Thursday, October 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय खेळाडूंसमोर जागतिक दर्जाच्या खेळाडूंचे आव्हान डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप...

भारतीय खेळाडूंसमोर जागतिक दर्जाच्या खेळाडूंचे आव्हान डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप दिल्ली गोल्फ कोर्सवर प्रारंभ

दिल्ली गोल्फ कोर्सवर आजपासून सुरु होत असलेल्या डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपमध्ये अव्वल भारतीय खेळाडूंसमोर जागतिक दर्जाच्या खेळाडूंचे आव्हान असणार आहे. मात्र, याच जागतिक खेळाडूंसमोरही दिल्लीच्या अत्यंत खडतर गोल्फ कोर्सवर चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.

 

आजपासून 18 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या व ४०लाख डॉलर पारितोषिक रकमेच्या या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या जगातील अनेक मेजर विजेत्या, रायडर कप विजेत्या खेळाडूंच्या बरोबरीने त्यांचा खेळ घरच्या पाहण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळणार आहे. सध्याच्या जागतिक गोल्फ विश्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडू रोरी मॅकलरॉय याच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला आगळे वलय प्राप्त झाले असून डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपचा ग्लोबल अँबॅसिडर हा बहुमान त्याला देण्यात आला आहे.

 

भारतात या स्पर्धेसाठी आल्याबद्दल आनंद व्यक्त करताना तो म्हणाला की, या स्पर्धेचे प्रायोजक डीपी वर्ल्ड टूर यांचे प्रतिनिधित्व करणे हा मोठाच मान आहे. दिल्लीच्या खडतर गोल्फ कोर्सबद्दल प्रशंसोद्गार काढून तो म्हणाला की, या कोर्सवर लांबवर फटके मारण्यापेक्षा येथील घनदाट झाडीमुळे कल्पक फटकेबाजी करणे अधिक महत्वाचे ठरणार आहे.

 

गतविजेता टॉमी फ्लिटवूड म्हणाला की, मी गेल्यावर्षी इतका भरात नसलो तरी लोटस करंडक पटकावण्यासाठी माझे आव्हान निश्चितच राहील. गेल्यावर्षी मी माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होतो.

 

भारतीय खेळाडूंपैकी दोन वेळा डीपी वर्ल्ड टूर जिंकणारा शुभंकर शर्मा गेल्याच आठवड्यात एक स्पर्धा जिंकून परतला आहे. दिल्ली गोल्फ कोर्सचा त्याला उत्तम अनुभव असल्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. जगभरात अनेक स्पर्धा खेळून विविध आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी लढण्याच्या अनुभव असलेला अनिर्बन लाहेरी, तसेच सप्तक तलवार, करणदिप कोचर, वीर अहलावत, युवराज संधू, सचिन बैसोया आणि शिवकपूर या खेळाडूंवर भारताची मदार राहणार आहे. मात्र अकरा वेळा एशियन टूर जिंकणाऱ्या गगनजीत भुल्लर याने माघार घेतल्यामुळे भारताच्या आव्हानाला धक्का बसला आहे.

 

डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपसाठी डीपी वर्ल्ड हे मुख्य प्रायोजक असून हिरो फिनकॉर्प, एएम ग्रीन आणि ब्लूम बर्ग हे प्लॅटिनम प्रायोजक आहेत. याशिवाय एडब्ल्यूएस, जीएमआर एरो आणि एचएसबीसी हे प्रीमियर प्रायोजक, तर अल्डर, एचसीएल टेक, ओमेगा, कोहलर आणि एमिरेट्स हे अधिकृत भागीदार आहेत. बिसलेरी, मेदांता, द ओबेरॉय, निकोबार, हाऊस ऑफ ग्लेनफ़िडीच, टेलरमेड इंडिया व पोकारी स्वीट्स हे स्पर्धेसाठी अधिकृत पुरवठावदार आहेत.

 

कुतुबमिनार उजळला डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिपच्या योजनेने

 

आजपासून दिल्लीत सुरु होत असलेल्या डीपी वर्ल्ड इंडिया चॅम्पियनशिप च्या निमित्ताने मुख्य प्रायोजक व जागतिक लॉजिस्टिक उद्योगाचे अग्रणी डीपी वर्ल्ड यांनी ऐतिहासिक स्मृती स्थळ कुतुबमिनार येथे विशेष विद्युत रोषणाई केली होती. यावेळी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा यांसह भारताच्या सांस्कृतिक कला व विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या विविध घटनांसह दिल्लीच्या गोल्फ कोर्सचे दर्शन घडविण्यात आले.

 

यावेळी डीपी वर्ल्डच्या भारतीय उपखंडाचे व्यवस्थापक हेमंत कुमार रुईया यांनी सांगितले कि, या स्पर्धेमुळे भारताला जागतिक गोल्फच्या नकाशावर महत्वाचे स्थान मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. तसेच भारतीय खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंबरोबर एकाच व्यासपीठावर येण्याची संधी आम्ही मिळवून दि

ली आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments