Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोरेगाव पार्क येथील मतदान यंत्र वितरण केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची...

कोरेगाव पार्क येथील मतदान यंत्र वितरण केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची भेट*

 

 

पुणे, दि.५: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राचे आज कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले. जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी वितरण केंद्राला भेट देवून प्रक्रियेची पाहणी केली.

 

मतदान यंत्र वितरण प्रक्रिया पारदर्शकपणे करावी. वितरणाचे कामकाज दोन पाळ्यामध्ये करता येईल का याची चाचपणी करावी, यंत्राची वाहतूक करताना सुरक्षाविषयक नियमांचे तंतोतंत पालन करावे, उन्हाची तीव्रता लक्षा घेता कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा करण्यात याव्यात. ईव्हीएम यंत्राची वाहतूक करताना निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे पालन व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी यावेळी दिले.

 

यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवळे यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी आदी उपस्थित होते.

 

सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान यंत्राचे वितरण सुरू करण्यात आले आहे. भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदाम परिसरात दोन गोदामांच्यामध्ये मंडप टाकण्यात आले आहे. या मंडपात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर मतदान यंत्राची स्कॅनिंग करण्यात येत असून बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट लोखंडी पेट्यामध्ये ठेवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. एका पेटीत १० बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट ठेवल्यानंतर त्या पेट्या आणि व्हीव्हीपॅट यंत्र विधानसभा मतदारसंघनिहाय नेमून दिलेल्या गोदामात ठेवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील यंत्र स्वीकारण्यासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र योग्य ठिकाणी जावे म्हणून मतदारसंघनिहाय वेगळ्या रंगाचे टी-शर्ट देण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वितरणासाठी प्रत्येकी ५ कक्ष तयार करण्यात आले असून या कक्षात १५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आज पहिल्या दिवसाची सुरूवात कंट्रोल युनिटच्या वितरणाने करण्यात आली.

 

जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकियेनंतर प्राप्त यादीनुसार वितरण कक्षामधील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट शोधून त्यांची संबंधित मतदारसंघाला वितरण करण्यात आल्याची नोंद करण्यात येत आहे. एका यंत्राची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कर्मचारी पुढील यंत्रासाठी पुढील वितरण कक्षाकडे जाईल, याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. वितरणासंदर्भातील मदतीकरीता स्वतंत्र मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. वितरीत केले यंत्र जीपीएस यंत्र असलेल्या वाहनातून पोलीस बंदोबस्तात त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रुम नेण्यात येतील, अशी माहिती निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments