Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorized‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत राज्यस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा व कला प्रदर्शनाचे...

‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत राज्यस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा व कला प्रदर्शनाचे आयोजन*

 

 

पुणे, दि.९: राज्य शासनातर्फे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे; या अभियानाचा भाग म्हणून कला संचालनालयामार्फत राज्यस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा व कला प्रदर्शनाचे आयोजनास मान्यता देण्यात येत असल्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा शासन निर्णय ८ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

 

राज्यातील महाविद्यालयीन तरुण चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा व प्रदर्शनाच्या आयोजनासाठी शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील विभागप्रमुख विजय विष्णू बोंदर यांची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चित्रकला स्पर्धेसाठी प्रस्तावित परीक्षण समितीलाही मान्यता देण्यात आली असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments