Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिलांच्या त्यागामुळे धर्म आणि संस्कृतीचे जतन* डॉ. ओमेंद्र रत्नू यांचे प्रतिपादन...

महिलांच्या त्यागामुळे धर्म आणि संस्कृतीचे जतन* डॉ. ओमेंद्र रत्नू यांचे प्रतिपादन ; राजपूत समाजातील सर्व कुळे व शाखांसाठी भारत देशातील प्रथम राजभाट – राव भाट संमेलनाचे आयोजन

 

 

पुणे : आज आपण हिंदू आहोत ते महिलांच्या त्यागामुळे आहोत. शत्रू जेव्हा किल्ल्यावर चाल करून येत असे, तेव्हा स्त्रिया शत्रूच्या कैदेत किंवा अत्याचाराला सामोरे जाण्याऐवजी सामूहिक अग्निप्रवेश करून जोहर करीत. त्यांच्या या त्यागातून शौर्य, स्वाभिमान आणि संस्कृतीच्या जतनाचे महत्त्व दिसून येते. आजच्या काळात महिलांनी आपली शक्ती ओळखणे आवश्यक आहे. महिला आपली शक्ती ओळखणार नाहीत, तोपर्यंत धर्माचे जतन होऊ शकत नाही, असे प्रतिपादन राजस्थानचे इतिहास अभ्यासक डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी केले.

 

श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मी मंदिरात बिबवेवाडी पुणे च्या वतीने राजपूत समाजातील सर्व कुळे व शाखांसाठी राज भाट संमेलनाचे आयोजन करण्यात आले. मंदिराच्या सभामंडपात आयोजित संमेलनाला समाजातील विविध कुळे व शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी यज्ञदत्त हजारे, समस्त राजपूत महिला संघाच्या अध्यक्षा मिनल हजारे, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत, अमरावती विभागीय अध्यक्ष अतुलसिंह बैस, महाराणा प्रताप सेवा संघाचे अध्यक्ष विकासासिंह हजारे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन समस्त राजपूत महिला संघाच्या वतीने करण्यात आले. सुजाता परदेशी, संगीता कुंदावला व सरिता कनोजिया यांनी संयोजन केले.

 

डॉ. ओमेंद्र रत्नू यांचे ‘राजपूतों के इतिहास का नाश क्यों और कैसे?’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी त्यांनी राजपूत महाराजा आणि महाराणी यांचा त्याग, साका जोहर, आज पाकिस्तानमध्ये राहत असलेले हिंदू लोक, धर्म व संस्कृतीचे संरक्षण व जतन या विषयी मार्गदर्शन केले.

 

यज्ञदत्त हजारे म्हणाले, अनेक राजपूत समाजातील बांधवांना त्यांचे कुळ, वंश, मूळ ठिकाण याची माहिती नाही. या संमेलनाच्या माध्यमातून त्यांना योग्य माहिती मिळावी याउद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संमेलनात सहाभागी अनेक राजपूत समाजातील परिवाराना राजस्थान येथून आलेले भाट यांच्या कडून आपल्या वंशावळीची व मूळ ठिकाणाची माहिती मिळाली. संमेलनात बीड, बुलढाणा, मलकापूर, अमरावती, सातारा, कोल्हापूर अशा अनेक शहरातून समाज बांधव उपस्थित होते.

 

मिनल हजारे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत जिजामाता यांच्या संस्कारांचे मोठे योगदान होते, तर जयवंता बाई यांनी महाराणा प्रताप यांच्यावर केलेल्या संस्कारांमुळे ते महान योद्धा घडले. आजच्या काळातील महिलांनीही आपल्या संस्कृतीचे जतन करत संस्कारक्षम आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. मिनल हजारे यांनी सूत्रसंचालन केले. पूनम राजपूत यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments