Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedओबीसींच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात साखळी उपोषणाला सुरुवात* सकल ओबीसी समाज, पुणे...

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात साखळी उपोषणाला सुरुवात* सकल ओबीसी समाज, पुणे चा सहभाग

 

 

पुणे : ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषणाला सुरुवात झाली. उपोषणात मंगेश ससाणे, मृणाल ढोले, सुनीता भगत, दिपक जगताप, शोभा शेवकरी, नितीन बोराटे, धनंजय झुरंगे, हनुमंत टिळेकर, सतिश गिरमे स्वप्नील वाघमारे यांसह सकल ओबीसी समाज, पुणे सहभागी झाले आहेत.

 

ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये जातनिहाय जनगणना, बोगस कुणबी दाखल्यांवर कारवाई, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व वसतिगृह सुविधा, शिक्षण व रोजगारातील आरक्षणाचा अनुशेष भरून काढणे, स्वतंत्र व पुरेसा ओबीसी निधी, राजकीय आरक्षणा संदर्भातील प्रश्न तसेच मंडल आयोगाची पूर्ण अंमलबजावणी यांचा समावेश आहे वेळोवेळी प्रशासनाला व सरकारला सांगूनही देखील दखल घेतली नाही, त्यामुळे ११ सप्टेंबरला धरणे आंदोलन करण्यात आले होते. पण प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आता साखळी उपोषण सुरु करण्यात आले.

 

या साखळी उपोषणाची सुरुवात रणरागिणी गौरीताई अक्षय पिंगळे, सुरेश सोपानराव कालेकर (शिंपी समाज) आणि बंडू उर्फ दीपक विठ्ठलराव कचरे यांच्या सहभागाने झाली. आंदोलनात विविध ओबीसी संघटना व कार्यकर्ते सहभागी झाल्या असून, शासनाने ओबीसी समाजाच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments