र प्रवासाची उत्सुकतेने प्रतीक्षा करतो.”
एशियन पेन्ट्ससह आपल्या सहयोगाबद्दल वक्तव्य करताना विराट कोहली म्हणाला ” आपले नेतृत्व, नाविन्यपूर्ण शोध आणि अत्त्युच्च्य मूल्यांसाठी ओळख असणार्या ब्रॅन्डशी जुळताना मला खरोखरच उत्साह आणि उत्तेजित वाटत आहे. माझ्यासाठी एशियन पेन्ट्स हा ब्रॅन्डपेक्षाही अधिक काहीतरी आहे आणि तो काहीसा क्रिकेटसारखा आहे जे बहुतेक प्रत्येक भारतीय घरात आनंद आणि आपल्या आयुष्यात चैतन्य आणते. या परिवर्तनमय प्रवासाचा एक भाग या नात्याने, एशियन पेन्ट्स निओ भारत लॅटेक्स पेन्टच्या लॉंचमध्ये सहभागी होण्यात मला खरोखर सन्मानित वाटत आहे.हे उत्पादन एशियन पेन्ट्सला नवीन आणि प्रगतीशील भारताचा एक महत्त्वाचा भाग बनवून प्रक्षेपित करेल.
एशियन पेन्ट्स लवकरच निओ भारत लॅटेक्स पेन्टचे आणखी तपशील उघड करेल आणि त्याच्या या चैतन्यशील ब्रॅन्ड ॲम्बॅसॅडरच्या मदतीने एक भव्य जाहिरात मोहिम सुरू करेल. पुढील काही आठवड्यात सर्व माध्यमांत हा प्रचार लाइव्ह होण्यास सज्ज आहे आणि हा आजवरचा सर्वात मोठा असेल


