Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडने एमएसआयएफ इक्विटी लाँग-शॉर्ट फंडासह एसआयएफ सेगमेंटमध्ये पदार्पण केले

महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडने एमएसआयएफ इक्विटी लाँग-शॉर्ट फंडासह एसआयएफ सेगमेंटमध्ये पदार्पण केले

एमएसआयएफ अंतर्गत नवीन गुंतवणूक धोरण, ज्याचे डेरिव्हेटिव्ह साधनांच्या माध्यमातून लाँग इक्विटी संधी आणि निवडक शॉर्ट पोझिशन्स यांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे.

मुंबई, २८ सप्टेंबर २०२६: महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाने आज आपल्या स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड प्लॅटफॉर्म अंतर्गत ओपन-एंडेड इक्विटी गुंतवणूक धोरण एमएसआयएफ इक्विटी लाँग-शॉर्ट फंडच्या लाँचची घोषणा केली. ही न्यू फंड ऑफर (एनएफओ) ३० सप्टेंबर २०२६ रोजी खुली होईल आणि १४ ऑक्टोबर २०२६ रोजी बंद होईल. ही गुंतवणूक योजना २६ ऑक्टोबर २०२६ पासून सतत विक्री व पुनर्खरेदीसाठी पुन्हा खुली होईल.

एमएसआयएफ इक्विटी लाँग-शॉर्ट फंड प्रामुख्याने सूचीबद्ध इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करेल, तसेच डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून निवडक शॉर्ट पोझिशन्सचाही वापर करेल. बाजारपेठेतील वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये संधी शोधून दीर्घकालीन भांडवल वाढ निर्माण करणे आणि संपूर्ण बाजारपेठ चक्रात जोखीम-समायोजित परतावा मिळवून देणे हे या गुंतवणूक धोरणाचे उद्दिष्ट आहे.

हे धोरण इक्विटी गुंतवणुकीसाठी लवचिक दृष्टिकोनाभोवती डिझाइन करण्यात आले आहे, यामध्ये लाँग पोझिशन्ससोबत निवडक शॉर्ट पोझिशन्सचा समन्वय साधण्यात आला आहे. यामुळे पोर्टफोलिओ रचना आणि जोखीम व्यवस्थापनाच्या निश्चित मर्यादांचे पालन करत, वाढत्या व घसरत्या बाजारपेठेत गुंतवणुकीच्या संधी शोधणे व्यवस्थापन टीमला शक्य होते. या गुंतवणूक प्रक्रियेमध्ये मॅक्रो विश्लेषण, मुलभूत समभाग निवड आणि संरचित जोखीम व्यवस्थापन आराखडा यांचे संयोजन आहे.

या गुंतवणूक दृष्टिकोनात टॉप-डाउन आणि बॉटम-अप विश्लेषणाचा वापर केला जातो. मॅक्रो मूल्यांकनामध्ये व्याजदर आणि महागाई, आर्थिक वाढ, तरलता, बाजारपेठेतील ओघ आणि भू-राजकीय जोखीम यांसारख्या घटकांचा विचार केला जातो, तर समभाग निवडीमध्ये मूलभूत संशोधन आणि परिमाणात्मक घटकांचा समावेश असतो. जोखीम व्यवस्थापन आराखड्यात स्टॉक-स्तरीय हेजिंग, सेक्टर डेव्हिएशन मर्यादा, पोर्टफोलिओ हेजेस, पोझिशन मर्यादा आणि ड्रॉडाऊन ट्रिगर्स यांचा समावेश आहे.

थोडक्यात, हे धोरण संशोधन-आधारित आराखड्याचे पालन करते, ज्यामध्ये धोरण आणि मालकीहक्क, व्यवसाय आणि प्रशासन, तसेच उत्पन्न आणि मूल्यांकन यांसारख्या घटकांचे मूल्यांकन केले जाते. केवळ बाजारपेठेतील प्रवाहाचा अंदाज घेऊन शॉर्ट पोझिशन्सचा निश्चित उत्प्रेरक आणि ठोस पुराव्यांच्या आधारे विचार केला जातो.

या लाँचबाबत मत व्यक्त करत महिंद्रा मॅन्युलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ अँथनी हेरेडिया म्हणाले, “एमएसआयएफ इक्विटी लाँग-शॉर्ट फंडच्या लाँचसह आम्ही स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड क्षेत्रात प्रवेश केला आहे. तसेच, यामधून बदलत्या गुंतवणूकदारांच्या गरजांनुसार वैविध्यपूर्ण गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. बाजारपेठ अधिक गतिमान होत आहे, तसे गुंतवणूकदार वेगवेगळ्या बाजारपेठ चक्रांमध्ये संधींचा फायदा घेऊ शकणाऱ्या धोरणांचा शोध घेत आहेत. या योजनेमध्ये लाँग-शॉर्ट दृष्टिकोनाची लवचिकता आणि म्युच्युअल फंड आराखड्यातील पारदर्शकता, सुशासन व शिस्त यांचे उत्तम संयोजन आहे.”

महिंद्रा मॅन्युलाइफ इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे इक्विटीचे सीआयओ कृष्णा सांघवी म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसोबत भारतातील गुंतवणूकदारांचे दरडोई उत्पन्न आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेला अधिभार वाढत आहे. आधुनिक व अनुभवी गुंतवणूकदार नवीन मालमत्ता वर्गांमध्ये सहभागी होऊ इच्छितात, त्यामुळे ते पारंपारिक लाँग-ओन्ली दृष्टिकोनापलीकडे जाऊन बाजारपेठेतील संधी शोधतात. फंडामेंटल्स किंवा व्हॅल्यूएशन फारसे अनुकूल वाटत नाहीत, तिथे निवडक शॉर्ट पोझिशन घेत, दृढ विश्वास असलेल्या दीर्घकालीन संधी ओळखणे हे या फंडाचे उद्दिष्ट आहे. सखोल संशोधन आणि शिस्तबद्ध जोखीम व्यवस्थापनासह हे गुंतवणूक धोरण बाजारपेठेच्या बदलत्या वातावरणात जोखीम-समायोजित परतावा देण्याचा प्रयत्न करते.”

या फंडाचे व्यवस्थापन अभिषेक जयस्वाल आणि आलाप शाह यांच्याद्वारे केले जाईल, ज्यांच्याकडे भारतातील इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि लाँग-शॉर्ट गुंतवणूक धोरणांचा व्यापक अनुभव आहे. अभिषेक जयस्वाल यांच्याकडे लाँग, लाँग-शॉर्ट आणि सेक्टर-आधारित इक्विटी धोरणांचा १८ वर्षांहून अधिक काळ गुंतवणूक व्यवस्थापनाचा अनुभव आहे, तसेच, लाँग-शॉर्ट पोर्टफोलिओमध्ये एक दशकाहून अधिक विशेष प्राविण्य आहे. आलाप शाह हे भारतातील इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह बाजारपेठेमधील २० वर्षांहून अधिक अनुभव असलेले अनुभवी व्यावसायिक आहेत. त्यांनी ५ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्ता व्यवस्थापित करणाऱ्या गुंतवणूक धोरणांच्या व्यवस्थापनात योगदान दिले आहे.

एमएसआयएफ इक्विटी लाँग-शॉर्ट फंड रेग्युलर आणि डायरेक्ट प्लॅन्स, तसेच ग्रोथ आणि इन्कम डिस्ट्रिब्युशन कम कॅपिटल विड्रॉव्हल पर्यायांसह उपलब्ध असेल. या योजनेसाठी किमान अर्जाची रक्कम १० लाख रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत आहे, तर मान्यताप्राप्त गुंतवणूकदारांसाठी किमान अर्जाची रक्कम १ लाख रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत आहे. या योजनेची तुलना निफ्टी ५०० टीआरआय निर्देशांकाशी केली जाईल.

या गुंतवणूक धोरणाला रिस्क बँड लेव्हल ५ अंतर्गत वर्गीकृत करण्यात आले आहे. ही योजना प्रामुख्याने सूचीबद्ध इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करून आणि डेरिव्हेटिव्ह्जद्वारे मर्यादित शॉर्ट पोझिशन्सचा वापर करून दीर्घकालीन भांडवल वाढ शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी

योग्य आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments