Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रपुरुषांना भव्य चित्रांद्वारे अनोखी मानवंदना* जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजन

राष्ट्रपुरुषांना भव्य चित्रांद्वारे अनोखी मानवंदना* जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजन

 

 

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस व जाधवर फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, पुणे यांच्या वतीने ४० बाय ८० फूट आकारातील भव्य चित्रांद्वारे या राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यात आले.

 

नऱ्हे येथील संस्थेच्या प्रांगणात हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात तब्बल २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत, आठवडाभर परिश्रम घेऊन दोन भव्य चित्रांची निर्मिती केली. ही चित्रे संस्थेतील विद्यार्थिनींनी तयार केली आहेत.

 

संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. राष्ट्रपुरुषांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा एक नाविन्यपूर्ण प्रयत्न करण्यात आल्याचे ॲड. शार्दुल जाधवर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments