Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeUncategorized*सेवा संकल्प अभियानांतर्गत ६८६ आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्याचा जागर*

*सेवा संकल्प अभियानांतर्गत ६८६ आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्याचा जागर*

 

 

पुणे, दि.१५ : जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांवर सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित ६८६ आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ३८ हजार ५८७ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. या सुविधेचा २ हजार ४४५ गरोदर महिलांनी लाभ घेतला.

 

या उपक्रमांतर्गत आंबेगाव-१२६, बारामती- ६१, भोर-३४, दौंड- ४९, हवेली- ५७, इंदापूर ४०, जुन्नर ५१, खेड- ४९ मावळ- ७९ मुळशी-२२ पुरंदर- ३४, शिरूर- ७३ तर वेल्हा येथे ११ आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

१७ सप्टेंबर पासून राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, योग व ध्यान सत्र, मोतीबिंदू तपासणी, हायपर टेन्शन तपासणी मधुमेह, कर्करोग तपासणी करण्यात आली असून किशोरवयीन मुलींच्या एचपीव्ही लसीकरण, कुष्ठरोग याबाबत समुपदेशन करण्यात आले.

 

या शिबिरादरम्यान ४ हजार १२६ जोडप्यांना कुटुंब नियोजन बाबत मार्गदर्शन, २६ हजार ८१५ नागरिकांचे हिमोग्लोबिन तपासणी, ११ हजार ७८५ मोतीबिंदू तपासणी, राष्ट्रीय संसर्गजन्य कार्यक्रमांतर्गत ३२ हजार ३६५ नागरिकांची हायपरटेन्शन तपासणी, राष्ट्रीय शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत ४० शस्त्रक्रिया यामध्ये ८ हृदय व इतर ३२ शस्त्रक्रिया, ७३५ लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments