कंपनीच्या विमा प्रतिनिधींमार्फत मिळणाऱ्या एकूण व्यवसायापैकी ४५ टक्के व्यवसाय महिला विमा सल्लागारांकडून मिळतो.
३० सप्टेंबर २०२६ रोजी कंपनीकडे ७८,००० हून अधिक महिला विमा सल्लागार होत्या.
मुंबई, १५ ऑक्टोबर २०२६ : ‘आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स’ने ‘नारीशक्ती’ या आपल्या उपक्रमांतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात २०,००० महिला विमा सल्लागारांची भरती करण्याचे ठरविले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने कंपनीने ही घोषणा आज येथे केली. कंपनीला विमा प्रतिनिधींच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्यवसायापैकी ४५ टक्के व्यवसाय हा ७८,००० हून अधिक महिला विमा सल्लागारांकडून मिळतो, असे ३० सप्टेंबर २०२६ रोजीच्या कंपनीकडील आकडेवारीनुसार दिसून येते. कंपनीच्या ‘नारीशक्ती’ उपक्रमाला दोन वर्षे पूर्ण होत आहे. त्या अनुषंगानेही महिला विमा सल्लागारांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.
‘आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स लिमिटेड’चे मुख्य वितरण अधिकारी अमिश बँकर म्हणाले, “आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स’मध्ये आम्ही स्त्री आणि पुरुष असा भेद न करता प्रत्येकाच्या कौशल्याला महत्त्व देतो. आमच्या पुरुष विमा सल्लागारांची कामगिरीही सुधारत आहे. मात्र, ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी आमच्या महिला विमा सल्लागार विशेष प्रयत्न करीत असल्याचे आम्ही पाहत आहोत..
महत्त्वाची बाब म्हणजे, ३० सप्टेंबर २०२६ रोजी कंपनीच्या एकूण विमा सल्लागारांपैकी सुमारे ३२ टक्के महिला होत्या. कंपनीच्या विमा प्रतिनिधींच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण व्यवसायापैकी सुमारे ४५ टक्के व्यवसाय या महिला सल्लागारांकडून मिळत आहे. बंगळुरू, केरळ आणि मुंबईसारख्या भागांमध्ये महिला सल्लागारांचा व्यवसायातील वाटा ५० टक्क्यांहून अधिक असल्याचेही दिसून आले आहे.
याशिवाय, महिला विमा सल्लागार वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये गृहिणी, पगारदार आणि व्यावसायिक महिलांचा समावेश आहे. व्यवस्थापकाप्रमाणे एकाच वेळी अनेक कामे करणे, सल्लागाराप्रमाणे समस्यांवर उपाय शोधणे आणि एखाद्या बॅंकिंग व्यावसायिकाप्रमाणे पैशांचे व्यवस्थापन करणे, ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.
भारतीय महिलांमध्ये सहानुभूतीने विचार करण्याची आणि समस्यांवर योग्य मार्ग काढण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यामुळे त्या ग्राहकांच्या गरजा अचूकपणे ओळखतात, विम्याचे योग्य पर्याय सुचवतात आणि पॉलिसी विकल्यानंतरही त्यांच्याशी चांगले संबंध जपतात. भावनिक समज, समाजाशी असलेला संपर्क, कामाप्रती निष्ठा आणि बांधिलकी, तसेच कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेला दिलेले महत्त्व, हे त्यांचे खास गुण आहेत. विमा व्यवसायात या गुणांचा मोठा उपयोग होतो.
याच उद्देशाने आम्ही दोन वर्षांपूर्वी ‘नारीशक्ती’ उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून देशभरातील महिला विमा सल्लागारांना आवश्यक प्रशिक्षण आणि मदत दिली जाते. त्यामुळे त्यांना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळते. नवरात्र हा अधिकाधिक महिला विमा सल्लागारांना ‘नारीशक्ती’ परिवारात सहभागी करून घेण्यासाठी योग्य काळ आहे. त्यांना आवश्यक त्या कौशल्यांचे प्रशिक्षण आम्ही देणार आहोत. २०४७ पर्यंत देशातील प्रत्येकाला विमा संरक्षण मिळावे, हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे. त्याच्या पूर्तीसाठी योगदान देण्यास आम्ही या महिलांना तयार करत आहोत.”
३० सप्टेंबर २०२६ रोजी, कंपनीच्या ४७% महिला सल्लागार १० वर्षांहून अधिक काळापासून आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्सशी जोडलेल्या आहेत.
‘नारीशक्ती’ हा उपक्रम ‘आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स’ने २०२४ मध्ये सुरू केला. या उपक्रमातून देशभरातील महिलांना आर्थिक नियोजन क्षेत्रात स्वतःचे करिअर घडवण्याची संधी मिळते. यासाठी त्यांना सुरुवातीला कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही. कुटुंबासाठी वेळ देऊनही त्यांना स्वतःच्या सोयीनुसार काम करता येते. या कामातून त्यांना ओळख मिळवता येते, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येते आणि देशभरातील कुटुंबांना विमा संरक्षण देण्याच्या महत्त्वाच्या कार्यात योगदान देता येते.


