ही पहिली अशी सुविधा आहे ज्यामध्ये प्रीपेड ग्राहक ‘वी’ ॲपवर देशात कुठूनही ‘वी प्रीपेड फॅमिली’ तयार करू शकतील; ज्यामध्ये डेटा शेअरिंग, खात्रीशीर बचत आणि विशेष ऑफर्सचा फायदा मिळेल
‘वी’ मध्ये ‘वी पे सब है व्हीआयपी’ हा विचार महत्त्वाचे फायदे प्रत्येकाला मिळाले पाहिजेत, हा ब्रँडचा विश्वास दर्शवतो. हेच आश्वासन पूर्ण करत ‘वी’ ने आज ‘वी प्रीपेड फॅमिली प्लॅन’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. पारंपारिक प्लॅन्सपेक्षा खूप वेगळा आणि भारतातील पहिलाच असा हा प्लॅन आहे. याचा लाभ घेऊन कुटुंबातील सदस्य देशात कुठेही राहून एकमेकांसोबत डेटा शेअर करू शकतात. ही नवीन सुविधा प्रीपेडच्या आजवरच्या अनुभवाला एक नवे रूप देते, ज्यामध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याचा डेटा संपला किंवा कमी पडला तरी त्याला सहज डेटा शेअर करण्याची लवचिकता ग्राहकांना मिळते.
आजच्या जगात आपण अनेक छोट्या-मोठ्या कारणांसाठी डिजिटल सोयीसुविधांचा वापर रोजच्या रोज करत असतो. अशावेळी जर डेटा अचानक संपला तर एखादा महत्त्वाचा व्हिडिओ कॉल मिस होणे, ऑनलाइन क्लासमध्ये अडथळा येणे, मॅप्सशिवाय कुठेही अडकून पडणे किंवा आवश्यक ॲप्स आणि सेवांचा वापर बंद होणे अशा अनेक समस्या येऊ शकतात. आज कुटुंबात आपण एकमेकांना रोज असंख्य प्रकारे मदत करत असतो, पण मोबाईल डेटा मात्र प्रामुख्याने एका वैयक्तिक स्रोतासारखाच राहिला आहे. ‘वी प्रीपेड फॅमिली प्लॅन’ मात्र हे चित्र बदलत आहे.
‘वी’ चे सर्व ॲक्टिव्ह प्रीपेड ग्राहक ‘वी’ ॲपचा वापर करून जास्तीत जास्त चार सदस्यांचा एक फॅमिली ग्रुप तयार करू शकतात— यामध्ये एक प्रायमरी मेंबर आणि उर्वरित तीन सेकंडरी मेंबर्स असतील. प्रत्येक सदस्याचा स्वतःचा मूळ प्रीपेड प्लॅन आणि वैधता कायम राहील, तरीही त्यांना डेटा शेअर करण्याचे आणि कुटुंबाला एकमेकांशी जोडून ठेवण्याचे स्वातंत्र्य मिळवता येईल. ‘वी प्रीपेड फॅमिली’ मधील सदस्य कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याचा डेटा संपत आल्यास किंवा कमी पडल्यास, त्यांना ऑनलाइन राहण्यास मदत करण्यासाठी एका वेळी ५०० एमबी डेटा शेअर करू शकतात.
याशिवाय, फॅमिली ग्रुपमधील प्रत्येक सदस्याला ‘वी’ ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक रिचार्जवर १० टक्क्यांपर्यंत खात्रीशीर डिस्काउंट मिळेल.
‘वी’ चे चीफ मार्केटिंग ऑफिसर अवनीश खोसला म्हणाले: “‘वी’ मध्ये आमचा असा विश्वास आहे की सर्वोत्तम शोध किंवा नवकल्पना नेहमीच साध्या मानवी गरजांवर आणि वास्तवावर आधारित असतात. प्रीपेडचे भविष्य हे केवळ जास्त डेटा देण्यापुरते मर्यादित नसून, ग्राहक त्याचा वापर कसा करतात यासाठी त्यांना अधिक स्वातंत्र्य आणि लवचिकता देण्यावर अवलंबून आहे. ‘वी प्रीपेड फॅमिली प्लॅन’ या क्षेत्रातील आजवरच्या मोबाईल प्लॅन्सच्या पारंपरिक रचनेला आव्हान देतो. लोक ज्या पद्धतीने जगतात, काम करतात आणि एकमेकांशी जोडलेले राहतात, त्या जीवनशैलीला प्रीपेड प्लॅन अधिक सुसंगत बनवण्याच्या दिशेने हे आमचे एक धाडसी पाऊल आहे. हा प्लॅन आमची सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करतो; ज्यामध्ये देशात कुठेही राहून कुटुंबातील सदस्यांना एकमेकांशी जोडून राहता येईल आणि गरज पडेल तेव्हा डेटा शेअर करता येईल.”
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानसोबत तयार केलेले नवे जाहिरात कॅम्पेन या प्लॅनची वैशिष्ट्ये आणि ब्रँडचे ‘वी पे सब है व्हीआयपी’ वचन ग्राहकांसमोर आणते. या फिल्ममध्ये, शाहरुख खान सांगतात की कशा प्रकारे ‘वी’ चा हा प्रीपेड प्लॅन भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाला नेहमी एकमेकांशी जोडून ठेवतो.
ग्राहक वेगवेगळ्या टेलिकॉम सर्कल्समधूनही आपला फॅमिली ग्रुप तयार करू शकतात, पात्र कुटुंब सदस्यांना यात जोडू शकतात, आणि डेटा शेअरिंगसह फॅमिली मॅनेजमेंट तसेच विशेष रिवॉर्ड्सचा आनंद घेऊ शकतात. व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक: https://youtu.be/8H8Sx5M452A?si=KgZ_y
h52Vod-Uar8


