Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक निवडणूकीसाठी एमसीएमसी समिती कार्यान्वित*

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक निवडणूकीसाठी एमसीएमसी समिती कार्यान्वित*

 

 

*इलेक्ट्रॉनिक माध्यमातील राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक-शीतल तेली-उगले*

 

पुणे, दि. ५ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक- २०२६ च्या अनुषंगाने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली असून निवडणूक प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे बल्क एसएमएस, रेकॉर्डेड व्हाईस मेसेजेस, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील तसेच सर्व प्रकारच्या डिजिटल मीडिया जाहिराती यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक आहे, असे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.

 

निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून विविध माध्यमांचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर होत असतो. एमसीएमसी समितीमार्फत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासोबतच राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात येते. निवडणूक प्रचाराच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल वाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस तसेच सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेणे आवश्यक आहे.

 

प्रमाणित करावयाच्या जाहिरातीचा मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात आणि दोन प्रतीत संहितेसह समितीकडे प्रसारणाच्या ३ दिवस अगोदर सादर करावा. उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीशी (एमसीएमसी) संबंधित जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments