Tuesday, October 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedअनुप देशमुख यांची डॅनफॉस पॉवर सोल्युशन्स इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती 

अनुप देशमुख यांची डॅनफॉस पॉवर सोल्युशन्स इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती 

 

 

सप्टेंबर 29, 2026 | पुणे, भारत

 

मोबाईल आणि औद्योगिक हायड्रॉलिक्स, तसेच इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सिस्टम्सचा आघाडीचा जागतिक पुरवठादार असलेल्या डॅनफॉस पॉवर सोल्युशन्सने आपल्या भारतातील व्यवसायाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अनुप देशमुख यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदावर देशमुख हे कंट्रोल्स विभागाचे अध्यक्ष हेन्रिक व्ही. योर्गेन्सेन यांना थेट अहवाल देतील. देशमुख हे भारतातील पुणे येथे कार्यरत आहेत.

आपल्या नव्या भूमिकेत देशमुख हे व्यवसायाची वाढ साध्य करण्यासाठी आणि संपूर्ण भारतात डॅनफॉस पॉवर सोल्युशन्सच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असतील. ते प्रमुख ग्राहक, भागीदार आणि हितधारकांसोबत मजबूत संबंध निर्माण करून ते टिकवून ठेवतील. तसेच, विविध कार्यक्षेत्रांमध्ये प्रतिभावान मनुष्यबळ आकर्षित करणे, त्यांचा विकास करणे आणि त्यांना संस्थेत टिकवून ठेवण्यासाठी धोरणे तयार करून त्यांची अंमलबजावणी करतील. देशमुख हे डॅनफॉस पॉवर सोल्युशन्स इंडिया लीडरशिप टीमचे नेतृत्व करतील. तसेच, डॅनफॉस इंडिया कंट्री गव्हर्नंस बोर्डवर ते पॉवर सोल्युशन्स विभागाचे प्रतिनिधित्व करतील.

 

“भारत हा डॅनफॉस पॉवर सोल्युशन्ससाठी सर्वात महत्त्वाच्या वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि आमच्या प्रवासाच्या या टप्प्यावर येथील टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे,” असे देशमुख म्हणाले. “ग्राहकांसोबतची आमची भागीदारी अधिक मजबूत करणे, स्थानिक क्षमता विकसित करणे आणि भारतातील आमच्या व्यवसायाला दीर्घकालीन व शाश्वत वाढीसाठी सक्षम बनवणे, हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल.”

 

“अनुप यांच्याकडे भारत तसेच व्यापक आशिया-पॅसिफिक प्रदेशातील कामकाज आणि व्यावसायिक क्षेत्रातील सखोल अनुभव आहे,” असे योर्गेन्सेन म्हणाले. “उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीम्स उभारण्याचा आणि व्यवसायाची वाढ साध्य करण्याचा त्यांचा अनुभव, भारतात एक धोरणात्मक बाजारपेठ म्हणून आम्ही सातत्याने गुंतवणूक करत असताना, आमच्यासाठी मोठी जमेची बाजू ठरेल.”

देशमुख आपल्या नव्या भूमिकेत विक्री, व्यवसाय विकास, सर्वसाधारण व्यवस्थापन, उत्पादन कार्यप्रणाली आणि धोरणात्मक वाढ अशा विविध क्षेत्रांतील जवळपास 28 वर्षांचा अनुभव घेऊन रुजू झाले आहेत. ते पार्कर हॅनिफिनमधून डॅनफॉसमध्ये दाखल झाले आहेत. पार्कर हॅनिफिनमध्ये त्यांनी भारत, चीन आणि आग्नेय आशियामध्ये वरिष्ठ नेतृत्वाच्या विविध भूमिका बजावल्या. अलीकडे ते भारतातील कंपनीच्या फिल्ट्रेशन, इंजिनियरिंग मटेरियल, इन्स्ट्रुमेन्टेशन, फ्लुइड कंट्रोल आणि मोशन कंट्रोल या विभागांमध्ये कंट्री सेल्स डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. पार्कर हॅनिफिनमध्ये रुजू होण्यापूर्वी देशमुख यांनी भारतात जनरल इलेक्ट्रिकमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम केले आहे.

 

 

देशमुख यांनी शिवाजी विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. तसेच, त्यांनी एनएमआयएमएसमधून मार्केटिंग आणि आयसीएफएआयमधून बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा प्राप्त

केला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments