पुणे, दि. 1 : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत देहू नगरपंचायत कार्यालयात योग व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला.
यावेळी योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. नियमित योग व ध्यानामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य टिकविण्यास मदत होते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरास अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
०००


