या प्रीमियम को-लिव्हिंग प्रॉपर्टीमध्ये फर्निश केलेली निवास व्यवस्था, व्यवस्थापित सेवा आणि व्यावसायिक, उद्योजक व क्रिएटिव्ह व्यक्तींच्या दैनंदिन जीवनशैलीसाठी डिझाइन करण्यात आलेली सामायिक स्पेस आहे
पुणे, ५ ऑक्टोबर २०२६: ट्राइब स्टेजने पुण्यातील बाणेर येथे आपली फ्लॅगशिप प्रीमियम को-लिव्हिंग प्रॉपर्टी ट्राइब कम्यून मासाई लाँच केली आहे. ३० सप्टेंबर रोजी अनावरण करण्यात आलेली ही प्रॉपर्टी फर्निश केलेली निवास व्यवस्था, आदरातिथ्य सेवा, को-वर्किंग सुविधा आणि सोशल स्पेसेस एकत्र आणून रहिवाशांना त्यांचे राहणे, काम करणे आणि एकमेकांशी कनेक्टेड राहणे सुलभ होईल अशा पद्धतीच्या सदनिका उपलब्ध करून देते.
पॅन कार्ड क्लब रोडवर वसलेले ट्राइब कम्यून, ट्राइब स्टेजच्या समुदाय-केंद्रित जीवनशैलीच्या दृष्टिकोनावर आधारित आहे, ज्यामध्ये स्वतंत्र खाजगी लिव्हिंग स्पेस आणि व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेल्या निवासाची सोयीसुविधा आहे. नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, क्रिएटिव्ह व्यक्ती आणि शहरात नव्याने स्थलांतरित होणाऱ्या व्यक्तींसाठी डिझाइन केलेली ही प्रॉपर्टी उत्साहवर्धक अनुभवासह दैनंदिन गरजेची पूर्तता करते, तसेच इतरांना भेटण्याच्या सोईस्कर सुविधा देते.
या फ्लॅगशिप प्रॉपर्टीमधील वातानुकूलित निवास व्यवस्थेत प्रत्येक रूमच्या श्रेणीनुसार फर्निचर आणि सुविधा आहेत, ज्यामध्ये पॅन्ट्री सेटअप, स्टडी डेस्क, स्मार्ट टीव्ही आणि पुरेशा स्टोरेजचा समावेश आहे.
रूम्स व्यतिरिक्त ट्राइब कम्यूनच्या डिझाइनमध्ये शेअर्ड स्पेसेसना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक मजल्यावरील को-वर्किंग झोन्स आणि ब्रेकआउट एरिया एकाग्रतेने काम करण्यासाठी, तसेच अनौपचारिक सहयोगासाठी जागा उपलब्ध करून देतात. तसेच कॅफे, रेस्टॉरंट, गेमिंग लाउंज आणि अॅम्फीथिएटर रहिवाशांना एकत्र वेळ घालवण्यासाठी उत्साहवर्धक वातावरण निर्माण करतात. मनोरंजन आणि स्वास्थ्यासाठी स्विमिंग पूल, जिम आणि मेडिटेशन झोन उपलब्ध आहे. येथे २०० आसनांचा इव्हेंट स्पेस ‘द हॉल’ देखील आहे.
या लाँचबाबत मत व्यक्त करत ट्राइब स्टेजचे संस्थापक आणि सीईओ योगेश मेहरा म्हणाले, “नवीन शहरात स्थलांतरित होणे म्हणजे केवळ राहणे नसून तिथे स्वतःचे आयुष्य घडवणे, आपली दैनंदिन दिनचर्या शोधणे, आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे आणि शहराला घरासारखे वाटायला लावणाऱ्या माणसांना भेटणे होय. ट्राइब कम्यूनच्या माध्यमातून आम्ही या सर्व गरजा विचारपूर्वक डिझाइन केलेल्या वातावरणात एकत्र आणल्या आहेत. येथे रहिवाशांना स्वतःची खाजगी जागा आणि स्वातंत्र्य मिळते, तर दैनंदिन सेवा, काम करण्याची ठिकाणे आणि एकमेकांशी जोडल्या जाण्याच्या संधी अगदी जवळच्या अंतरावर आहेत. या प्रमुख प्रॉपर्टीमधून आमचा विश्वास दिसून येतो की, तुम्ही राहत असलेल्या जागेचा दर्जा शहराचा अनुभव घेण्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडू शकतो.”
ट्राइब कम्यूनच्या व्यवस्थापित लिव्हिंग ऑफरिंगमध्ये हाउसकीपिंग, लाँड्री, लिनन बदलणे, वाय-फाय आणि भोजनाचे पर्याय समाविष्ट आहेत, ज्यांचे स्वरूप निवडलेल्या पॅकेजवर अवलंबून असते. तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था रहिवाशांच्या सुरक्षिततेवर भर देते, तर काम, फिटनेस आणि कम्युनिटी स्पेसेसची उपलब्धता प्रॉपर्टीमध्ये उत्साहवर्धक दैनंदिन दिनचर्या तयार करणे सोपे करते.
एक महिन्यापासून एक वर्षापर्यंत मुक्कामाच्या पर्यायांसोबत ट्राइब कम्यून कॉर्पोरेट समूहांसाठी डे-स्टे पर्यायांसह बल्क डील्स देखील उपलब्ध करून देते. नवीन नोकरीत सामावून जाण्यापासून दीर्घकालीन व्यावसायिक प्रोजेक्ट्स स्वीकारण्यापर्यंत शहरातील जीवनाच्या विविध टप्प्यांनुसार ही व्यवस्था सुसंगत ठरते. बाणेरमधील या स्थानामुळे येथील रहिवाशांना व्यावसायिक केंद्रे, को-वर्किंग ऑफिसेस, तसेच बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरातील हॉटेल्स आणि मनोरंजनाचे पर्याय सहज उपलब्ध होतात.
ट्राइब कम्यूनच्या या फ्लॅगशिप प्रॉपर्टीसह ट्राइब स्टेज पुण्यातील आपली उपस्थिती अधिक दृढ करत आहे, तसेच व्यवस्थापित लिव्हिंग क्षेत्रात आपल्या पुढील वाढीचा पाया रचत आहे, ज्याचा मूळ उद्देश अगदी स्पष्ट आहे: व्यक्तींना केवळ राहण्यासाठी जागा देण्यापलीकडे जाऊन शहरात आपले आयुष्य घडवण्यासाठी उत्तम ठि
काण निर्माण करणे.


